- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa AD 95
The Revelation
John's vision on Patmos unveils the cosmic victory of the Lamb over evil and the final restoration of all creation.
या कालखंडातील वचने
- प्रकटीकरण १२:७सुमारे इ.स. ९६
मग स्वर्गात युद्ध सुरू झाले. मिखाएल व त्याचे दूत अजगराविरूद्ध लढले आणि त्यांच्याबरोबर अजगर व त्याच्या दूतांनी युद्ध केले.
- प्रकटीकरण १२:८सुमारे इ.स. ९६
पुरेसे सामर्थ्य नसल्यामुळे युद्धात त्यांचा पराजय झाला आणि ते स्वर्गातील त्यांचे स्थान हरवून बसले.
- प्रकटीकरण १२:९सुमारे इ.स. ९६
तो प्रचंड अजगर, म्हणजे दियाबल किंवा सैतान म्हटलेला, सर्व जगाला फसविणारा प्राचीन सर्प, याला त्याच्या सर्व दूतांसह पृथ्वीवर लोटून देण्यात आले.
- प्रकटीकरण १२:१०सुमारे इ.स. ९६
तेव्हा स्वर्गातून आलेली एक उच्च स्वरातील वाणी मी ऐकली. ती म्हणाली, “परमेश्वराचे तारण, सामर्थ्य व त्यांचे राज्य आणि त्यांच्या ख्रिस्ताचा अधिकार यांचा उदय झाला आहे; कारण आमच्या बंधुजनावर आरोप ठेवणार्याला स्वर्गातून पृथ्वीवर ढकलून दिले आहे. तो रात्रंदिवस आमच्या परमेश्वरासमोर त्यांच्यावर दोषारोप करीत असे!
- प्रकटीकरण १२:११सुमारे इ.स. ९६
पण आमच्या बंधुजनांनी कोकराच्या रक्ताने आणि आपल्या साक्षीच्या वचनाने त्याचा पाडाव केला. स्वतःच्या जिवावर प्रेम न करता त्यांनी मरण सोसले.
- प्रकटीकरण १२:१२सुमारे इ.स. ९६
म्हणून अहो स्वर्गांनो व स्वर्गातील नागरिकांनो, उल्लास करा! पण पृथ्वी व समुद्रा तुम्हाला हाय, हाय! कारण आता आपल्यासाठी अगदीच थोडका काळ बाकी आहे, हे ओळखून सैतान अतिशय क्रोधाविष्ट होऊन तुमच्याकडे आला आहे.”
- प्रकटीकरण १२:१३सुमारे इ.स. ९६
आपल्याला पृथ्वीवर लोटून दिले आहे हे अजगराच्या लक्षात आले, तेव्हा जिने पुरुष संतानाला जन्म दिला होता, त्या स्त्रीचा त्याने पाठलाग केला.
- प्रकटीकरण १२:१४सुमारे इ.स. ९६
पण तिच्यासाठी अरण्यात तयार केलेल्या जागी तिने उडून जावे म्हणून तिला मोठ्या गरुडाच्या पंखांसारखे दोन पंख देण्यात आले. तिथे तिचे साडेतीन वर्षे पोषण व त्या अजगरापासून रक्षण व्हावयाचे होते.
- प्रकटीकरण १२:१५सुमारे इ.स. ९६
तेव्हा त्या स्त्रीचा नायनाट करण्यासाठी त्या सर्पाच्या तोंडातून नदीच्या पाण्यासारखा एक महापूर बाहेर आला व तिच्या रोखाने जोरात वाहत गेला.
- प्रकटीकरण १२:१६सुमारे इ.स. ९६
पण तेवढ्यात पृथ्वीने आपले तोंड उघडले आणि तो महापूर गिळून घेऊन अजगरापासून त्या स्त्रीचा बचाव केला.
- प्रकटीकरण १२:१७सुमारे इ.स. ९६
तेव्हा संतापलेला अजगर त्या स्त्रीच्या इतर मुलांना, म्हणजे जी सर्व मुले परमेश्वराच्या आज्ञा पाळीत आणि आपण येशूंचे आहोत अशी साक्ष देत असत, त्यांच्यावर हल्ला करण्यास सिद्ध झाला.
- प्रकटीकरण १३:१सुमारे इ.स. ९६
तो अजगर वाट पाहत समुद्रकिनार्यावर उभा राहिला. मग मी माझ्या दृष्टान्तात एक विचित्र पशू समुद्रातून वर चढून येताना पाहिला. त्याला सात डोकी व दहा शिंगे होती. या शिंगावर दहा मुकुट होते. त्या पशूच्या प्रत्येक डोक्यावर परमेश्वर निंदक नावे लिहिलेली होती.
- प्रकटीकरण १३:२सुमारे इ.स. ९६
हा पशू दिसावयास चित्त्यासारखा होता, पण त्याचे पाय अस्वलासारखे व तोंड सिंहासारखे होते. अजगराने त्याला स्वतःचे सामर्थ्य, आसन व मोठा अधिकार दिला.
- प्रकटीकरण १३:३सुमारे इ.स. ९६
त्याच्या एका डोक्यावर प्राणघातक जखम झाल्यासारखे मला दिसले. पण ती प्राणघातक जखम बरी झाली. या चमत्काराने सारे जग आश्चर्यचकित झाले आणि त्या पशूला अनुसरले.
- प्रकटीकरण १३:४सुमारे इ.स. ९६
त्या अजगराने दुष्ट पशूला अधिकार दिले म्हणून लोक अजगराची आणि त्या दुष्ट पशूचीही उपासना करू लागले. त्यांनी उद्गार काढले, “याच्यासारखा महान कोणी आहे काय? याच्याशी युद्ध करण्यास कोणी समर्थ आहे काय?”
- प्रकटीकरण १३:५सुमारे इ.स. ९६
त्या पशूला गर्विष्ठ उद्गार काढणारे, दुर्भाषणे करणारे तोंड देण्यात आले होते. तसेच बेचाळीस महिने आपला अधिकार गाजविण्याचे त्याला स्वातंत्र्य देण्यात आले होते.
- प्रकटीकरण १३:६सुमारे इ.स. ९६
तो पशू परमेश्वराचे नाव, मंदिर व स्वर्गात निवास करणार्या सर्वांची निंदा करीत राहिला.
- प्रकटीकरण १३:७सुमारे इ.स. ९६
अजगराने त्याला परमेश्वराच्या पवित्र लोकांविरुद्ध लढून त्यांच्यावर विजय मिळविण्याचे सामर्थ्य दिले. आणि प्रत्येक वंश, लोक, भाषा व राष्ट्रे यावर सत्ता गाजविण्याचा त्याला अधिकार दिला.
- प्रकटीकरण १३:८सुमारे इ.स. ९६
पृथ्वीवरील ते सर्व लोक ज्यांची नावे जगाच्या उत्पत्तीपासून वधलेल्या कोकराच्या जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली नाहीत ते त्या पशूची उपासना करतील.
- प्रकटीकरण १३:९सुमारे इ.स. ९६
ज्याला ऐकावयास कान आहे, त्या प्रत्येकाने ऐकावे:
- प्रकटीकरण १३:१०सुमारे इ.स. ९६
“जर कोणाला तुरुंगवास घडणार असेल, तर ते तुरुंगवासात जातील. जर एखाद्याला तलवारीने ठार मारणे आहे, तर तलवारीने ते मारले जातील.” परमेश्वराच्या लोकांनी धीराने सहन करण्याची व आपला दृढविश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे.
- प्रकटीकरण १३:११सुमारे इ.स. ९६
मग मी दुसरा एक पशू पाहिला. तो पृथ्वीतून वर येत होता. त्याला कोकर्याच्या शिंगांसारखी दोन शिंगे होती, पण त्याचा आवाज अजगरासारखा होता.
- प्रकटीकरण १३:१२सुमारे इ.स. ९६
प्राणघातक जखम बरी झालेल्या त्या पहिल्या पशूच्या प्रतिनिधी सारखा सर्व अधिकार त्याने चालविला व सर्व जगास त्या पहिल्या पशूला नमन करविले.
- प्रकटीकरण १३:१३सुमारे इ.स. ९६
त्याने महान चमत्कार केले, सर्वांच्या डोळ्यांदेखत आकाशातून पृथ्वीवर अग्निज्वाला आणल्या.
- प्रकटीकरण १३:१४सुमारे इ.स. ९६
कारण पहिल्या पशूच्या प्रतिनिधी प्रमाणे या पशूने अद्भुत चिन्हे करून पृथ्वीवरील रहिवाशांना फसविले. तलवारीने प्राणांतिक जखम होऊनही पुन्हा जिवंत झालेल्या त्या पहिल्या पशूची मोठी मूर्ती उभारावी, असा त्याने जगातील लोकांना हुकूम केला.