Skip to content

Adoption बद्दल बायबलमधील वचने

129 वचने · 38 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. म्हणजे तुमचे दान करणे गुप्त राहील, मग तुमच्या गुप्त गोष्टी पाहणारा पिता तुम्हाला प्रतिफळ देईल.

  2. तुम्ही प्रार्थना करता, तेव्हा आपल्या खोलीत जा, दार बंद करा आणि मग तुमच्या अदृश्य पित्याची प्रार्थना करा. तुम्ही गुप्त प्रकारे केलेली प्रार्थना तुमचा पिता ऐकेल, तेव्हा ते तुम्हाला प्रतिफळ देतील.

  3. “तर, तुम्ही याप्रमाणे प्रार्थना करीत जा: “ ‘हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुमचे नाव पवित्र मानिले जावो,

  4. ज्यांनी तुमच्याविरुद्ध पाप केले, त्यांना तुम्ही क्षमा केली, तर तुमचा स्वर्गीय पिता तुमच्याही पातकांची क्षमा करतील.

  5. म्हणजे तुम्ही उपास करीत आहात असे लोकांना समजणार नाही. पण केवळ तुमच्या अदृश्य पित्याला समजेल आणि मग तुमचा पिता जे तुम्ही गुप्त प्रकारे केलेल्या गोष्टी पाहतात ते तुम्हाला प्रतिफळ देतील.

  6. “मी तुम्हाला सांगतो, आपण काय खावे, किंवा काय प्यावे अशी आपल्या जिवाविषयी, किंवा आपण काय पांघरावे अशी आपल्या शरीराविषयी काळजी करू नका. अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रांपेक्षा शरीर अधिक महत्त्वाचे नाही काय?

  7. आकाशातील पाखरांकडे पाहा; ते धान्य पेरीत नाही, कापणी करीत नाही व कोठारात साठवित नाही आणि तरी देखील तुमचे स्वर्गीय पिता त्यांना खायला घालतात. तुम्ही त्यांच्यापेक्षा कितीतरी अधिक मोलवान नाही का?

  8. शिवाय काळजी करून आयुष्यातील एक तास तरी कोणास वाढविता येईल काय?

  9. “आणि तुम्ही वस्त्राविषयी काळजी का करावी? रानातील फुले कशी वाढतात हे पाहा. ती कष्ट करीत नाहीत किंवा कातीत नाहीत.

  10. तरी मी तुम्हाला सांगतो की शलोमोनदेखील आपल्या सर्व वैभवात त्यांच्याइतका नटला नव्हता.

  11. जे आज आहे आणि उद्या अग्नीत टाकले जाते, त्या गवताला जर परमेश्वर असा पोशाख घालतात, तर अहो अल्पविश्वासी, ते तुम्हाला अधिक विशेष पोशाख घालणार नाहीत काय?

  12. म्हणून ‘आम्ही काय खाणार?’ किंवा ‘आम्ही काय पिणार?’ किंवा ‘आम्ही काय पांघरावे?’ असे म्हणत काळजी करू नका.

  13. कारण परकीय लोक या गोष्टींच्या मागे लागतात, आणि तुम्हाला या गोष्टींची गरज आहे, हे तुमच्या स्वर्गातील पित्याला माहीत आहे.

  14. परंतु तुम्ही प्रथम त्यांचे राज्य आणि नीतिमत्व मिळविण्यासाठी झटा म्हणजे या सर्व गोष्टीही तुम्हाला प्राप्त होतील.

  15. म्हणून उद्याच्या गोष्टींची चिंता करू नका, उद्याची चिंता उद्या, प्रत्येक दिवसाचा त्रास त्या दिवसासाठी पुरेसा आहे.

  16. “मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, दार ठोका म्हणजे ते उघडले जाईल.

  17. कारण जो कोणी मागतो त्याला मिळेल, जो कोणी शोधतो त्याला सापडेल आणि जो कोणी ठोकतो त्याच्यासाठी दार उघडले जाईल.

  18. “जर तुमच्या मुलाने भाकर मागितली, तर त्याला दगड देईल असा तुम्हामध्ये कोण आहे?

  19. किंवा मासा मागितला, तर साप देईल?

  20. जर तुम्ही वाईट असूनही तुमच्या लेकरांना चांगल्या देणग्या देण्याचे तुम्हाला समजते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात, त्यांना ते चांगल्या देणग्या किती विशेषकरून देतील?

  21. मग नीतिमान लोक आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे चमकतील. ज्यांना ऐकावयास कान आहेत त्यांनी ऐकावे.

  22. तुमच्या शत्रूवर प्रेम करा, त्यांचे भले करा आणि परतफेड करण्याची आशा बाळगू नका. असे केले म्हणजे तुम्हाला फार मोठे प्रतिफळ मिळेल आणि तुम्ही परात्पराची लेकरे व्हाल, कारण ते अनुपकारी आणि दुष्ट यांनाही दयाळूपणाने वागवितात.

  23. जसा तुमचे पिता कनवाळू आहेत, तसे तुम्हीही व्हा.

  24. परंतु ज्या सर्वांनी त्यांना स्वीकारले, त्यांच्या नावावर विश्वास ठेवला, त्यांना परमेश्वराची मुले होण्याचा अधिकार दिला—

  25. ज्या लेकरांचा जन्म ना वंशाने, ना मानवी इच्छेने किंवा पतीच्या इच्छेने, तर परमेश्वरापासून झाला.