मुख्य मजकुरावर जा

circa 6 BC – AD 30

The Life of Jesus

The eternal Son of God enters history: born in Bethlehem, baptized in the Jordan, crucified at Golgotha, raised on the third day.

3,779 वचने · 4 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. लूक २:२२सुमारे इ.स. ४

    मोशेच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे शुद्धीकरणाच्या अर्पणाची वेळ आली, तेव्हा त्यांच्या आईवडिलांनी त्याला प्रभूला सादर करण्यासाठी यरुशलेमला नेले.

  2. लूक २:२३सुमारे इ.स. ४

    कारण प्रभूच्या नियमात असे लिहिलेले आहे, “प्रत्येक प्रथम जन्मलेला पुत्र प्रभूला समर्पित केला पाहिजे.”

  3. लूक २:२४सुमारे इ.स. ४

    प्रभूच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे हे अर्पण: “दोन कबुतरे किंवा पारव्याची दोन पिल्ले,” असे होते.

  4. लूक २:२५सुमारे इ.स. ४

    यरुशलेम येथे शिमोन नावाचा एक मनुष्य होता, तो नीतिमान आणि भक्तिमान होता व इस्राएलाच्या सांत्वनाची वाट पाहत असून पवित्र आत्मा त्याजवर होता.

  5. लूक २:२६सुमारे इ.स. ४

    कारण प्रभू ख्रिस्ताला पाहिल्याशिवाय तुला मरण येणार नाही, असे पवित्र आत्म्याने त्याला प्रकट केले होते.

  6. लूक २:२७सुमारे इ.स. ४

    पवित्र आत्म्याने प्रवृत्त होऊन तो मंदिराच्या परिसरात गेला. तेव्हा आईवडिलांनी नियमशास्त्रात सांगितलेला विधी पूर्ण करण्यासाठी येशू बाळाला मंदिरात आणले,

  7. लूक २:२८सुमारे इ.स. ४

    तेव्हा शिमोनाने बाळाला आपल्या हातात घेतले आणि परमेश्वराची स्तुती करीत म्हटले:

  8. लूक २:२९सुमारे इ.स. ४

    “हे सर्वशक्तिमान प्रभू, तुमच्या वचनाप्रमाणे आता तुमच्या सेवकाला शांतीने घेऊन जावे.

  9. लूक २:३०सुमारे इ.स. ४

    मी तुमचे तारण माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे.

  10. लूक २:३१सुमारे इ.स. ४

    जे तुम्ही सर्व राष्ट्रांच्या नजरेसमोर सिद्ध केले आहे,

  11. लूक २:३२सुमारे इ.स. ४

    ते गैरयहूदीयांसाठी प्रकटीकरणाचा प्रकाश, आणि आपल्या इस्राएली लोकांचे गौरव आहे.”

  12. लूक २:३३सुमारे इ.स. ४

    आपल्या पुत्राविषयी हे बोलणे ऐकून योसेफ आणि मरीया आश्चर्यचकित झाले.

  13. लूक २:३४सुमारे इ.स. ४

    मग शिमोनाने त्यांना आशीर्वाद दिला आणि बाळाची आई मरीयाला म्हणाला: “इस्राएलमध्ये अनेकांचे पतन व पुन्हा उठणे आणि ज्या विरुद्ध लोक बोलतील, हा असे चिन्ह होईल, यासाठी या बालकाला नेमून ठेवले आहे.

  14. लूक २:३५सुमारे इ.स. ४

    यावेळी अनेकांच्या हृदयातील विचार उघड केले जातील व तुझ्या जिवातून तलवार भोसकली जाईल.”

  15. लूक २:३६सुमारे इ.स. ४

    त्यावेळी हन्ना एक संदेष्टी होती, ती आशेर वंशातील फनूएलाची कन्या असून फार वयोवृद्ध होती. विवाहानंतर सात वर्षे ती तिच्या पतीबरोबर राहिली होती.

  16. लूक २:३७सुमारे इ.स. ४

    आणि चौर्‍याऐंशी वर्षापर्यंत विधवा होती. तिने मंदिर कधीच न सोडता, रात्रंदिवस प्रार्थना व उपास करून परमेश्वराची आराधना केली.

  17. लूक २:३८सुमारे इ.स. ४

    तिने त्यावेळी तिथे येऊन, परमेश्वराची उपकारस्तुती केली आणि जे यरुशलेमची सुटका होण्याची वाट पाहत होते त्या प्रत्येकाला त्या बाळाविषयी सांगू लागली.

  18. लूक २:३९सुमारे इ.स. ४

    येशूंच्या आईवडिलांनी प्रभूच्या नियमशास्त्राप्रमाणे सर्वकाही केल्यानंतर ते गालीलातील नासरेथ गावी आपल्या घरी परत आले.

  19. लूक २:४०सुमारे इ.स. ४

    तो बालक वाढत गेला आणि बलवान झाला; तो शहाणपणाने भरलेला होता आणि त्याच्यावर परमेश्वराची कृपा होती.

  20. लूक २:४१सुमारे इ.स. ८

    येशूंचे आईवडील दरवर्षी वल्हांडण सणासाठी यरुशलेम येथे जात.

  21. लूक २:४२सुमारे इ.स. ८

    जेव्हा येशू बारा वर्षांचे होते, तेव्हा रिवाजाप्रमाणे ते सणासाठी तिथे गेले.

  22. लूक २:४३सुमारे इ.स. ८

    सण संपल्यानंतर येशूंचे आईवडील घरी परत जात असताना, येशू यरुशलेमातच मागे राहिले आहेत याची त्यांना कल्पना नव्हती.

  23. लूक २:४४सुमारे इ.स. ८

    ते त्यांच्याच बरोबर येत आहेत, असा विचार करून एक दिवसाची वाट चालून गेले. तेव्हा त्यांनी त्यांच्या नातेवाईकांकडे आणि मित्रमंडळींकडे त्याला शोधण्यास सुरुवात केली.

  24. लूक २:४५सुमारे इ.स. ८

    पण त्यांना ते कुठेच सापडले नाही, म्हणून ते त्यांना शोधण्यासाठी परत यरुशलेमला गेले.

  25. लूक २:४६सुमारे इ.स. ८

    तीन दिवसानंतर त्यांना ते मंदिराच्या परिसरात सापडले, शिक्षकांमध्ये बसून आणि त्यांचे ऐकून त्यांना ते प्रश्न विचारत होते.