circa 6 BC – AD 30
The Life of Jesus
The eternal Son of God enters history: born in Bethlehem, baptized in the Jordan, crucified at Golgotha, raised on the third day.
या कालखंडातील वचने
- मार्क १४:६६सुमारे इ.स. ३३
हे सर्व होत असताना, पेत्र खाली अंगणातच होता, तिथे महायाजकाची एक दासी आली.
- मार्क १४:६७सुमारे इ.स. ३३
तिने पेत्राला शेकोटीसमोर शेकताना पाहिले, तिने त्याच्याकडे निरखून पाहिले. “तू नासरेथकर येशूंबरोबर होतास.”
- मार्क १४:६८सुमारे इ.स. ३३
पण पेत्र नकार देत म्हणाला, “तू कशासंबंधी बोलतेस हे मला समजत नाही.” मग तो द्वाराकडे गेला.
- मार्क १४:६९सुमारे इ.स. ३३
त्याला तिथे उभे असलेल्या दासीने पाहिले आणि ती पुन्हा म्हणाली, “हा मनुष्य त्यांच्यापैकी एक आहे!”
- मार्क १४:७०सुमारे इ.स. ३३
पेत्राने ते पुन्हा नाकारले. थोड्या वेळाने जी माणसे तिथे उभी होती. त्यातील काहीजण पेत्राला म्हणाले, “तू खरोखर त्यांच्यापैकीच आहेस, कारण तू गालील प्रांताचा आहेस!”
- मार्क १४:७१सुमारे इ.स. ३३
हे ऐकून पेत्र शाप देऊ लागला व शपथ घेऊन त्यांना म्हणू लागला, “ज्या माणसाविषयी तुम्ही बोलत आहात, त्या मनुष्याला मी ओळखत सुद्धा नाही.”
- मार्क १४:७२सुमारे इ.स. ३३
तेवढ्यात कोंबडा दुसर्या वेळेला आरवला. त्याबरोबर पेत्राला येशूंचे शब्द आठवले, “कोंबडा दोन वेळा आरवण्यापूर्वी तू मला तीन वेळा नाकारशील.” तेव्हा पेत्र दूर निघून गेला आणि अतिशय दुःखाने रडला.
- मार्क १५:१सुमारे इ.स. ३३
प्रातःकाळ झाल्यावर सर्व महायाजक आणि लोकांचे वडीलजन, नियमशास्त्राचे शिक्षक आणि पूर्ण न्यायसभा यांनी योजना केली. सभेनंतर त्यांनी येशूंना बंदिस्त करून रोमी राज्यपाल पिलाताच्या स्वाधीन केले.
- मार्क १५:२सुमारे इ.स. ३३
पिलाताने येशूंना विचारले, “तू यहूद्यांचा राजा आहेस काय?” येशूंनी उत्तर दिले, “तुम्ही म्हणता तसेच.”
- मार्क १५:३सुमारे इ.स. ३३
प्रमुख याजक आणि यहूदी पुढार्यांनी येशूंवर अनेक आरोप केले.
- मार्क १५:४सुमारे इ.स. ३३
म्हणून पिलाताने येशूंना विचारले, “तू त्यांना उत्तर देणार नाहीस काय? ते तुझ्यावर कितीतरी गोष्टींचा दोषारोप करीत आहे.”
- मार्क १५:५सुमारे इ.स. ३३
परंतु येशूंनी काही उत्तर दिले नाही. याचे पिलाताला नवल वाटले.
- मार्क १५:६सुमारे इ.स. ३३
आता सणामध्ये एका कैद्याला लोकांच्या विनंतीप्रमाणे सोडून देण्याची प्रथा होती.
- मार्क १५:७सुमारे इ.स. ३३
बरब्बा म्हटलेला एक मनुष्य त्यावेळी बंडखोरांबरोबर तुरुंगात शिक्षा भोगत होता, त्याने उठाव करून खून केला होता.
- मार्क १५:८सुमारे इ.स. ३३
आता जसे पिलात रीतीप्रमाणे करीत असे, तसे त्याने करावे अशी मागणी समुदाय त्याला करू लागला.
- मार्क १५:९सुमारे इ.स. ३३
“तुमच्यासाठी मी यहूद्यांच्या राजाला सोडावे अशी तुमची इच्छा आहे का?” पिलाताने विचारले,
- मार्क १५:१०सुमारे इ.स. ३३
प्रमुख याजकांनी स्वतःच्या हितासाठी येशूंना धरून दिले हे पिलाताच्या लक्षात आले होते.
- मार्क १५:११सुमारे इ.स. ३३
पण तेवढ्यात येशूंच्या ऐवजी बरब्बाला सोडा अशी मागणी करण्यासाठी प्रमुख याजकांनी समुदायास चिथाविले.
- मार्क १५:१२सुमारे इ.स. ३३
पिलाताने विचारले, “ज्याला तुम्ही यहूद्यांचा राजा म्हणता, त्याचे मी काय करावे?”
- मार्क १५:१३सुमारे इ.स. ३३
लोक ओरडून म्हणाले, “त्याला क्रूसावर खिळा!”
- मार्क १५:१४सुमारे इ.स. ३३
“पण का?” पिलाताने खुलासा विचारला, “त्याने असा कोणता गुन्हा केला आहे?” पण लोकांनी अधिकच मोठ्याने गर्जना केली, “त्याला क्रूसावर खिळा!”
- मार्क १५:१५सुमारे इ.स. ३३
लोकांना खुश करण्याच्या विचाराने, पिलाताने त्यांच्यासाठी बरब्बाला सोडून दिले आणि येशूंना फटके मारल्यानंतर क्रूसावर खिळण्याकरिता त्यांच्या स्वाधीन केले.
- मार्क १५:१६सुमारे इ.स. ३३
मग सैनिकांनी त्यांना राजवाड्यात म्हणजे प्राइतोरियम येथे नेले आणि सर्व सैनिकांच्या टोळीला एकत्र बोलाविले.
- मार्क १५:१७सुमारे इ.स. ३३
त्यांनी त्यांना जांभळा झगा घातला आणि काट्यांचा एक मुकुट गुंफून त्यांच्या मस्तकावर ठेवला.
- मार्क १५:१८सुमारे इ.स. ३३
नंतर ते त्याला प्रणाम करून म्हणू लागले, “हे यहूद्यांच्या राजा, तुझा जयजयकार असो!”