मुख्य मजकुरावर जा

circa AD 95

The Revelation

John's vision on Patmos unveils the cosmic victory of the Lamb over evil and the final restoration of all creation.

404 वचने · 1 पुस्तक समाविष्ट

या कालखंडातील वचने

  1. प्रकटीकरण १५:२सुमारे इ.स. ९६

    मग माझ्यासमोर अग्निमिश्रित काचेच्या समुद्रासारखे काहीतरी मी पाहिले. पहिला पशू, त्याची मूर्ती, त्याची खूण व त्याच्या नावाची संख्या, या सर्वांवर विजय संपादन केलेले सर्वजण, काचेच्या समुद्राच्या किनारीवर उभे होते. सर्वांच्या हातात परमेश्वराने दिलेल्या वीणा होत्या.

  2. प्रकटीकरण १५:३सुमारे इ.स. ९६

    ते परमेश्वराचा सेवक मोशेचे आणि कोकर्‍याचे गीत गात होते: “हे सर्वसमर्थ प्रभू परमेश्वरा! तुमची कृत्ये थोर आणि अलौकिक आहेत! हे राष्ट्रांच्या राजा, तुमचे मार्ग नीतीचे आणि सत्याचे आहेत!

  3. प्रकटीकरण १५:४सुमारे इ.स. ९६

    हे प्रभू, असा कोण आहे जो तुमचे भय धरणार नाही, आणि तुमच्या नावाचे गौरव करणार नाही? कारण तुम्हीच पवित्र आहात! सर्व राष्ट्रे येऊन तुमची आराधना करतील, कारण तुमची न्याय्य कृत्ये प्रकट झाली आहेत.”

  4. प्रकटीकरण १५:५सुमारे इ.स. ९६

    मग मी पाहिले, तो स्वर्गातील मंदिराचे साक्षीचे परमपवित्रस्थान उघडलेले मला दिसले.

  5. प्रकटीकरण १५:६सुमारे इ.स. ९६

    ज्यांना पृथ्वीवर सात पीडा ओतण्याचे काम नेमून देण्यात आले होते, ते सात देवदूत त्या मंदिरातून बाहेर आले. त्यांनी डागविरहीत आणि तेजस्वी तागाची वस्त्रे परिधान केली होती; त्यांच्या छातीवर सोन्याचे पट्टे बांधले होते.

  6. प्रकटीकरण १५:७सुमारे इ.स. ९६

    त्या चार सजीव प्राण्यांतील एकाने, त्या सात देवदूतांना युगानुयुग जिवंत असणार्‍या परमेश्वराच्या क्रोधाने भरलेल्या सात सोन्याच्या वाट्या दिल्या.

  7. प्रकटीकरण १५:८सुमारे इ.स. ९६

    त्यांचे गौरव व सामर्थ्य यातून निघालेल्या धुराने मंदिर भरून गेले. सात देवदूतांचे सात पीडा ओतण्याचे काम संपेपर्यंत कोणालाही मंदिरात जाता आले नाही.

  8. प्रकटीकरण १६:१सुमारे इ.स. ९६

    नंतर मी मंदिरातून निघालेली एक मोठी वाणी सात देवदूतांना म्हणतांना ऐकली, “जा, परमेश्वराच्या क्रोधाच्या सात वाट्या पृथ्वीवर ओता.”

  9. प्रकटीकरण १६:२सुमारे इ.स. ९६

    त्याप्रमाणे, पहिला देवदूत मंदिरातून निघाला. त्याने आपली वाटी पृथ्वीवर ओतली, तेव्हा ज्या लोकांवर पशूची खूण होती व ज्यांनी त्याच्या मूर्तीला नमन केले होते, अशा प्रत्येकाला चिघळलेले आणि क्लेशदायक फोड आले.

  10. प्रकटीकरण १६:३सुमारे इ.स. ९६

    दुसर्‍या देवदूताने आपले वाटी समुद्रावर ओतली, तेव्हा समुद्राचे पाणी मेलेल्या माणसाच्या रक्तासारखे रक्तमय झाले आणि त्यातील सर्व जिवंत प्राणी मरण पावले.

  11. प्रकटीकरण १६:४सुमारे इ.स. ९६

    तिसर्‍या देवदूताने त्याची वाटी नद्यांवर आणि झर्‍यावर ओतली आणि ते पाणी रक्तमय झाले.

  12. प्रकटीकरण १६:५सुमारे इ.स. ९६

    मग मी जलांच्या देवदूताला जाहीर करताना ऐकले: “जे तुम्ही आहात, जे तुम्ही होता, ते तुम्ही हे पवित्र प्रभू, हा न्यायनिवाडा करण्यास तुम्ही न्यायी आहात.

  13. प्रकटीकरण १६:६सुमारे इ.स. ९६

    कारण त्यांनी तुमच्या पवित्र जणांचे आणि संदेष्ट्यांचे रक्त सांडले, आणि आता तुम्ही त्यांना रक्त प्यावयास लावले आहे, त्याला ते पात्र आहेत.”

  14. प्रकटीकरण १६:७सुमारे इ.स. ९६

    नंतर वेदीला असे म्हणताना मी ऐकले: “खरोखर, हे सर्वसमर्थ प्रभू परमेश्वरा, तुमचे न्याय न्यायी व सत्य आहेत.”

  15. प्रकटीकरण १६:८सुमारे इ.स. ९६

    मग चौथ्या देवदूताने आपली वाटी सूर्यावर ओतली आणि सर्व माणसांना सूर्याच्या अग्नीने भाजून काढण्याची परवानगी देण्यात आली.

  16. प्रकटीकरण १६:९सुमारे इ.स. ९६

    माणसे तीव्र उष्णतेने करपून गेली, तेव्हा या पीडांवर ज्यांचे नियंत्रण आहे त्या परमेश्वराच्या नावाला शाप दिला, परंतु त्यांनी पश्चात्ताप केला नाही आणि परमेश्वराचे गौरव केले नाही.

  17. प्रकटीकरण १६:१०सुमारे इ.स. ९६

    मग पाचव्या देवदूताने आपली वाटी समुद्रातील पशूच्या आसनावर ओतली. तेव्हा त्याचे संपूर्ण राज्य अंधकारमय झाले आणि त्याच्या प्रजाजनांनी असह्य वेदनांमुळे आपल्या जिभा चावल्या.

  18. प्रकटीकरण १६:११सुमारे इ.स. ९६

    आपल्या वेदना आणि फोड याबद्दल त्यांनी स्वर्गातील परमेश्वराला शाप दिले. पण आपल्या दुष्कृत्यांबद्दल पश्चात्ताप करण्याचे त्यांनी नाकारले.

  19. प्रकटीकरण १६:१२सुमारे इ.स. ९६

    सहाव्या देवदूताने आपली वाटी यूफ्रेटीस महानदीवर ओतली, तेव्हा पूर्वेकडून येणार्‍या राजांचा मार्ग सिद्ध व्हावा म्हणून तिचे पाणी आटून गेले.

  20. प्रकटीकरण १६:१३सुमारे इ.स. ९६

    नंतर बेडकासारखे दिसणारे तीन अशुद्ध आत्मे अजगराच्या तोंडातून, पशूच्या तोंडातून व खोट्या संदेष्ट्यांच्या तोंडामधून निघताना मी पाहिले.

  21. प्रकटीकरण १६:१४सुमारे इ.स. ९६

    चमत्कार करणारे हे दुरात्मे जगातील सर्व राजांकडे जाऊन सर्वसमर्थ परमेश्वराच्या दिवशी युद्धासाठी त्यांना एकत्र करतात.

  22. प्रकटीकरण १६:१५सुमारे इ.स. ९६

    “पाहा! जसा चोर येतो तसा मी येईन! जे आपली वस्त्रे घालून तयार होऊन माझी वाट पाहत आहेत, ते धन्य! त्यांना नग्नावस्थेत आणि लज्जास्पद स्थितीत चालावे लागणार नाही.”

  23. प्रकटीकरण १६:१६सुमारे इ.स. ९६

    मग त्या तिघांनी जगातील सर्व राजांना, हिब्रू भाषेत हर्मगिदोन म्हटलेल्या ठिकाणी एकत्र केले.

  24. प्रकटीकरण १६:१७सुमारे इ.स. ९६

    मग सातव्या देवदूताने आपली वाटी अंतराळात ओतली; तेव्हा मंदिरात असलेल्या राजासनावरून एक मोठी वाणी निघाली. ती म्हणाली, “पूर्ण झाले आहे!”

  25. प्रकटीकरण १६:१८सुमारे इ.स. ९६

    मग मेघगर्जना, व आकाश दणाणून सोडणारा गडगडाट झाला. विजा चमकल्या आणि मानवी इतिहासात कधी झाला नव्हता इतका मोठा व तीव्र स्वरुपाचा भूमिकंप झाला.