- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa AD 95
The Revelation
John's vision on Patmos unveils the cosmic victory of the Lamb over evil and the final restoration of all creation.
या कालखंडातील वचने
- प्रकटीकरण १३:१५सुमारे इ.स. ९६
या पहिल्या पशूच्या मूर्तीमध्ये प्राण घालून तिला बोलण्याची शक्ती देण्याचीही दुसर्या पशूला परवानगी देण्यात आली होती. मग खुद्द त्या मूर्तीनेच हुकूम सोडला: “जो कोणी त्या पशूच्या मूर्तीला नमन करण्याचे नाकारील, त्याला ठार मारले जाईल.”
- प्रकटीकरण १३:१६सुमारे इ.स. ९६
त्याने असेही फर्मान काढले की लहान थोर, श्रीमंत व गरीब, स्वतंत्र व दास या सर्वांनी आपल्या उजव्या हातावर किंवा कपाळावर एक खूण गोंदून घ्यावी.
- प्रकटीकरण १३:१७सुमारे इ.स. ९६
त्या पहिल्या पशूची खूण किंवा त्याच्या नावाचा सांकेतिक आकडा त्यांच्यावर असल्याशिवाय कोणालाही विकत घेता येणार नाही किंवा विकता येणार नाही.
- प्रकटीकरण १३:१८सुमारे इ.स. ९६
हे समजण्यासाठी सुज्ञतेची आवश्यकता आहे. कोणाजवळ अंतर्ज्ञान असेल, तर त्याने त्या पशूच्या संख्येचा हिशोब करावा, कारण ती एका मनुष्याच्या नावाची सांकेतिक संख्या आहे. ती संख्या 666 अशी आहे.
- प्रकटीकरण १४:१सुमारे इ.स. ९६
नंतर सीयोन पर्वतावर एक कोकरा उभा असलेला मी पाहिला. ज्यांच्या कपाळावर त्यांचे व त्यांच्या पित्याचे नाव लिहिले होते, असे 1,44,000 लोक त्याच्याबरोबर होते.
- प्रकटीकरण १४:२सुमारे इ.स. ९६
मग मी स्वर्गातून तो मोठ्या धबधब्याच्या गर्जनेसारखा आणि मेघांच्या मोठ्या गडगडाटासारखा एक ध्वनी ऐकला. तो अनेक वीणावादक आपआपल्या वीणा वाजवित असल्यासारखा होता.
- प्रकटीकरण १४:३सुमारे इ.स. ९६
लोकांचा हा अतिभव्य गायकवृंद परमेश्वराचे राजासन, चार सजीव प्राणी व चोवीस वडीलजन यांच्यासमोर एक नवे गीत गात होता. पृथ्वीवरून खंडणी भरून सोडविलेल्या या 1,44,000 लोकांशिवाय दुसर्या कोणालाही हे गाणे शिकता येत नव्हते.
- प्रकटीकरण १४:४सुमारे इ.स. ९६
कारण त्यांनी स्वतःला शुद्ध राखलेले आहे आणि स्त्रीसंगाने ते मलीन झालेले नाहीत. जिथे कुठे कोकरा जातो, तिथे ते त्याच्यामागे जातात. त्यांना माणसातून विकत घेण्यात आले होते आणि परमेश्वराला व कोकर्याला प्रथमफळ म्हणून अर्पण केले होते.
- प्रकटीकरण १४:५सुमारे इ.स. ९६
असत्य भाषण कधीही त्यांच्या मुखातून निघाले नाही; ते निष्कलंक आहेत.
- प्रकटीकरण १४:६सुमारे इ.स. ९६
नंतर मी अंतराळाच्या मध्यभागी दुसरा एक देवदूत उडतांना पाहिला. पृथ्वीवर राहणार्या सर्वांना, म्हणजे प्रत्येक राष्ट्र, वंश, भाषा व लोकांना सांगण्यासाठी तो सर्वकालची शुभवार्ता घेऊन चालला होता.
- प्रकटीकरण १४:७सुमारे इ.स. ९६
तो मोठ्या आवाजात म्हणाला, “परमेश्वराचे भय धरा व त्यांना गौरव द्या! कारण त्यांनी न्यायनिवाडा करावा अशी वेळ आता आली आहे. ज्यांनी आकाश, पृथ्वी, समुद्र आणि पाण्याचे झरे निर्माण केले, त्यांची उपासना करा.”
- प्रकटीकरण १४:८सुमारे इ.स. ९६
तेव्हा त्याच्या पाठोपाठ दुसरा एक देवदूत आला. तो म्हणत होता, “ ‘पडले! महान बाबिलोन शहर पडले!’ ज्या शहराने सर्व राष्ट्रांना आपल्या व्यभिचाराचे वेड लावणारे द्राक्षमद्य पाजले, ते पडले.”
- प्रकटीकरण १४:९सुमारे इ.स. ९६
मग त्यांच्यामागून एक तिसरा देवदूत मोठ्याने घोषणा करीत आला: “समुद्रातील पहिल्या पशूला व त्याच्या मूर्तीला जो कोणी नमन करेल आणि त्याचे चिन्ह आपल्या कपाळावर किंवा हातावर गोंदून घेईल,
- प्रकटीकरण १४:१०सुमारे इ.स. ९६
त्या प्रत्येकाला परमेश्वराच्या क्रोधाचा द्राक्षमद्याचा प्याला, त्याची तीव्रता कमी न करता प्यावा लागेल. पवित्र देवदूत व कोकरा यांच्यासमक्ष या सर्वांचा जळत्या गंधकाने छळ करण्यात येईल.
- प्रकटीकरण १४:११सुमारे इ.स. ९६
त्यांच्या छळाचा धूर युगानुयुग वर चढत राहील आणि त्यातून त्यांची रात्री किंवा दिवसा कधीच सुटका होत नाही. कारण त्यांनी त्या पहिल्या पशूला व त्याच्या मूर्तीला नमन केले, आणि त्याच्या नावाची सांकेतिक खूण गोंदून घेतली.
- प्रकटीकरण १४:१२सुमारे इ.स. ९६
कारण येशूंवर विश्वास ठेवणारे व अखेरपर्यंत परमेश्वराच्या आज्ञा पाळणार्या पवित्र लोकांना यामुळे धीराने प्रत्येक छळ सहन करण्याची आता आवश्यकता आहे.”
- प्रकटीकरण १४:१३सुमारे इ.स. ९६
मग मला आकाशातून एक वाणी ऐकू आली. ती मला म्हणाली “हे लिही: आतापासून प्रभूमध्ये मृत झालेले ते धन्य.” आत्मा म्हणतो, “होय, कारण आता सर्व श्रमापासून त्यांना विश्रांती मिळेल. त्यांची सत्कृत्ये त्यांच्या मागोमाग जातील.”
- प्रकटीकरण १४:१४सुमारे इ.स. ९६
मग मी पाहिले तो मला एक पांढरा मेघ दिसला, त्या मेघावर मनुष्याच्या पुत्रासारखे कोणी एक बसले होते. त्यांच्या मस्तकावर सोन्याचा मुकुट व हातात धारदार विळा होता.
- प्रकटीकरण १४:१५सुमारे इ.स. ९६
मग मंदिरातून एक देवदूत बाहेर आला व मेघावर बसलेल्यास उच्चस्वराने हाक मारून म्हणाला, “तुमचा विळा घ्या आणि कापणीस प्रारंभ करा, कारण पृथ्वीचे पीक तयार झाले आहे व कापणी करण्याची वेळ आली आहे.”
- प्रकटीकरण १४:१६सुमारे इ.स. ९६
तेव्हा मेघावर बसलेल्याने आपला विळा पृथ्वीवर चालविला आणि पृथ्वीची कापणी झाली.
- प्रकटीकरण १४:१७सुमारे इ.स. ९६
यानंतर स्वर्गातील मंदिरातून आणखी एक देवदूत निघाला आणि त्याच्याजवळही एक धारदार विळा होता.
- प्रकटीकरण १४:१८सुमारे इ.स. ९६
दुसरा एक देवदूत ज्याला अग्नीवर अधिकार होता तो वेदीतून बाहेर आला आणि विळा घेतलेल्या देवदूताला मोठ्याने म्हणाला, “पृथ्वीवरील द्राक्षवेलींना लागलेले द्राक्षांचे घोस, विळा चालवून कापून घे. कारण ते पिकले आहेत.”
- प्रकटीकरण १४:१९सुमारे इ.स. ९६
तेव्हा त्या देवदूताने पृथ्वीवर आपला विळा चालविला आणि द्राक्षे गोळा करून, रस काढण्यासाठी ती परमेश्वराच्या क्रोधाच्या मोठ्या द्राक्षकुंडात टाकली.
- प्रकटीकरण १४:२०सुमारे इ.स. ९६
ते द्राक्षकुंड शहराबाहेर तुडविण्यात आले, तेव्हा त्यातून रक्ताचा पाट वाहिला. हा पाट घोड्यांच्या लगामा एवढा उंच आणि तीनशे किलोमीटर लांब होता.
- प्रकटीकरण १५:१सुमारे इ.स. ९६
आणि मी स्वर्गात आणखी एक महान व आश्चर्यकारक चिन्ह पाहिले: अखेरच्या सात पीडा घेतलेले सात देवदूत. त्या पीडानंतर परमेश्वराचा क्रोध समाप्त झाला.