circa 6 BC – AD 30
The Life of Jesus
The eternal Son of God enters history: born in Bethlehem, baptized in the Jordan, crucified at Golgotha, raised on the third day.
या कालखंडातील वचने
- लूक ४:३२सुमारे इ.स. २७
येथेही लोक त्यांच्या शिकवणीवरून थक्क झाले, कारण त्यांच्या शब्दांमध्ये अधिकार होता.
- लूक ४:३३सुमारे इ.स. २७
सभागृहामध्ये भुताने पछाडलेला, अशुद्ध आत्मा लागलेला, एक मनुष्य होता तो उच्चस्वराने म्हणाला,
- लूक ४:३४सुमारे इ.स. २७
“नासरेथकर येशू येथून निघून जा! तुम्हाला आमच्याशी काय काम? आमचा नाश करावयास आले आहात काय? तुम्ही कोण आहात हे मला माहीत आहे—परमेश्वराचा पवित्रजन!”
- लूक ४:३५सुमारे इ.स. २७
“गप्प राहा!” येशूंनी धमकाविले, “यातून बाहेर ये!” मग त्या भुताने त्या मनुष्याला सर्वांसमोर खाली पाडले आणि त्याला काहीही उपद्रव न करता तो निघून गेला.
- लूक ४:३६सुमारे इ.स. २७
सर्व लोक चकित झाले आणि आपसात म्हणू लागले, “हे काय आहे! काय हा अधिकार आणि त्यांच्या शक्तीने ते अशुद्ध आत्म्यांना आदेश देतात व ते बाहेर येतात!”
- लूक ४:३७सुमारे इ.स. २७
त्यांच्याबद्दलची बातमी त्या आसपासच्या प्रदेशात पसरत गेली.
- लूक ४:३८सुमारे इ.स. २७
येशू सभागृहातून बाहेर पडल्यानंतर शिमोनाच्या घरी गेले. तिथे शिमोनाची सासू तापाने फणफणली होती, तिला मदत करावी असे त्यांनी येशूंना सांगितले.
- लूक ४:३९सुमारे इ.स. २७
त्यांनी तिच्यावर वाकून तापाला धमकाविले व तिचा ताप नाहीसा झाला. ती लगेच उठली आणि त्यांची सेवा करू लागली.
- लूक ४:४०सुमारे इ.स. २७
सूर्यास्ताच्या वेळी, लोकांनी ज्यांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार होते त्या सर्वांना येशूंकडे आणले आणि त्यांनी त्या प्रत्येकावर हात ठेऊन त्यांना बरे केले.
- लूक ४:४१सुमारे इ.स. २७
याशिवाय, लोकांमधून पुष्कळ भुतेही, “तुम्ही परमेश्वराचा पुत्र आहात!” असे ओरडून बाहेर आले. येशूंनी त्यांना धमकाविले व बोलण्यास सक्त मनाई केली, कारण ते ख्रिस्त आहे, हे त्यांना माहीत होते.
- लूक ४:४२सुमारे इ.स. २७
पहाटेच, येशू एकांतस्थळी गेले. लोक त्यांना शोधीत जिथे ते होते तिथे गेले. तेव्हा येशू त्यांना सोडून निघून जाऊ नये म्हणून प्रयत्न केले.
- लूक ४:४३सुमारे इ.स. २७
पण त्यांनी उत्तर दिले, “मला परमेश्वराच्या राज्याची शुभवार्ता दुसर्या गावांमध्येही सांगितली पाहिजे, कारण त्यासाठीच मला पाठविले आहे.”
- लूक ४:४४सुमारे इ.स. २७
आणि ते सर्व यहूदीया प्रांतातील प्रत्येक सभागृहांमध्ये उपदेश करीत राहिले.
- लूक ५:१सुमारे इ.स. ३१
एके दिवशी येशू गनेसरेत सरोवराच्या किनार्यावर उभे होते, परमेश्वराचे वचन ऐकण्यासाठी लोकांनी त्यांच्याभोवती गर्दी केली.
- लूक ५:२सुमारे इ.स. ३१
त्यांनी पाण्याच्या कडेला कोळ्यांनी ठेवलेल्या दोन होड्या पाहिल्या, कारण कोळी आपली जाळी धूत होते.
- लूक ५:३सुमारे इ.स. ३१
त्यापैकी एका होडीत ते बसले जी शिमोनाची होती आणि ती काठापासून थोडीशी बाजूला करावी असे त्यांनी शिमोनाला सांगितले. मग त्या होडीत बसून त्यांनी लोकांना शिक्षण दिले.
- लूक ५:४सुमारे इ.स. ३१
येशूंनी आपले बोलणे संपविल्यानंतर, ते शिमोनास म्हणाले, “होडी खोल पाण्यात ने आणि मासे पकडण्यासाठी जाळी टाक.”
- लूक ५:५सुमारे इ.स. ३१
शिमोनाने उत्तर दिले, “गुरुजी, आम्ही रात्रभर परिश्रम केले, पण काहीच हाती लागले नाही. पण तुम्ही सांगता, म्हणून जाळे टाकतो.”
- लूक ५:६सुमारे इ.स. ३१
तसे केल्यानंतर त्यांनी इतक्या मोठ्या संख्येने मासे पकडले की त्यांच्या जाळ्या फाटू लागल्या.
- लूक ५:७सुमारे इ.स. ३१
जे सहकारी दुसर्या होडीत होते, त्यांनी येऊन आपल्याला मदत करावी म्हणून त्यांनी त्यांना इशारा केला आणि लवकरच त्या दोन होड्या माशांनी इतक्या गच्च भरल्या की बुडू लागल्या.
- लूक ५:८सुमारे इ.स. ३१
शिमोन पेत्राने हे पाहिले, तेव्हा त्याने येशूंच्या पुढे गुडघे टेकले आणि म्हणाला, “प्रभू कृपा करून, माझ्यापासून दूर जा, कारण मी पापी मनुष्य आहे!”
- लूक ५:९सुमारे इ.स. ३१
कारण त्यांनी धरलेले पुष्कळ मासे पाहून, तो आणि त्याच्या बरोबरचे इतर जोडीदार आश्चर्यचकित झाले होते;
- लूक ५:१०सुमारे इ.स. ३१
आणि त्याचबरोबर शिमोनाचे भागीदार जब्दीचे पुत्र याकोब आणि योहान यांनाही आश्चर्य वाटले होते. येशू शिमोनाला म्हणाले, “भिऊ नको, येथून पुढे मी तुला माणसे धरणारा करेन.”
- लूक ५:११सुमारे इ.स. ३१
त्यांनी होडी काठाला लावल्यावर सर्वकाही तिथेच सोडले आणि ते त्यांच्यामागे गेले.
- लूक ५:१२सुमारे इ.स. ३१
येशू एका गावात असता एक कुष्ठरोगाने भरलेला मनुष्य तिथे आला. त्याने येशूंना पाहिले, तेव्हा त्यांच्यापुढे गुडघे टेकून म्हणाला, “प्रभू, जर तुमची इच्छा असेल, तर मला शुद्ध करण्यास तुम्ही समर्थ आहात.”