Skip to content

Adoption बद्दल बायबलमधील वचने: Spiritual

66 वचने · 38 पैलू

Spiritual बद्दल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मग तू फारोहला सांग, ‘याहवेह असे म्हणतात: इस्राएल माझा ज्येष्ठपुत्र आहे,

  2. आणि मी तुला सांगितल्याप्रमाणे, माझ्या पुत्राला माझी आराधना करण्यासाठी तू जाऊ द्यावेस. पण तू त्यांना पाठविण्यास नकार दिला; तर मी तुझा ज्येष्ठपुत्र मारून टाकीन.’ ”

  3. “अशा रीतीने ते माझे नाव इस्राएली लोकांना ठेवतील आणि मी त्यांना आशीर्वादित करेन.”

  4. याहवेह तुमच्या परमेश्वराची तुम्ही संतती आहात. मृतांसाठी स्वतःला जखमा करून घेऊ नका किंवा डोक्याचे मुंडण करून घेऊ नका,

  5. आणि याहवेहनेही वचन दिल्याप्रमाणे स्वतःचे लोक व त्यांचा मोलवान ठेवा म्हणून त्यांनी आज तुमचा स्वीकार केला आहे व तुम्ही त्यांच्या सर्व आज्ञा अवश्य पाळाव्या.

  6. नंतर मोशे व लेवीय याजकांनी सर्व इस्राएली लोकांना म्हटले, “अहो इस्राएली लोकांनो, शांत व्हा व ऐका! आता तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराचे लोक झाला आहात.

  7. मग पृथ्वीवरील सर्व लोक पाहतील की तुम्हाला याहवेहच्या नावाने संबोधित करण्यात येते, ती तुम्हाला भिऊ लागतील.

  8. ती आता त्यांची लेकरे राहिली नाहीत, कारण ती भ्रष्ट झाली आहेत; त्यांना लाज वाटेल की ते एक विकृत आणि कुटिल पिढी आहेत.

  9. अहो मूर्ख आणि मतिमंद लोकांनो, याहवेहची परतफेड करण्याची ही रीत आहे काय? ते तुमचे जनक, तुमचे पिता नाहीत काय? त्यांनीच तुम्हाला बनविले व घडविले नाही काय?

  10. मी त्याचा पिता होईन आणि तो माझा पुत्र होईल. तो जेव्हा चूक करेल, तेव्हा मी त्याला मनुष्याच्या काठीने, मानवांच्या फटक्यांनी शिक्षा करेन.

  11. तो माझ्या नावाचे एक मंदिर बांधील. तो माझा पुत्र होईल आणि मी त्याचा पिता होईन. मी इस्राएलावर त्याचे राजासन अनंतकालापर्यंत स्थापन करेन.’

  12. याहवेहने मला सांगितले: ‘तुझा पुत्र शलोमोन माझे मंदिर आणि अंगण बांधील, कारण मी त्याला माझा पुत्र म्हणून निवडले आहे आणि मी त्याचा पिता होईन.

  13. जर माझे लोक, ज्यांना माझ्या नावाने ओळखले जाते, ते जर स्वतःला नम्र करतील आणि प्रार्थना करतील, माझा शोध घेतील आणि त्यांच्या वाईट मार्गांपासून फिरतील, तेव्हा मी स्वर्गातून ऐकेन आणि त्यांच्या पापांची क्षमा करेन आणि त्यांच्या भूमीला आरोग्य देईन.

  14. याहवेहचा आदर मनुष्याचा दृढ गड आहे, आणि त्याच्या मुलाबाळांना सुरक्षित आश्रयस्थान लाभते.

  15. मी आणि याहवेहने मला दिलेली लेकरेही येथे आहेत. आम्ही, सीयोन पर्वतावर राहणारे सर्वसमर्थ याहवेहकडून इस्राएलला मिळालेले चिन्ह व प्रतीक आहोत.

  16. मी उत्तरेला म्हणेन, ‘त्यांना सोडून द्या!’ आणि दक्षिणेला म्हणेन, ‘त्यांना धरून ठेवू नका.’ माझ्या पुत्रांना दूरवरून आणि पृथ्वीच्या कोपऱ्यातून माझ्या कन्यांना घेऊन या—

  17. जो कोणी माझ्या नावाने ओळखला जातो, ज्यांना मी माझ्या गौरवासाठी निर्माण केले, ज्यांना मी घडविले आहे, त्यांना घेऊन या.”

  18. ते म्हणाले, “ते निश्चितच माझे लोक आहेत, जी लेकरे माझ्याशी एकनिष्ठ राहतील;” म्हणून ते त्यांचे तारणकर्ता झाले.

  19. परंतु तुम्हीच आमचे पिता आहात, जरी अब्राहाम आम्हाला ओळखत नाही इस्राएलने आम्हाला नाकारले आहे; तरी तुम्ही, हे याहवेह, आमचे पिता आहात, आमचे युगायुगांचे उद्धारकर्ता, हेच तुमचे नाव आहे.

  20. “मी स्वतःला म्हटले, “ ‘तुम्हाला माझ्या मुलाबाळांप्रमाणे वागवितांना मला किती आनंद होईल आणि मी तुम्हाला सुखद भूमी देईन, कोणत्याही देशापेक्षा अधिक सुंदर वतन.’ मला वाटले तू मला ‘पिता’ म्हणून हाक मारशील आणि माझे अनुसरण करण्यापासून मागे फिरणार नाही.

  21. ते आनंदाश्रू ढाळतील. मी त्यांना परत आणतांना ते प्रार्थना करतील. मी त्यांना जलप्रवाहाच्या बाजूने चालवेन समतल भूमीवरून ते न अडखळता चालतील, कारण मी इस्राएलचा पिता आहे, आणि एफ्राईम माझा ज्येष्ठपुत्र आहे.

  22. हा एफ्राईम माझा लाडका पुत्र नाही का, जे माझे लेकरू, मला अत्यंत सुखदायक? जरी मी बरेचदा त्याच्याविरुद्ध बोललो, तरी मला आताही त्याची आठवण येते. म्हणून माझ्या मनाला त्याची ओढ लागली आहे; मला त्याची अत्यंत दया येते.” असे याहवेह जाहीर करतात.

  23. तेव्हा याहवेह म्हणाले, “याचे नाव लो-अम्मी असे ठेव, कारण तुम्ही माझे लोक नाहीत आणि मी तुमचा परमेश्वर नाही.

  24. “तरीही इस्राएली लोक समुद्रकिनाऱ्यावरील वाळूप्रमाणे असंख्य असतील जी मापता येणार नाही किंवा मोजता येणार नाही, असे. ज्या ठिकाणी म्हटले होते, तुम्ही माझे लोक नाहीत, तिथे त्यांना जिवंत परमेश्वराची लेकरे म्हणतील

  25. “इस्राएल जेव्हा लहान मूल होते तेव्हा मी त्याच्यावर प्रीती केली, आणि इजिप्तमधून माझ्या पुत्राला बोलाविले.