circa 6 BC – AD 30
The Life of Jesus
The eternal Son of God enters history: born in Bethlehem, baptized in the Jordan, crucified at Golgotha, raised on the third day.
या कालखंडातील वचने
- लूक १:२७सुमारे इ.स.पू. ५
एका कुमारीकडे पाठविले, जिचा विवाह दावीद राजाच्या वंशावळीतील योसेफ नावाच्या मनुष्याबरोबर निश्चित झाला होता. त्या कुमारीचे नाव मरीया होते.
- लूक १:२८सुमारे इ.स.पू. ५
गब्रीएल देवदूत मरीयेपुढे प्रगट झाला आणि तिला म्हणाला, “हे कृपा पावलेल्या स्त्रिये, अभिवादन! प्रभू तुझ्याबरोबर आहेत.”
- लूक १:२९सुमारे इ.स.पू. ५
देवदूताच्या शब्दांनी मरीया फारच अस्वस्थ झाली आणि हे अभिवादन कशाप्रकारचे असावे, याविषयी ती विचार करू लागली.
- लूक १:३०सुमारे इ.स.पू. ५
देवदूत तिला म्हणाला, “मरीये, भिऊ नकोस; कारण परमेश्वराची कृपा तुझ्यावर झाली आहे.
- लूक १:३१सुमारे इ.स.पू. ५
तू गर्भधारण करून पुत्राला जन्म देशील आणि त्याचे नाव येशू ठेवावे.
- लूक १:३२सुमारे इ.स.पू. ५
ते परमथोर होतील आणि त्यांना परात्पराचा पुत्र म्हणतील आणि प्रभू परमेश्वर त्यांना त्यांचा पूर्वज दावीदाचे सिंहासन देतील.
- लूक १:३३सुमारे इ.स.पू. ५
ते याकोबाच्या संतानांवर सदासर्वकाळ राज्य करतील व त्यांच्या राज्याचा कधीच अंत होणार नाही.”
- लूक १:३४सुमारे इ.स.पू. ५
मरीयेने देवदूताला विचारले, “हे कसे होईल? मी तर कुमारिका आहे!”
- लूक १:३५सुमारे इ.स.पू. ५
यावर देवदूताने उत्तर दिले, “पवित्र आत्मा तुझ्यावर उतरेल आणि सर्वोच्च परमेश्वराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करेल. त्यामुळे जो पवित्र पुत्र तुला होणार आहे त्यांना परमेश्वराचा पुत्र म्हणतील.
- लूक १:३६सुमारे इ.स.पू. ५
तुझी नातलग अलीशिबा हिलासुद्धा तिच्या वृद्धापकाळात बाळ होणार आहे आणि जी गर्भधारणा करू शकत नव्हती, तिला आता सहावा महिना आहे.
- लूक १:३७सुमारे इ.स.पू. ५
कारण परमेश्वराला कोणतेही वचन पूर्ण करणे अशक्य नाही.”
- लूक १:३८सुमारे इ.स.पू. ५
मरीया म्हणाली, “मी प्रभूची दासी आहे, तुम्ही जे वचन मला दिले आहे त्याची पूर्तता होवो.” आणि मग देवदूत तिला सोडून गेला.
- लूक १:३९सुमारे इ.स.पू. ५
त्या दिवसात मरीया लगेच तयारी करून यहूदीयाच्या डोंगराळ भागातील एका गावाकडे घाईघाईने गेली.
- लूक १:४०सुमारे इ.स.पू. ५
तिने जखर्याहच्या घरात प्रवेश करून अलीशिबेला अभिवादन केले.
- लूक १:४१सुमारे इ.स.पू. ५
जेव्हा मरीयेचे अभिवादन अलीशिबेने ऐकले, तेव्हा तिच्या गर्भाशयातील बालकाने उडी मारली आणि अलीशिबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली.
- लूक १:४२सुमारे इ.स.पू. ५
अलीशिबा मोठ्या आवाजात म्हणाली: “तू सर्व स्त्रियांमध्ये धन्य आहेस आणि जे बाळ तुझ्या पोटी जन्म घेईल ते धन्य असो.
- लूक १:४३सुमारे इ.स.पू. ५
परंतु माझ्या प्रभूच्या आईने माझ्याकडे यावे ही माझ्यावर किती मोठी कृपा आहे?
- लूक १:४४सुमारे इ.स.पू. ५
ज्या क्षणाला तुझ्या अभिवादनाचा आवाज माझ्या कानाने ऐकला, त्याच क्षणाला बाळाने माझ्या गर्भात आनंदाने उडी मारली.
- लूक १:४५सुमारे इ.स.पू. ५
धन्य आहे ती, कारण प्रभूने तिला दिलेल्या वचनाची ते पूर्णता करतील असा तिने विश्वास ठेवला.”
- लूक १:४६सुमारे इ.स.पू. ५
मरीया म्हणाली: “माझा आत्मा प्रभूचे गौरव करतो
- लूक १:४७सुमारे इ.स.पू. ५
माझा आत्मा माझ्या तारणार्या परमेश्वरामध्ये आनंद करतो,
- लूक १:४८सुमारे इ.स.पू. ५
कारण आता त्यांनी त्यांच्या दासीच्या लीन अवस्थेकडे दृष्टी टाकली आहे. यापुढे सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील.
- लूक १:४९सुमारे इ.स.पू. ५
कारण ज्या सर्वशक्तिमान परमेश्वराने माझ्यासाठी महान कृत्ये केली आहेत, त्यांचे नाव पवित्र आहे.
- लूक १:५०सुमारे इ.स.पू. ५
त्यांचे भय बाळगणार्यांवर त्यांची करुणा एका पिढीपासून दुसर्या पिढीपर्यंत टिकून राहते.
- लूक १:५१सुमारे इ.स.पू. ५
त्यांनी आपल्या बाहूने महान कार्य केले आहेत; जे अंतर्मनातील विचारांमध्ये गर्विष्ठ आहेत, त्यांना त्यांनी विखुरले आहे.