मुख्य मजकुरावर जा

circa 6 BC – AD 30

The Life of Jesus

The eternal Son of God enters history: born in Bethlehem, baptized in the Jordan, crucified at Golgotha, raised on the third day.

3,779 वचने · 4 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. लूक ३:२०सुमारे इ.स. २६

    या सर्वांमध्ये हेरोदाने आणखी भर घातली: त्याने योहानाला तुरुंगात टाकले.

  2. लूक ३:२१सुमारे इ.स. २६

    जेव्हा सर्व लोक बाप्तिस्मा घेत होते त्यावेळी येशूंचाही बाप्तिस्मा झाला आणि येशू प्रार्थना करीत असताना स्वर्ग उघडला,

  3. लूक ३:२२सुमारे इ.स. २६

    आणि पवित्र आत्मा कबुतरासारखा शारीरिक रूपामध्ये त्यांच्यावर स्थिरावला आणि स्वर्गातून एक वाणी झाली, “तू माझा प्रिय पुत्र आहेस, तुझ्यावर मी संतुष्ट आहे.”

  4. लूक ३:२३सुमारे इ.स. २६

    येशूंनी आपले कार्य सुरू केले, त्यावेळी ते सुमारे तीस वर्षांचे होते. त्यांच्या वडिलांचे नाव योसेफ आहे, असे लोक समजत असत. योसेफ हा एलीचा पुत्र होता.

  5. लूक ३:२४सुमारे इ.स. २६

    एली हा मत्ताथाचा पुत्र, तो लेवीचा पुत्र, तो मल्खीचा पुत्र, तो यन्नयाचा पुत्र, तो योसेफाचा पुत्र,

  6. लूक ३:२५सुमारे इ.स. २६

    तो मत्तिथ्याहचा पुत्र, तो आमोसाचा पुत्र, तो नहुमाचा पुत्र, तो हेस्लीचा पुत्र, तो नग्गयाचा पुत्र,

  7. लूक ३:२६सुमारे इ.स. २६

    तो महथाचा पुत्र, तो मत्तिथ्याहचा पुत्र, तो शिमयीचा पुत्र, तो योसेखाचा पुत्र, तो योदाचा पुत्र,

  8. लूक ३:२७सुमारे इ.स. २६

    तो योहानाचा पुत्र, तो रेशाचा पुत्र, तो जरूब्बाबेलाचा पुत्र, तो शल्तीएलचा पुत्र, तो नेरीचा पुत्र,

  9. लूक ३:२८सुमारे इ.स. २६

    तो मल्खीचा पुत्र, तो अद्दीचा पुत्र, तो कोसामाचा पुत्र, तो एल्मदामाचा पुत्र, तो एराचा पुत्र,

  10. लूक ३:२९सुमारे इ.स. २६

    तो यहोशुआचा पुत्र, तो एलिएजराचा पुत्र, तो योरिमाचा पुत्र, तो मत्ताथाचा पुत्र, तो लेवीचा पुत्र,

  11. लूक ३:३०सुमारे इ.स. २६

    तो शिमोनाचा पुत्र, तो यहूदाहचा पुत्र, तो योसेफाचा पुत्र, तो योनामाचा पुत्र, तो एल्याकीमचा पुत्र,

  12. लूक ३:३१सुमारे इ.स. २६

    तो मल्याचा पुत्र, तो मिन्नाचा पुत्र, तो मत्ताथाचा पुत्र, तो नाथानाचा पुत्र, तो दावीदाचा पुत्र,

  13. लूक ३:३२सुमारे इ.स. २६

    तो इशायाचा पुत्र, तो ओबेदाचा पुत्र, तो बवाजाचा पुत्र, तो सल्मोनाचा पुत्र, तो नहशोनाचा पुत्र,

  14. लूक ३:३३सुमारे इ.स. २६

    तो अम्मीनादाबाचा, हा अम्मीनादाब रामाचा पुत्र, तो हेस्रोनाचा, तो पेरेसाचा, तो यहूदाहचा,

  15. लूक ३:३४सुमारे इ.स. २६

    तो याकोबाचा पुत्र, तो इसहाकाचा पुत्र, तो अब्राहामाचा पुत्र, तो तेरहाचा पुत्र, तो नाहोराचा पुत्र,

  16. लूक ३:३५सुमारे इ.स. २६

    तो सरुगाचा पुत्र, तो रऊचा पुत्र, तो पेलेगाचा पुत्र, तो एवराचा पुत्र, तो शेलहाचा पुत्र,

  17. लूक ३:३६सुमारे इ.स. २६

    तो केनानाचा पुत्र, तो अर्पक्षदाचा पुत्र, तो शेमाचा पुत्र, तो नोआहचा पुत्र, तो लामेखाचा पुत्र,

  18. लूक ३:३७सुमारे इ.स. २६

    तो मथुशलहाचा पुत्र, तो हनोखाचा पुत्र, तो यारेदाचा पुत्र, तो महललेलाचा पुत्र, तो केनानाचा पुत्र,

  19. लूक ३:३८सुमारे इ.स. २६

    तो एनोशाचा पुत्र, तो शेथाचा पुत्र, तो आदामाचा पुत्र, तो परमेश्वराचा पुत्र होता.

  20. लूक ४:१सुमारे इ.स. २७

    पवित्र आत्म्याने भरलेल्या येशूंनी यार्देन सोडले आणि आत्म्याने त्यांना अरण्यात नेले,

  21. लूक ४:२सुमारे इ.स. २७

    तिथे चाळीस दिवस सैतानाने त्यांची परीक्षा घेतली. या दिवसांमध्ये त्यांनी काही खाल्ले नाही आणि ते संपल्यानंतर त्यांना भूक लागली.

  22. लूक ४:३सुमारे इ.स. २७

    सैतान येशूंना म्हणाला, “जर तू परमेश्वराचा पुत्र असशील, तर या दगडाला भाकर होण्यास सांग.”

  23. लूक ४:४सुमारे इ.स. २७

    पण येशूंनी उत्तर दिले, “असे लिहिले आहे: ‘मनुष्य केवळ भाकरीने जगत नाही.’ ”

  24. लूक ४:५सुमारे इ.स. २७

    नंतर सैतानाने येशूंना एका उंच ठिकाणी नेऊन जगातील सर्व राज्ये एका क्षणात दाखविली.

  25. लूक ४:६सुमारे इ.स. २७

    आणि सैतानाने त्यांना म्हटले, “मी तुला या सर्वांवर अधिकार व वैभव देईन; कारण ती मला देण्यात आली आहेत आणि ज्याला पाहिजे त्याला मी देऊ शकतो.