- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa AD 95
The Revelation
John's vision on Patmos unveils the cosmic victory of the Lamb over evil and the final restoration of all creation.
या कालखंडातील वचने
- प्रकटीकरण १६:१९सुमारे इ.स. ९६
त्या मोठ्या शहराचे तीन भाग झाले. राष्ट्रांची नगरे उद्ध्वस्त झाली. महान बाबिलोन नगरीचे परमेश्वराला स्मरण झाले व त्यांनी तिला त्यांचा क्रोधरूपी द्राक्षारसाचा प्याला प्यावयास लावला.
- प्रकटीकरण १६:२०सुमारे इ.स. ९६
प्रत्येक बेट नाहीसे झाले; पर्वत सपाट झाले.
- प्रकटीकरण १६:२१सुमारे इ.स. ९६
प्रत्येकी सुमारे पन्नास कि.ग्रॅ. वजनाच्या प्रचंड गारा आकाशातून माणसांवर पडल्या. गारांच्या पीडांमुळे लोकांनी परमेश्वराला शाप दिले, कारण त्या गारांची पीडा फार भयानक होती.
- प्रकटीकरण १७:१सुमारे इ.स. ९६
पीडांची वाटी ओतणार्या त्या सात देवदूतांपैकी एक देवदूत माझ्याकडे आला व मला म्हणाला, “माझ्याबरोबर ये, म्हणजे मी तुला अनेक जलप्रवाहांवर बसलेल्या त्या मोठ्या वेश्येचा न्याय कसा होणार आहे ते दाखवेन.
- प्रकटीकरण १७:२सुमारे इ.स. ९६
पृथ्वीवरील राजांनी तिच्याशी व्यभिचार केला आणि पृथ्वीवरील लोक त्यांच्या जारकर्माचे मद्य पिऊन झिंगले.”
- प्रकटीकरण १७:३सुमारे इ.स. ९६
नंतर मी आत्म्याने संचरित असताना देवदूताने मला रानात नेले. तिथे किरमिजी रंगाचे श्वापद व त्यावर परमेश्वर निंदात्मक नावे असून त्याला सात डोकी व दहा शिंगे होती व एक स्त्री त्यावर बसलेली मला दिसली.
- प्रकटीकरण १७:४सुमारे इ.स. ९६
त्या स्त्रीने जांभळी व किरमिजी वस्त्रे घातली होती आणि सोने, मौल्यवान रत्ने व मोती यांनी ती शृंगारलेली होती. तिच्या हातात अमंगळ पदार्थांनी आणि तिच्या जारकर्मांच्या अशुद्धतेने भरलेला सोन्याचा प्याला होता.
- प्रकटीकरण १७:५सुमारे इ.स. ९६
तिच्या कपाळावर लिहिलेले नाव एक गूढ अर्थाचे होते: महान बाबिलोन, पृथ्वीवरील वेश्यांची व अमंगळ गोष्टींची माता.
- प्रकटीकरण १७:६सुमारे इ.स. ९६
मी बघितले की येशूंसाठी हुतात्मे झालेल्या पवित्र लोकांचे रक्त पिऊन ती झिंगली होती. अचंबित होऊन मी तिच्याकडे पाहत राहिलो.
- प्रकटीकरण १७:७सुमारे इ.स. ९६
तेव्हा देवदूत मला म्हणाले: “तू एवढा आश्चर्यचकित का झालास? ती स्त्री कोण आहे आणि ज्या सात डोक्यांच्या आणि दहा शिंगांच्या पशूवर ती स्वार झाली आहे, तो पशू कोण आहे, याचे रहस्य मी तुला सांगतो.
- प्रकटीकरण १७:८सुमारे इ.स. ९६
तो पशू जो तुम्ही पाहिला होता, जो होता, पण आता नाही. तरी लवकरच तो अथांग कूपातून वर येईल आणि सार्वकालिक विनाशाकडे जाईल. पृथ्वीवरील लोकांपैकी ज्यांची नावे जगाच्या उत्पत्तीपासून जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली नाहीत, ते सर्व लोक पशूला पाहून थक्क होतील. जो पूर्वी होता, आता नाही, पण पुन्हा परत येणार.
- प्रकटीकरण १७:९सुमारे इ.स. ९६
“हे समजण्यासाठी ज्ञानाची आवश्यकता आहे. ती सात डोकी म्हणजे सात टेकड्या आहेत त्यावर ती स्त्री बसते.
- प्रकटीकरण १७:१०सुमारे इ.स. ९६
त्याचप्रमाणे ती सात डोकी, सात राजांची प्रतिके आहेत. त्यापैकी पाच राजे आधी पतन पावले आहेत. सध्या सहावा राजा राज्य करीत आहे आणि सातवा अजून यावयाचा आहे; पण त्याची कारकीर्द अल्पकाळच टिकेल.
- प्रकटीकरण १७:११सुमारे इ.स. ९६
जो पशू आधी होता, पण आता नाही, तो आठवा राजा असून, सातापैकी एक आहे, नंतर त्याचाही नाश होईल.
- प्रकटीकरण १७:१२सुमारे इ.स. ९६
“त्या पशूची दहा शिंगे म्हणजे दहा राजे असून, ते अजून सत्तेवर आलेले नाहीत. त्यांनीही या पशूबरोबर राज्य करावे, म्हणून त्यांना एका तासापुरती सत्ता देण्यात येईल.
- प्रकटीकरण १७:१३सुमारे इ.स. ९६
त्या सर्वांचा एकच उद्देश आहे, ते पशूला आपले सामर्थ्य व अधिकार बहाल करतील.
- प्रकटीकरण १७:१४सुमारे इ.स. ९६
ते सर्वजण मिळून कोकर्या विरुद्ध युद्ध पुकारतील. परंतु कोकरा त्यांच्यावर विजय मिळवेल, कारण तो प्रभूंचा प्रभू आणि राजांचा राजा आहे आणि त्यांनी पाचारण केलेले, निवडलेले आणि विश्वासू अनुयायी त्यांच्याबरोबर असतील.”
- प्रकटीकरण १७:१५सुमारे इ.स. ९६
तेव्हा देवदूत मला म्हणाला, “ती वेश्या ज्यांच्यावर बसली आहे, ते जलप्रवाह म्हणजे प्रत्येक लोक, समुदाय, राष्ट्र व भाषा आहेत.
- प्रकटीकरण १७:१६सुमारे इ.स. ९६
तो पशू व जी दहा शिंगे तू पाहिली, ते वेश्येचा द्वेष करतात; ते तिच्यावर हल्ला करतील आणि तिला नग्न करून तिचे मांस खातील व तिला अग्नीने जाळून टाकतील.
- प्रकटीकरण १७:१७सुमारे इ.स. ९६
कारण परमेश्वर आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी त्यांच्या मनात एक योजना घालेल. आपले सर्व अधिकार परमेश्वराचे वचन पूर्ण होईपर्यंत त्या शेंदरी पशूला देण्याचे ते एकमताने आपसात ठरवतील.
- प्रकटीकरण १७:१८सुमारे इ.स. ९६
तुझ्या दृष्टान्तात तू पाहिलेली स्त्री, पृथ्वीच्या राजांवर सत्ता गाजवणार्या महानगरीचे दर्शक आहे.”
- प्रकटीकरण १८:१सुमारे इ.स. ९६
त्यानंतर स्वर्गातून दुसरा एक देवदूत खाली उतरतांना मी पाहिला. त्याला मोठा अधिकार देण्यात आला होता. त्याच्या प्रखर तेजाने पृथ्वी उजळून निघाली.
- प्रकटीकरण १८:२सुमारे इ.स. ९६
तो देवदूत मोठ्याने ओरडून म्हणाला: “ ‘पडले! महान बाबिलोन शहर पडले!’ ती भुतांची वस्ती व सर्वप्रकारच्या अशुद्ध आत्म्यांचा आश्रय, व सर्वप्रकारच्या गलिच्छ, ओंगळ पक्ष्यांचा आश्रय अशी झाली आहे!
- प्रकटीकरण १८:३सुमारे इ.स. ९६
तिच्या व्यभिचाराचे वेड लावणारे द्राक्षमद्य सर्व राष्ट्रांनी प्राशन केले आहे. पृथ्वीवरील राजांनी तिच्याशी जारकर्म केले आहे, आणि जगातील व्यापारी तिच्या भोग विलासी धनामुळे श्रीमंत झाले आहेत.”
- प्रकटीकरण १८:४सुमारे इ.स. ९६
मग मी स्वर्गातून निघालेली दुसरी एक वाणी ऐकली, ती म्हणाली: “ ‘माझ्या लोकांनो, तिच्यापासून दूर व्हा,’ तिच्या पापात वाटेकरी होऊ नका, नाही तर, तिच्याबरोबर तुम्हालाही पीडा भोगावी लागेल.