मुख्य मजकुरावर जा

circa 6 BC – AD 30

The Life of Jesus

The eternal Son of God enters history: born in Bethlehem, baptized in the Jordan, crucified at Golgotha, raised on the third day.

3,779 वचने · 4 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. लूक १:५२सुमारे इ.स.पू. ५

    त्यांनी शासकांना त्यांच्या सिंहासनावरून खाली आणले आहे. पण नम्रजनांस उच्च केले आहे.

  2. लूक १:५३सुमारे इ.स.पू. ५

    भुकेल्यास त्यांनी उत्तम गोष्टींनी तृप्त केले आहे. परंतु श्रीमंतांना रिकामे पाठविले आहे.

  3. लूक १:५४सुमारे इ.स.पू. ५

    त्यांचा सेवक इस्राएलास दयाळू ते असल्याचे आठवून त्याला साहाय्य पाठविले,

  4. लूक १:५५सुमारे इ.स.पू. ५

    जसे आपल्या पूर्वजांना त्यांनी वचन दिले होते, ते अब्राहाम आणि त्यांच्या संततीवर सदासर्वकाळ राहील.”

  5. लूक १:५६सुमारे इ.स.पू. ५

    मरीया अलीशिबेजवळ सुमारे तीन महिने राहिली आणि नंतर ती तिच्या घरी परत गेली.

  6. लूक १:५७सुमारे इ.स.पू. ५

    अलीशिबेच्या प्रसूतीची वेळ आली, तेव्हा तिने पुत्राला जन्म दिला.

  7. लूक १:५८सुमारे इ.स.पू. ५

    प्रभूने तिच्यावर किती मोठी दया दाखविली हे ऐकून तिचे शेजारी व नातेवाईक तिच्या आनंदात सामील झाले.

  8. लूक १:५९सुमारे इ.स.पू. ५

    मग आठव्या दिवशी जे बाळाची सुंता करण्यासाठी आले, ते त्याच्या वडिलांचे जखर्‍याह हेच नाव त्याला देणार होते,

  9. लूक १:६०सुमारे इ.स.पू. ५

    पण त्याची आई अलीशिबा म्हणाली, “नाही, त्याचे नाव योहान आहे.”

  10. लूक १:६१सुमारे इ.स.पू. ५

    तेव्हा त्यांनी तिला म्हटले पण, “हे नाव तुमच्या नातलगात सापडत नाही.”

  11. लूक १:६२सुमारे इ.स.पू. ५

    नंतर त्यांनी हातांनी खुणा करून त्याच्या वडिलांना, बाळाचे नाव काय ठेवायचे आहे असे विचारले.

  12. लूक १:६३सुमारे इ.स.पू. ५

    वडिलांनी एक पाटी मागवून त्यावर, “त्याचे नाव योहान आहे” असे लिहिले आणि प्रत्येकजण आश्चर्यचकित झाला.

  13. लूक १:६४सुमारे इ.स.पू. ५

    तत्क्षणी जखर्‍याहचे तोंड उघडले व त्याची जीभ मोकळी झाली आणि तो बोलू लागला व परमेश्वराची स्तुती करू लागला.

  14. लूक १:६५सुमारे इ.स.पू. ५

    आणि सर्व शेजारी भयभीत झाले व डोंगराळ यहूदीया प्रदेशात राहणारे, येथील सर्व गोष्टींविषयी बोलू लागले.

  15. लूक १:६६सुमारे इ.स.पू. ५

    ज्या प्रत्येकाने याविषयी ऐकले व नवल करून म्हटले, “हा बालक पुढे कोण होणार?” कारण प्रभूचा हात त्याजबरोबर होता.

  16. लूक १:६७सुमारे इ.स.पू. ५

    नंतर बालकाचा पिता जखर्‍याह पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाला आणि भविष्यवाणी करू लागला:

  17. लूक १:६८सुमारे इ.स.पू. ५

    “प्रभूची स्तुती करा! इस्राएलाच्या परमेश्वराची स्तुती करा, कारण ते आपल्या लोकांकडे आले आहेत आणि त्यांनी त्यांच्यासाठी खंडणी भरली आहे.

  18. लूक १:६९सुमारे इ.स.पू. ५

    त्यांनी आपला सेवक दावीदाच्या घराण्यातून आपल्यासाठी तारणाचे शिंग उभारले आहे.

  19. लूक १:७०सुमारे इ.स.पू. ५

    जसे त्यांनी फार पूर्वी आपल्या पवित्र संदेष्ट्यांच्याद्वारे सांगितले होते—

  20. लूक १:७१सुमारे इ.स.पू. ५

    आमच्या शत्रूपासून आणि आमचा द्वेष करणार्‍या सर्वांच्या हातातून आमचा उद्धार करावा,

  21. लूक १:७२सुमारे इ.स.पू. ५

    आमच्या पूर्वजांवर दया करावी आणि त्यांच्या पवित्र कराराची आठवण करावी.

  22. लूक १:७३सुमारे इ.स.पू. ५

    आणि त्यांनी आमचा पूर्वज अब्राहामाला शपथ देऊन वचन दिले:

  23. लूक १:७४सुमारे इ.स.पू. ५

    आमच्या शत्रूंच्या हातून आमची सुटका करावी, आणि समर्थ होऊन निर्भयतेने त्यांची सेवा करावी,

  24. लूक १:७५सुमारे इ.स.पू. ५

    पवित्रपणाने आणि नीतिमत्त्वाने आमचे सर्व दिवस त्यांच्यासमोर घालवावेत.

  25. लूक १:७६सुमारे इ.स.पू. ५

    “आणि तू, माझ्या बाळा, तुला परात्पराचा संदेष्टा असे म्हणतील; कारण तू प्रभूच्या पुढे जाऊन त्यांचा मार्ग तयार करशील,