Adoption बद्दल बायबलमधील वचने: Is through Christ
Is through Christ बद्दल वचने
परंतु ज्या सर्वांनी त्यांना स्वीकारले, त्यांच्या नावावर विश्वास ठेवला, त्यांना परमेश्वराची मुले होण्याचा अधिकार दिला—
परंतु काळाची पूर्णता झाल्यावर परमेश्वराने आपल्या पुत्राला पाठविले; ते स्त्रीपासून जन्मलेले, नियमांच्या अधीन असे जन्मले होते.
जे आपण नियमांच्या अधीन होतो, त्या आपल्याला खंडणी देऊन सोडवावे आणि पुत्र म्हणून दत्तक घ्यावे.
त्यांच्या आनंदास आणि इच्छेस अनुसरून येशू ख्रिस्ताद्वारे आपण दत्तकपुत्र व्हावे, ही त्यांची पूर्व योजना होती;
हे योग्य होते की परमेश्वर, ज्यांच्यासाठी आणि ज्यांच्याद्वारे सर्वकाही निर्माण झाले, त्यांनी पुष्कळ पुत्रांना व कन्यांना गौरवात आणावे, यासाठी की त्यांच्या तारणाच्या उत्पादकाच्या दुःख सहनाद्वारे त्यांना परिपूर्ण करावे.
आणि पुन्हा, “मी त्याच्यावर माझा भरवसा ठेवेन.” आणि आणखी ते म्हणाले, “पाहा, मी आणि परमेश्वराने मला दिलेली लेकरेही येथे आहेत.”