- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa AD 95
The Revelation
John's vision on Patmos unveils the cosmic victory of the Lamb over evil and the final restoration of all creation.
या कालखंडातील वचने
- प्रकटीकरण १८:५सुमारे इ.स. ९६
कारण तिच्या पापांची रास स्वर्गापर्यंत उंच गेली आहे, आणि परमेश्वराने तिच्या गुन्ह्याची आठवण केली आहे.
- प्रकटीकरण १८:६सुमारे इ.स. ९६
तिने जसे तुम्हाला केले, तसेच तिला करा; तिने केलेल्या दुष्कृत्यांबद्दल तिला दुप्पट शिक्षा करा. तिच्या प्याल्यात तिच्याच प्याल्यातून दुप्पट ओता.”
- प्रकटीकरण १८:७सुमारे इ.स. ९६
तिने आपले सगळे आयुष्य विलासात आणि ऐषआरामात घालविले आहे, आता त्याच मानाने तिला यातना आणि दुःख द्या. ती आपल्या अंतःकरणात बढाया मारून म्हणते, “मी महाराणी होऊन माझ्या सिंहासनावर बसलेली आहे. मी काही विधवा नाही. मला कधीच दुःखाचा अनुभव येणार नाही.”
- प्रकटीकरण १८:८सुमारे इ.स. ९६
म्हणूनच तिला मरण, शोक व दुष्काळ या सर्वांच्या पीडा एकाच दिवशी भोगाव्या लागतील. अग्नीने तिला जाळून टाकण्यात येईल. सर्वसमर्थ प्रभू परमेश्वर तिचा न्यायनिवाडा करणार आहेत.
- प्रकटीकरण १८:९सुमारे इ.स. ९६
“पृथ्वीवरील ज्या राजांनी, तिच्याबरोबर व्यभिचार केला व तिच्या विलासामध्ये सामील झाले होते. ते तिच्या पीडेच्या भयामुळे दूर उभे राहून तिच्या जळण्याचा धूर पाहतील,
- प्रकटीकरण १८:१०सुमारे इ.स. ९६
तेव्हा ते तिच्याकरिता ऊर बडवून शोक करतील. ते म्हणतील: “ ‘हाय हाय! महान बाबिलोन नगरी, ती सामर्थ्यशाली नगरी! एका क्षणात तिच्यावर न्यायाची कुर्हाड कोसळली आहे!’
- प्रकटीकरण १८:११सुमारे इ.स. ९६
“पृथ्वीवरील व्यापारी तिच्यासाठी रडून शोक करतील, कारण आता त्यांचा माल विकत घेण्यास कोणीच उरले नाही:
- प्रकटीकरण १८:१२सुमारे इ.स. ९६
सोने, चांदी, हिरे, रत्ने, तलम कापड, जांभळे आणि किरमिजी रेशमी कापड, सर्वप्रकारचे चंदनी व सुगंधी लाकूड, हस्तदंती माल, मोलवान लाकडाचे कोरीव नक्षीकाम, कास्य, लोखंड, संगमरवरी दगड,
- प्रकटीकरण १८:१३सुमारे इ.स. ९६
तसेच दालचिनी व मसाले, उटणी, धूप, अत्तर, ऊद, द्राक्षारस, जैतुनाचे तेल, उत्तम सपीठ व गहू, गुरे, मेंढरे, घोडे, रथ, गुलाम म्हणून विकण्यात येणारे लोक.
- प्रकटीकरण १८:१४सुमारे इ.स. ९६
“ते म्हणतील, ‘ज्या फळांची तुझ्या जीवाला वासना होती ती तुझ्यापासून घेतली गेली आहेत, सर्व विलास आणि वैभवी गोष्टी तुझ्यापुढून गेली आहेत; त्याचा तुला कधीच पुनर्लाभ होणार नाही.’
- प्रकटीकरण १८:१५सुमारे इ.स. ९६
जे व्यापारी तिला हे पदार्थ विकून श्रीमंत झाले, ते आता तिची पीडा बघून भयभीत होतील. दूर उभे राहून रडत व शोक करतील.
- प्रकटीकरण १८:१६सुमारे इ.स. ९६
ते आक्रोश करून म्हणतील: “ ‘हाय! हाय! ही इतकी सुंदर महानगरी! जांभळ्या, किरमिजी तलम वस्त्रांनी सजलेल्या, सोन्यामोत्यांच्या अलंकारांनी नटलेल्या स्त्रीसारखी ही सुंदर महानगरी!
- प्रकटीकरण १८:१७सुमारे इ.स. ९६
एका क्षणात तिची सर्व संपत्ती नष्ट झाली!’ “प्रत्येक जहाजाचे कप्तान आणि खलाशी व समुद्रापासून उत्पन्न मिळविणारे सर्वजण दूर अंतरावर उभे राहतील,
- प्रकटीकरण १८:१८सुमारे इ.स. ९६
धुराच्या उसळणार्या लोटांकडे पाहत शोकाकुल होऊन ते रडत म्हणतील, ‘या महान नगरीसारखी दुसरी नगरी सर्व जगात शोधून तरी सापडेल काय?’
- प्रकटीकरण १८:१९सुमारे इ.स. ९६
मोठ्या दुःखाने आपल्या डोक्यात धूळ टाकून ते रडत व आक्रोश करीत म्हणतील: “ ‘हाय, हाय! किती महान नगरी होती ही! ज्या सर्वांकडे जहाजे होती ते तिच्यामुळेच श्रीमंत झाले, आणि आता ती एका तासात उद्ध्वस्त झाली!’
- प्रकटीकरण १८:२०सुमारे इ.स. ९६
“पण हे स्वर्गा! तिचा शेवट झाला म्हणून तू आनंद कर! आणि तुम्ही, परमेश्वराच्या मुलांनो, संदेष्ट्यांनो, प्रेषितांनो, तुम्हीही आनंद करा! कारण तिने तुमच्यावर लादलेल्या न्यायाविरुद्ध परमेश्वराने तुमच्या बाजूने न्यायनिवाडा केला आहे.”
- प्रकटीकरण १८:२१सुमारे इ.स. ९६
मग एका बलवान देवदूताने, जात्याच्या तळीच्या आकाराचा एक मोठा दगड उचलून समुद्रात टाकला व तो ओरडून म्हणाला: “ते महान नगर बाबिलोन अशाच हिंसक रीतीने खाली फेकले जाईल व ते कायमचे नाहीसे होईल.”
- प्रकटीकरण १८:२२सुमारे इ.स. ९६
त्या नगरीत आता कर्णे, वीणा, बासरी, यांचा सूरही कधी ऐकू येणार नाही. तिथे कसल्याच प्रकारचे उद्योगधंदे पुन्हा आढळणार नाहीत. तिथे गिरणीचा आवाज पुन्हा ऐकू येणार नाही.
- प्रकटीकरण १८:२३सुमारे इ.स. ९६
दिव्यांचा प्रकाश यापुढे तुझ्यावर उजळणार नाही आणि वधूवरांची वाणी पुन्हा ऐकू येणार नाही. तुझे व्यापारी पृथ्वीवरील थोर लोक होते. सर्व राष्ट्रे तुझ्या चेटकाने ठकविली गेली होती.
- प्रकटीकरण १८:२४सुमारे इ.स. ९६
पृथ्वीवर सांडलेले सर्व संदेष्टे आणि पवित्रजन, यांचे रक्त तिच्यामध्ये आढळले.
- प्रकटीकरण १९:१सुमारे इ.स. ९६
यानंतर मी ऐकले, स्वर्गात जणू काही एक मोठा जनसमुदाय गर्जना करून म्हणत आहे: “हाल्लेलूयाह! तारण, गौरव व सामर्थ्य ही आमच्या परमेश्वराची आहेत!
- प्रकटीकरण १९:२सुमारे इ.स. ९६
कारण त्यांचे निर्णय सत्य व न्याय्य आहेत. ज्या मोठ्या वेश्येने आपल्या जारकर्माने पृथ्वी भ्रष्ट केली होती, तिला त्यांनी दंड केला आहे आणि आपल्या सेवकांच्या रक्ताबद्दल तिचा सूड उगवला आहे.”
- प्रकटीकरण १९:३सुमारे इ.स. ९६
आणि पुन्हा त्यांनी घोषणा केली: “हाल्लेलूयाह” तिचा धूर सदासर्वकाळ वर जात आहे.
- प्रकटीकरण १९:४सुमारे इ.स. ९६
तेव्हा ते चोवीस वडीलजन व चार सजीव प्राणी यांनी राजासनावर बसलेल्या परमेश्वरासमोर दंडवत घालून त्यांना नमन करीत म्हटले, “आमेन! हाल्लेलूयाह!”
- प्रकटीकरण १९:५सुमारे इ.स. ९६
तेव्हा राजासनातून एक वाणी निघाली. ती म्हणाली, “परमेश्वराचे भय बाळगणाऱ्या त्यांच्या सर्व लहान थोर सेवकहो, आपल्या परमेश्वराचे स्तवन करा.”