मुख्य मजकुरावर जा

circa AD 95

The Revelation

John's vision on Patmos unveils the cosmic victory of the Lamb over evil and the final restoration of all creation.

404 वचने · 1 पुस्तक समाविष्ट

या कालखंडातील वचने

  1. प्रकटीकरण २०:१०सुमारे इ.स. ९६

    मग त्यांचा विश्वासघात करणार्‍या सैतानाला ज्या सरोवरात तो पशू आणि खोट्या संदेष्ट्यांना आधी टाकले आहे, त्या अग्नीच्या व जळत्या गंधकाच्या सरोवरात पुन्हा टाकण्यात येईल. तिथे त्यांना रात्रंदिवस, युगानुयुग यातना भोगाव्या लागतील.

  2. प्रकटीकरण २०:११सुमारे इ.स. ९६

    मग एक भव्य शुभ्र राजासन व त्यावर बसलेला एकजण माझ्या दृष्टीस पडला. तेव्हा पृथ्वी व आकाशांनी त्यांच्या समोरून पळ काढला आणि त्यांना कुठेही जागा मिळाली नाही.

  3. प्रकटीकरण २०:१२सुमारे इ.स. ९६

    मग मृत झालेले लहान थोर परमेश्वराच्या आसनासमोर उभे असलेले मी पाहिले आणि पुस्तके उघडण्यात आली. आणखी एक पुस्तक उघडण्यात आले जे जीवनाचे पुस्तक होते. पुस्तकात लिहिल्यानुसार प्रत्येकाच्या कृत्यांप्रमाणे त्यांचा न्याय करण्यात आला.

  4. प्रकटीकरण २०:१३सुमारे इ.स. ९६

    जे लोक समुद्रात मरण पावले होते, त्यांना समुद्रांनी परत दिले. पृथ्वी व अधोलोक यांनीही आपल्यातील मृतांना बाहेर सोडले. त्या प्रत्येकाच्या कृत्यांप्रमाणे त्यांचा न्याय करण्यात आला.

  5. प्रकटीकरण २०:१४सुमारे इ.स. ९६

    मरण व अधोलोक ही अग्नीच्या सरोवरात टाकण्यात आली. अग्नीचे सरोवर म्हणजेच दुसरे मरण होय.

  6. प्रकटीकरण २०:१५सुमारे इ.स. ९६

    जीवनाच्या पुस्तकात ज्या कोणाचे नाव लिहिलेले सापडले नाही, त्याला अग्नीच्या सरोवरात टाकण्यात आले.

  7. प्रकटीकरण २१:१सुमारे इ.स. ९६

    नंतर मी, “एक नवी पृथ्वी व एक नवे आकाश” पाहिले, कारण पहिले आकाश व पहिल्या पृथ्वीचे अस्तित्व राहिले नसून त्यात समुद्र अस्तित्वात नव्हते.

  8. प्रकटीकरण २१:२सुमारे इ.स. ९६

    तेव्हा मी नवे यरुशलेम म्हणजे पवित्र नगरी, स्वर्गातून परमेश्वरापासून उतरतांना पाहिली, ती वरासाठी शृंगारलेल्या वधूप्रमाणे सजविलेली होती.

  9. प्रकटीकरण २१:३सुमारे इ.स. ९६

    राजासनावरून मला एक मोठी वाणी ऐकू आली. ती म्हणाली, “पाहा! परमेश्वराचे वसतिस्थान आता मनुष्यांबरोबर आहे; ते स्वतः त्यांच्याबरोबर राहतील; ते त्यांचे लोक होतील; आणि ते त्यांचे परमेश्वर होतील.

  10. प्रकटीकरण २१:४सुमारे इ.स. ९६

    ‘ते त्यांच्या डोळ्यांतील प्रत्येक अश्रू पुसून टाकतील आणि आता मृत्यू,’ दुःख, रडणे व वेदना अस्तित्वात राहणार नाहीत. या सर्व जुन्या गोष्टी कायमच्या नाहीशा झाल्या आहेत.”

  11. प्रकटीकरण २१:५सुमारे इ.स. ९६

    जे राजासनावर बसले होते ते म्हणाले, “मी सर्वकाही नवीन करीत आहे!” मग ते म्हणाले, “हे लिहून घे; कारण ही वचने विश्वसनीय आणि सत्य आहेत.”

  12. प्रकटीकरण २१:६सुमारे इ.स. ९६

    ते मला म्हणाले, “सर्वकाही पूर्ण झाले आहे! मीच अल्फा व ओमेगा, प्रारंभ आणि शेवट आहे. तान्हेल्या सर्व लोकांना मी जीवनाच्या झर्‍याचे पाणी मोफत देईन.

  13. प्रकटीकरण २१:७सुमारे इ.स. ९६

    जो विजय मिळवितो त्याला या सर्व गोष्टींचा वारसा मिळेल. मी त्यांचा परमेश्वर होईन आणि ते माझी संतती होतील.

  14. प्रकटीकरण २१:८सुमारे इ.स. ९६

    परंतु भेकड, विश्वासहीन, अशुद्ध, खून करणारे, जारकर्मी, चेटकी, मूर्तिपूजक व सर्व लबाड—अशा माणसांच्या वाट्यास अग्नीचे व गंधकाचे सरोवर येईल. हेच ते दुसरे मरण होय.”

  15. प्रकटीकरण २१:९सुमारे इ.स. ९६

    मग शेवटच्या सात पीडांनी भरलेल्या वाट्या ओतणार्‍या सात देवदूतांपैकी एक देवदूत माझ्याकडे येऊन मला म्हणाला, “चल, माझ्याबरोबर ये, म्हणजे मी तुला वधू—कोकर्‍याची पत्नी दाखवितो.”

  16. प्रकटीकरण २१:१०सुमारे इ.स. ९६

    तेव्हा मी आत्म्याने संचारित झालो आणि मला एका उंच व विशाल अशा पर्वतशिखरावर नेण्यात आले. तिथून मी ती पवित्र नगरी म्हणजे यरुशलेम, स्वर्गातून परमेश्वरापासून उतरतांना पाहिली.

  17. प्रकटीकरण २१:११सुमारे इ.स. ९६

    ती परमेश्वराच्या गौरवाने भरली होती, एखाद्या रत्नाप्रमाणे चमकत होती; यास्फे खड्यासारखी स्फटीकशुभ्र होती.

  18. प्रकटीकरण २१:१२सुमारे इ.स. ९६

    तिचे तट रुंद व उंच होते. तिला बारा मोठमोठ्या वेशी असून त्यावर बारा देवदूत पहारा करीत होते. त्या वेशींवर इस्राएलच्या बारा वंशांची नावे लिहिलेली होती.

  19. प्रकटीकरण २१:१३सुमारे इ.स. ९६

    उत्तरेकडे तीन, दक्षिणेकडे तीन, पूर्वेकडे तीन व पश्चिमेकडे तीन वेशी होत्या.

  20. प्रकटीकरण २१:१४सुमारे इ.स. ९६

    नगरीच्या तटबंदीला बारा पाये होते. या पायांवर कोकर्‍याच्या बारा प्रेषितांची नावे लिहिलेली होती.

  21. प्रकटीकरण २१:१५सुमारे इ.स. ९६

    नगरी, वेशी व तटबंदी यांचे मोजमाप घेण्यासाठी देवदूताच्या हातामध्ये सोन्याची एक मोजकाठी होती.

  22. प्रकटीकरण २१:१६सुमारे इ.स. ९६

    ती नगरी चौरस होती. म्हणजे तिची लांबी जितकी होती तितकीच तिची रुंदी होती, देवदूताने नगरीचे माप काठीने घेतले. ते लांबीला 2,200 किलोमीटर भरले. तिची रुंदी व उंची समान होती.

  23. प्रकटीकरण २१:१७सुमारे इ.स. ९६

    मग त्याने भिंतीची जाडी मोजली. ती या टोकापासून त्या टोकापर्यंत 65 मीटर होती. देवदूताने मानवी परिमाणांत ही तटबंदी मोजली.

  24. प्रकटीकरण २१:१८सुमारे इ.स. ९६

    नगरीचा तट यास्फे रत्नाचा होता आणि ती शुद्ध काचेसारख्या पारदर्शक सोन्याची होती.

  25. प्रकटीकरण २१:१९सुमारे इ.स. ९६

    तिच्या तटाच्या पायाचे बारा थर होते. ते रत्नजडित शीलांनी बांधलेले होते. पहिला थर यास्फे रत्नाचा, दुसरा नीलमण्याचा, तिसरा स्फटिकचा, चौथा पाचूचा,