Adoption बद्दल बायबलमधील वचने: Is of God's grace
Is of God's grace बद्दल वचने
आणि म्हण, ‘सार्वभौम याहवेह यरुशलेमास असे म्हणतात: तुझे पूर्वज व तुझा जन्म कनानी लोकांच्या देशातील आहे; तुझा पिता अमोरी आणि तुझी आई हिथी होती.
तुझा जन्म झाला त्या दिवशी तुझी नाळ कापली नव्हती, ना तुला पाण्याने धुवून स्वच्छ केले होते व तुला ना मिठाने चोळले होते, ना कापडाने गुंडाळले होते.
तुझ्याकडे कोणी दयेने पाहिले नाही किंवा तुझ्यासाठी यापैकी कोणतीही गोष्टी करावी म्हणून कोणाला सहानुभूती आली नाही. तर तुला मोकळ्या मैदानात टाकून दिले होते, तुझ्या जन्माच्या दिवशीच तू तुच्छ मानली गेली होती.
“ ‘तेव्हा मी तिथून जाताना तुला तुझ्या रक्तात लोळताना पाहिले आणि तू तिथे तुझ्या रक्तात पडलेली असताना मी तुला म्हटले, “जिवंत राहा!”
यास्तव, अभिवचन विश्वासाच्याद्वारे कृपा म्हणून अब्राहामाच्या सर्व वंशजाला मिळते. जे केवळ नियमांच्या अधीन आहेत त्यांनाच नव्हे, तर ज्यांचा विश्वास अब्राहामाच्या विश्वासासारखा आहे त्या सर्वांना, कारण अब्राहाम आपल्या सर्वांचा पिता आहे.
असे लिहिले आहे: “मी तुला अनेक राष्ट्रांचा पिता केले.” परमेश्वराच्या दृष्टीने अब्राहाम आमचा पिता आहे, ज्यावर त्याने विश्वास ठेवला, जो परमेश्वर मेलेल्यांना जीवन देतो आणि ज्यागोष्टी नाही त्या गोष्टी अस्तित्वात याव्या अशी आज्ञा देतो.
त्यांच्या आनंदास आणि इच्छेस अनुसरून येशू ख्रिस्ताद्वारे आपण दत्तकपुत्र व्हावे, ही त्यांची पूर्व योजना होती;
त्यांच्या प्रिय पुत्राद्वारे आपल्याला मुक्तपणे दिलेल्या गौरवयुक्त कृपेची स्तुती व्हावी.
कारण ज्यांच्या इच्छेनुसार व उद्देशानुसार जे सर्वकाही चालवितात, त्यांच्या पूर्व योजनेनुसार आपण त्यांच्यामध्ये निवडलेले होतो.