circa 6 BC – AD 30
The Life of Jesus
The eternal Son of God enters history: born in Bethlehem, baptized in the Jordan, crucified at Golgotha, raised on the third day.
या कालखंडातील वचने
- लूक १:७७सुमारे इ.स.पू. ५
त्यांच्या पापांच्या क्षमेद्वारे, त्याच्या लोकांना तारणाचे ज्ञान देशील.
- लूक १:७८सुमारे इ.स.पू. ५
कारण परमेश्वराच्या करुणेमुळे, आपल्यावर स्वर्गातून दिव्य प्रभातेचा उदय होण्याची वेळ आली आहे.
- लूक १:७९सुमारे इ.स.पू. ५
जे अंधारात जगत आहेत, जे मरणाच्या छायेत आहेत त्यांच्यावर प्रकाश पडावा आणि, आमच्या पायांना शांतीच्या मार्गाचे मार्गदर्शन प्राप्त व्हावे.”
- लूक १:८०सुमारे इ.स.पू. ५
तो बालक वाढत गेला आणि आत्म्यात बलवान झाला व त्याची वाढ झाली आणि तो इस्राएली लोकांस जाहीरपणे प्रकट होईपर्यंत अरण्यात राहिला.
त्या दिवसात कैसर औगुस्ताने सर्व जगातील रोमी लोकांची शिरगणती करावी असा हुकूम काढला.
ही पहिली जनगणना क्विरीनिय हा सीरियाचा राज्यपाल असताना घेण्यात आली होती.
तेव्हा प्रत्येकजण आपआपल्या गावी नोंदणी करण्यासाठी गेले.
योसेफसुद्धा दावीदाच्या घराण्यातील व वंशातील असल्यामुळे, तो यहूदीया प्रांतातील गालीलातील नासरेथ या दावीदाच्या गावी बेथलेहेम येथे वर गेला.
नाव नोंदणीसाठी त्याने आपली भावी वधू मरीया हिला बरोबर घेतले कारण तिला लवकरच बाळ होणे अपेक्षित होते.
- लूक २:६सुमारे इ.स. ४
जेव्हा ते त्या ठिकाणी होते, तेव्हा बाळाचा जन्म होण्याची वेळ आली,
- लूक २:७सुमारे इ.स. ४
आणि तिने आपल्या प्रथमपुत्राला जन्म दिला. तिने त्याला गोठ्यातील गव्हाणीत ठेवले, कारण तिथे त्यांच्यासाठी विश्रांतिगृह उपलब्ध नव्हते.
- लूक २:८सुमारे इ.स. ४
आणि त्या भागात मेंढपाळ रानात राहून, रात्रीच्या समयी त्यांचे कळप राखीत होते.
- लूक २:९सुमारे इ.स. ४
इतक्यात त्यांच्यामध्ये प्रभूचा देवदूत प्रकट झाला आणि परमेश्वराचे गौरव त्यांच्याभोवती प्रकाशले आणि ते अत्यंत भयभीत झाले.
- लूक २:१०सुमारे इ.स. ४
परंतु देवदूत मेंढपाळांना म्हणाला, “भिऊ नका. मी तुमच्यासाठी एक शुभवार्ता आणली आहे, ज्यामुळे सर्व लोकांना मोठा हर्ष होईल.
- लूक २:११सुमारे इ.स. ४
आज दावीदाच्या नगरात तुमच्यासाठी तारणारा जन्मला आहे; तोच ख्रिस्त प्रभू आहे.
- लूक २:१२सुमारे इ.स. ४
त्याची खूण ही आहे: बाळंत्याने गुंडाळलेले व गव्हाणीत निजविलेले असे बालक तुम्हाला सापडेल.”
- लूक २:१३सुमारे इ.स. ४
अचानक त्या दूताबरोबर स्वर्गदूतांचा एक मोठा समूह त्यांना दिसला, ते परमेश्वराची स्तुती करीत म्हणाले,
- लूक २:१४सुमारे इ.स. ४
“सर्वोच्च स्वर्गामध्ये परमेश्वराला गौरव, आणि पृथ्वीवर ज्यांच्यावर त्यांची कृपादृष्टी झाली आहे, त्यांना शांती असो.”
- लूक २:१५सुमारे इ.स. ४
देवदूत त्यांना सोडून स्वर्गात वर गेल्यानंतर, मेंढपाळ एकमेकास म्हणू लागले: “चला, आपण बेथलेहेमला जाऊ आणि प्रभूने सांगितलेली ही जी घटना घडली आहे, ती प्रत्यक्ष पाहू.”
- लूक २:१६सुमारे इ.स. ४
ते घाईघाईने गेले आणि ज्या ठिकाणी ते बालक गव्हाणीत निजले होते तिथे त्यांनी मरीया आणि योसेफ यांना शोधून काढले.
- लूक २:१७सुमारे इ.स. ४
त्यांनी त्या बालकाला पाहिल्यानंतर, त्या बालकाविषयी त्यांना जे काही सांगण्यात आले होते, ते सर्वठिकाणी विदित केले.
- लूक २:१८सुमारे इ.स. ४
मेंढपाळांनी जे सांगितले व ज्यांनी ऐकले ते सर्वजण आश्चर्यचकित झाले.
- लूक २:१९सुमारे इ.स. ४
परंतु मरीयेने ते सर्व आपल्या हृदयात साठवून ठेवले आणि त्यावर ती विचार करीत असे.
- लूक २:२०सुमारे इ.स. ४
मेंढपाळांना जे सांगण्यात आले होते, त्याप्रमाणे सर्वगोष्टी घडल्या व त्यांनी सर्वगोष्टी ऐकल्या व पाहिल्यानंतर ते परमेश्वराचे गौरव व स्तुती करीत परत गेले.
- लूक २:२१सुमारे इ.स. ४
आठव्या दिवशी, बालकाची सुंता करण्याची वेळ आली, त्यावेळी त्यांचे नाव येशू ठेवण्यात आले, हे नाव त्यांना त्यांची गर्भधारणा होण्यापूर्वीच देवदूताने दिले होते.