मुख्य मजकुरावर जा

circa 6 BC – AD 30

The Life of Jesus

The eternal Son of God enters history: born in Bethlehem, baptized in the Jordan, crucified at Golgotha, raised on the third day.

3,779 वचने · 4 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. लूक ५:३८सुमारे इ.स. ३१

    तसे होऊ नये, म्हणून नवा द्राक्षारस नवीन बुधल्यांमध्ये ओततात.

  2. लूक ५:३९सुमारे इ.स. ३१

    जुना द्राक्षारस प्याल्यानंतर कोणालाही नवा द्राक्षारस घ्यावासा वाटत नाही. ते म्हणतात, ‘जुना द्राक्षारसच उत्तम आहे.’ ”

  3. लूक ६:१सुमारे इ.स. ३१

    एका शब्बाथ दिवशी येशू धान्याच्या शेतामधून जात होते आणि त्यांचे शिष्य गव्हाची काही कणसे तोडून हातांवर चोळून दाणे खाऊ लागले.

  4. लूक ६:२सुमारे इ.स. ३१

    ते पाहून परूशी म्हणाले, “तुम्ही शब्बाथ दिवशी जे नियमशास्त्राविरुद्ध आहे ते का करता?”

  5. लूक ६:३सुमारे इ.स. ३१

    येशूंनी त्यांना उत्तर दिले, “दावीद आणि त्याच्या सोबत्यांना भूक लागली असता काय केले, हे तुम्ही कधी वाचले नाही काय?

  6. लूक ६:४सुमारे इ.स. ३१

    दावीद परमेश्वराच्या मंदिरात गेला आणि त्याने त्या समर्पित भाकरी खाल्या ज्या भाकरी फक्त याजकांनीच खाव्यात असा नियम होता आणि त्याने त्याच्यातून काही त्याच्या सोबत्यांना सुद्धा दिल्या.”

  7. लूक ६:५सुमारे इ.स. ३१

    मग येशू त्यांना म्हणाले, “मानवपुत्र हा शब्बाथाचाही प्रभू आहे.”

  8. लूक ६:६सुमारे इ.स. ३१

    दुसर्‍या एका शब्बाथ दिवशी सभागृहामध्ये ते शिक्षण देत असताना, उजवा हात वाळून गेलेला असा एक मनुष्य तिथे उपस्थित होता.

  9. लूक ६:७सुमारे इ.स. ३१

    नियमशास्त्राचे शिक्षक आणि परूशी लोक, त्यांच्यावर आरोप ठेवण्यास कारण शोधत होते, शब्बाथ दिवशी येशू त्याला बरे करतात की काय हे पाहण्यासाठी बारकाईने नजर ठेवून होते.

  10. लूक ६:८सुमारे इ.स. ३१

    परंतु येशूंना माहीत होते की ते काय विचार करीत आहेत, तेव्हा त्या वाळलेल्या हाताच्या मनुष्याला म्हणाले, “ऊठ आणि सर्वांसमोर उभा राहा.” तेव्हा तो उठला आणि तिथे उभा राहिला.

  11. लूक ६:९सुमारे इ.स. ३१

    नंतर येशू म्हणाले, “मी तुम्हाला विचारतो, शब्बाथ दिवशी नियमानुसार कोणती गोष्ट योग्य आहे: चांगली कामे करणे किंवा वाईट कामे करणे, एखाद्याचा जीव वाचवणे किंवा त्याचा नाश करणे?”

  12. लूक ६:१०सुमारे इ.स. ३१

    त्यांनी जमलेल्यांकडे आपली नजर फिरविली आणि नंतर ते त्या मनुष्याला म्हणाले, “तुझा हात लांब कर.” त्याने हात लांब केला आणि त्याचा हात पहिल्यासारखा बरा झाला.

  13. लूक ६:११सुमारे इ.स. ३१

    परंतु परूश्यांना व नियमशास्त्र शिक्षकांना क्रोध आला आणि येशूंना जिवे कसे मारता येईल याची त्यांनी एकमेकांबरोबर चर्चा सुरू केली.

  14. लूक ६:१२सुमारे इ.स. ३१

    त्या दिवसांमध्ये प्रार्थना करण्यासाठी येशू डोंगरावर गेले आणि त्यांनी तिथे रात्रभर परमेश्वराची प्रार्थना केली.

  15. लूक ६:१३सुमारे इ.स. ३१

    दिवस उगवताच त्यांनी आपल्या शिष्यांना स्वतःकडे बोलाविले आणि त्यांच्यापैकी बारा जणांना निवडले, ज्यांना त्यांनी प्रेषित पद प्रदान केले:

  16. लूक ६:१४सुमारे इ.स. ३१

    शिमोन, ज्याला पेत्र असे नाव दिले, त्याचा भाऊ आंद्रिया, याकोब, योहान, फिलिप्प, बर्थलमय,

  17. लूक ६:१५सुमारे इ.स. ३१

    मत्तय, थोमा, अल्फीचा पुत्र याकोब, शिमोन कनानी,

  18. लूक ६:१६सुमारे इ.स. ३१

    याकोबाचा पुत्र यहूदाह, आणि यहूदाह इस्कर्योत जो विश्वासघातकी झाला.

  19. लूक ६:१७सुमारे इ.स. ३१

    ते खाली आले आणि एका सपाट मैदानावर उभे राहिले. त्यांच्याभोवती शिष्यांचा मोठा समुदाय आणि यरुशलेम, यहूदीया आणि सोर व सीदोन व उत्तरेकडील समुद्रकिनार्‍यांच्या नगरातूनही आलेले अनेक लोक होते.

  20. लूक ६:१८सुमारे इ.स. ३१

    ते येशूंचे ऐकण्यासाठी व रोगमुक्त होण्यासाठी आले होते. जे अशुद्ध आत्म्याने पीडलेले होते, त्यांनाही त्यांनी बरे केले.

  21. लूक ६:१९सुमारे इ.स. ३१

    प्रत्येकजण त्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करीत होता, कारण त्यांच्यामधून सामर्थ्य बाहेर निघून ते बरे होत.

  22. लूक ६:२०सुमारे इ.स. ३१

    नंतर आपल्या शिष्यांना पाहून म्हणाले: “जे दीन आहेत ते तुम्ही धन्य, कारण परमेश्वराचे राज्य तुमचे आहे.

  23. लूक ६:२१सुमारे इ.स. ३१

    जे आता भुकेले आहेत ते तुम्ही धन्य, कारण ते तृप्त होतील. जे आता विलाप करीत आहात ते तुम्ही धन्य कारण तुम्ही हसाल.

  24. लूक ६:२२सुमारे इ.स. ३१

    मानवपुत्रामुळे जेव्हा लोक तुमचा द्वेष करतात, तुमच्यावर बहिष्कार टाकतात आणि तुमचा अपमान करतात, दुष्ट म्हणून तुमचे नाव नाकारतात, तेव्हा तुम्ही धन्य.

  25. लूक ६:२३सुमारे इ.स. ३१

    “त्या दिवशी आनंदाने उड्या मारा, कारण स्वर्गामध्ये तुमचे प्रतिफळ मोठे आहे. त्यांच्या पूर्वजांनीही संदेष्ट्यांना असेच वागविले होते.