circa 6 BC – AD 30
The Life of Jesus
The eternal Son of God enters history: born in Bethlehem, baptized in the Jordan, crucified at Golgotha, raised on the third day.
या कालखंडातील वचने
- लूक ४:७सुमारे इ.स. २७
जर तू माझी उपासना करशील, तर हे सगळे तुझेच होईल.”
- लूक ४:८सुमारे इ.स. २७
येशूंनी उत्तर दिले, “असे लिहिले आहे, ‘केवळ प्रभू तुझ्या परमेश्वरांनाच नमन कर आणि त्यांचीच सेवा कर.’ ”
- लूक ४:९सुमारे इ.स. २७
मग सैतानाने त्याला यरुशलेमास नेऊन मंदिराच्या सर्वात उंच टोकावर उभे केले आणि तो म्हणाला, “तू परमेश्वराचा पुत्र आहेस, तर येथून खाली उडी टाक,”
- लूक ४:१०सुमारे इ.स. २७
कारण असे लिहिले आहे: “ ‘तुझे रक्षण व्हावे म्हणून तो आपल्या देवदूतांना तुझ्यासंबंधाने आज्ञा देईल;
- लूक ४:११सुमारे इ.स. २७
तुझ्या पायाला दगडाची ठेच लागू नये, म्हणून ते तुला आपल्या हातांवर उचलून धरतील.’ ”
- लूक ४:१२सुमारे इ.स. २७
येशूंनी उत्तर दिले, “असे म्हटले आहेः ‘प्रभू तुमच्या परमेश्वराची परीक्षा पाहू नका.’ ”
- लूक ४:१३सुमारे इ.स. २७
या सर्व परीक्षा संपल्यानंतर, योग्य संधी मिळेपर्यंत सैतान त्यांना सोडून निघून गेला.
- लूक ४:१४सुमारे इ.स. २७
यानंतर पवित्र आत्म्याच्या शक्तीने भरलेले येशू गालील प्रांतात परतले आणि त्यांची किर्ती चहूकडील सर्व प्रांतात पसरली.
- लूक ४:१५सुमारे इ.स. २७
ते त्यांच्या सभागृहांमध्ये शिक्षण देत होते आणि प्रत्येकाने त्यांची स्तुती केली.
- लूक ४:१६सुमारे इ.स. २७
ज्या नासरेथ गावी त्यांची वाढ झाली होती, तिथे ते आले व नेहमीप्रमाणे शब्बाथ दिवशी आपल्या प्रथेप्रमाणे सभागृहामध्ये पवित्रशास्त्र वाचण्यासाठी उभे राहिले.
- लूक ४:१७सुमारे इ.स. २७
यशायाह संदेष्ट्याचे भविष्य असलेल्या अभिलेखाची गुंडाळी त्यांच्या हाती देण्यात आली आणि त्यांनी ती उघडली, ज्यात असे लिहिलेले होते:
- लूक ४:१८सुमारे इ.स. २७
“परमेश्वराचा आत्मा मजवर आहे, कारण गरिबांना शुभवार्ता सांगण्यासाठी प्रभूने माझा अभिषेक केला आहे. कैद्यांना सुटका जाहीर करण्यासाठी, अंधांना दृष्टी देण्यासाठी, त्यांनी मला पाठविले आहे.
- लूक ४:१९सुमारे इ.स. २७
प्रभूच्या कृपेचे वर्ष जाहीर करण्यास पाठविले आहे.”
- लूक ४:२०सुमारे इ.स. २७
नंतर गुंडाळी गुंडाळून, ती सेवकाकडे दिली व ते खाली बसले. सभागृहामधील प्रत्येक व्यक्तीची नजर त्यांच्यावर एकवटली होती.
- लूक ४:२१सुमारे इ.स. २७
येशू पुढे त्यांना म्हणाले, “हा शास्त्रलेख जो आज तुम्ही ऐकत आहात, तो पूर्ण झाला आहे.”
- लूक ४:२२सुमारे इ.स. २७
सर्व लोक त्यांच्याबद्दल चांगले बोलले आणि कृपेची वचने त्यांच्या मुखातून बाहेर पडली हे ऐकून विस्मित झाले. ते म्हणाले, “हा योसेफाचा पुत्र आहे ना?”
- लूक ४:२३सुमारे इ.स. २७
येशू त्यांना म्हणाले, “तुम्ही मला ही म्हण लागू कराल: अरे ‘वैद्या, तू स्वतःलाच बरे कर!’ आणि तुम्ही मला म्हणाल, ‘ज्याकाही गोष्टी तुम्ही कफर्णहूम या गावात केल्या त्याविषयी आम्ही ऐकले आहे, त्या गोष्टी येथे स्वतःच्या गावात करा.’ ”
- लूक ४:२४सुमारे इ.स. २७
“पण मी तुम्हाला निश्चित सांगतो,” ते पुढे म्हणाले, “संदेष्ट्याला स्वतःच्या गावी सन्मान मिळत नाही.
- लूक ४:२५सुमारे इ.स. २७
हे मी खात्रीपूर्वक सांगतो, जेव्हा साडेतीन वर्षे आकाश बंद झाले व सर्व देशभर भयंकर दुष्काळ पडला होता, त्यावेळी इस्राएलमध्ये एलीयाहच्या काळात अनेक विधवा होत्या.
- लूक ४:२६सुमारे इ.स. २७
तरीही एलीयाहला कोणाकडे पाठविले नाही, पण सीदोन प्रदेशातील सारफथ येथील विधवेकडे पाठविले.
- लूक ४:२७सुमारे इ.स. २७
आणि त्याचप्रमाणे संदेष्टा अलीशाच्या काळात इस्राएलमध्ये अनेक कुष्ठरोगी होते पण त्यांच्यापैकी कोणी शुद्ध झाला नाही—केवळ सिरिया देशातील नामान.”
- लूक ४:२८सुमारे इ.स. २७
जेव्हा त्यांनी हे ऐकले तेव्हा सभागृहातील सर्व लोक संतप्त झाले.
- लूक ४:२९सुमारे इ.स. २७
ते उठले, त्याला नगराबाहेर घालविले व ज्या टेकडीवर ते शहर वसले होते, त्या टेकडीच्या कड्यावरून ढकलून देण्यासाठी घेऊन आले.
- लूक ४:३०सुमारे इ.स. २७
पण ते भरगर्दीतून चालतच त्यांच्या मार्गाने निघून गेले.
- लूक ४:३१सुमारे इ.स. २७
नंतर येशू खाली गालील प्रांतातील कफर्णहूम येथे गेले आणि शब्बाथ दिवशी लोकांना शिकवू लागले.