मुख्य मजकुरावर जा

circa 6 BC – AD 30

The Life of Jesus

The eternal Son of God enters history: born in Bethlehem, baptized in the Jordan, crucified at Golgotha, raised on the third day.

3,779 वचने · 4 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मार्क १५:१९सुमारे इ.स. ३३

    त्यांनी त्यांच्या मस्तकांवर काठीने वारंवार मारले व ते त्यांच्या तोंडावर थुंकले. त्यांच्यासमोर त्यांनी गुडघे टेकून त्यांची उपासना केली.

  2. मार्क १५:२०सुमारे इ.स. ३३

    येशूंची अशी थट्टा केल्यावर, त्यांनी त्याला घातलेला जांभळा झगा काढून घेतला आणि त्यांचे कपडे पुन्हा त्यांच्या अंगावर चढविले. मग त्यांना क्रूसावर खिळण्याकरिता बाहेर घेऊन गेले.

  3. मार्क १५:२१सुमारे इ.स. ३३

    कुरेने गावचा एक रहिवासी, आलेक्सांद्र व रूफस यांचा पिता शिमोन रानातून परत येत होता व जवळून जात असता, त्यांनी त्याला जबरदस्तीने क्रूस वाहण्यास भाग पाडले.

  4. मार्क १५:२२सुमारे इ.स. ३३

    मग त्यांनी येशूंना गोलगोथा या नावाने ओळखल्या जाणार्‍या जागी आणले. गोलगोथाचा अर्थ “कवटीची जागा” असा आहे.

  5. मार्क १५:२३सुमारे इ.स. ३३

    त्यांनी येशूंना गंधरस मिसळलेला द्राक्षारस दिला, परंतु त्यांनी त्याचा स्वीकार केला नाही.

  6. मार्क १५:२४सुमारे इ.स. ३३

    मग त्यांनी त्याला क्रूसावर खिळल्यानंतर, त्यांची वस्त्रे वाटून, प्रत्येकाला काय मिळेल हे पाहण्यासाठी त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या.

  7. मार्क १५:२५सुमारे इ.स. ३३

    त्यांना क्रूसावर खिळले त्यावेळी सकाळचे नऊ वाजले होते.

  8. मार्क १५:२६सुमारे इ.स. ३३

    एक दोषपत्राचा लेख वर लावण्यात आला होता: यहूद्यांचा राजा.

  9. मार्क १५:२७सुमारे इ.स. ३३

    त्यांनी दोन बंडखोरांना त्यांच्याबरोबर क्रूसावर खिळले, एक उजवीकडे आणि दुसरा त्यांच्या डावीकडे होता.

  10. मार्क १५:२८सुमारे इ.स. ३३

    अशा रीतीने, “अपराधी लोकांत त्याची गणना झाली,” हा शास्त्रलेख पूर्ण झाला.

  11. मार्क १५:२९सुमारे इ.स. ३३

    जे जवळून जात होते त्यांनी त्यांचा अपमान केला, डोकी हालवीत म्हणाले, “तू मंदिर उद्ध्वस्त करून तीन दिवसात पुन्हा बांधणार आहे ना,

  12. मार्क १५:३०सुमारे इ.स. ३३

    तर क्रूसावरून खाली ये आणि स्वतःला वाचव!”

  13. मार्क १५:३१सुमारे इ.स. ३३

    त्याचप्रमाणे प्रमुख याजकवर्ग आणि नियमशास्त्र शिक्षकांनीही त्यांची थट्टा केली. ते म्हणाले, “त्याने दुसर्‍यांचे तारण केले, पण त्याला स्वतःचा बचाव करता येत नाही.

  14. मार्क १५:३२सुमारे इ.स. ३३

    तो इस्राएलाचा राजा व ख्रिस्त आहे, त्याला आता क्रूसावरून खाली उतरून येऊ दे, म्हणजे आम्ही पाहू आणि विश्वास ठेवू.” त्यांच्याबरोबर क्रूसावर खिळलेल्यांनीही त्यांच्यावर अपमानाची रास केली.

  15. मार्क १५:३३सुमारे इ.स. ३३

    संपूर्ण देशावर दुपारच्या तीन वाजेपर्यंत अंधार पडला.

  16. मार्क १५:३४सुमारे इ.स. ३३

    आणि दुपारी तीन वाजता, येशूंनी मोठ्याने आरोळी मारली, “एलोई, एलोई, लमा सबकतनी,” म्हणजे “माझ्या परमेश्वरा माझ्या परमेश्वरा, तुम्ही माझा त्याग का केला?”

  17. मार्क १५:३५सुमारे इ.स. ३३

    तिथे जवळ उभे असलेल्या काही लोकांनी हे ऐकले व ते म्हणाले, “पाहा, तो एलीयाहला बोलावित आहे.”

  18. मार्क १५:३६सुमारे इ.स. ३३

    कोणी एक धावला, शिरक्यात भिजविलेला, एक स्पंज काठीवर ठेवून येशूंना प्यावयास दिला व तो म्हणाला, “त्याला एकटे सोडा. एलीयाह त्याला खाली उतरविण्यास येतो की काय, हे आपण पाहू!”

  19. मार्क १५:३७सुमारे इ.स. ३३

    मग येशूंनी मोठी आरोळी मारून, शेवटचा श्वास घेतला.

  20. मार्क १५:३८सुमारे इ.स. ३३

    तेव्हा मंदिराच्या पवित्रस्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत दोन भागात फाटला.

  21. मार्क १५:३९सुमारे इ.स. ३३

    जेव्हा येशूंच्या समोर उभे असलेल्या शताधिपतीने ते कसे मरण पावले हे पाहिले, तेव्हा तो म्हणाला, “खरोखरच हा मनुष्य परमेश्वराचा पुत्र होता!”

  22. मार्क १५:४०सुमारे इ.स. ३३

    अनेक स्त्रिया हे दुरून पाहत होत्या. त्यांच्यामध्ये मरीया मग्दालिया, धाकटा याकोब व योसेफ यांची आई मरीया, सलोमी होत्या.

  23. मार्क १५:४१सुमारे इ.स. ३३

    गालीलामध्ये असताना या स्त्रिया येशूंना अनुसरून त्यांची सेवा करीत असत. यरुशलेममधून त्यांच्याबरोबर आलेल्या इतर अनेक स्त्रियाही तिथे होत्या.

  24. मार्क १५:४२सुमारे इ.स. ३३

    हा तयारी करण्याचा दिवस होता (शब्बाथाच्या आधीचा दिवस). संध्याकाळ झाली असताना,

  25. मार्क १५:४३सुमारे इ.स. ३३

    सभेचा एक सन्मान्य सभासद अरिमथियाकर योसेफ, स्वतः जो परमेश्वराच्या राज्याची वाट पाहत होता, तो धैर्य करून पिलाताकडे गेला आणि त्याने येशूंचे शरीर मागितले.