circa 6 BC – AD 30
The Life of Jesus
The eternal Son of God enters history: born in Bethlehem, baptized in the Jordan, crucified at Golgotha, raised on the third day.
या कालखंडातील वचने
- मार्क १४:४१सुमारे इ.स. ३३
मग ते तिसर्या वेळेस परत आले आणि त्यांना म्हणाले, “तुम्ही अजूनही झोप व विसावा घेत आहात काय? पुरे झाले! पाहा वेळ आली आहे आणि मानवपुत्र पापी लोकांच्या हाती धरून दिला जात आहे.
- मार्क १४:४२सुमारे इ.स. ३३
उठा, आपण जाऊ! माझा विश्वासघात करणारा आला आहे.”
- मार्क १४:४३सुमारे इ.स. ३३
ते बोलत आहेत तेव्हाच, त्यांच्या बारा शिष्यांपैकी एक यहूदा, महायाजकांनी आणि वडीलजनांनी पाठविलेल्या तरवारी आणि सोटे धारण करणार्या जमावाला बरोबर घेऊन पुढे आला.
- मार्क १४:४४सुमारे इ.स. ३३
आता त्या विश्वासघातक्याने जमावाला खूण देऊन ठेवली होती, “ज्या मनुष्याचे मी चुंबन घेईन त्याला अटक करा आणि शिपायांच्या बंदोबस्तात घेऊन जा.”
- मार्क १४:४५सुमारे इ.स. ३३
तत्क्षणी यहूदाह येशूंच्या जवळ गेला, “गुरुजी!” त्याने उद्गार काढले आणि त्यांचे चुंबन घेतले.
- मार्क १४:४६सुमारे इ.स. ३३
त्या पुरुषांनी येशूंना धरले आणि अटक केले.
- मार्क १४:४७सुमारे इ.स. ३३
पण तेवढ्यात जे उभे होते त्यांच्यातील एकाने तरवार उपसून महायाजकाच्या दासावर वार करून त्याचा कान कापून टाकला.
- मार्क १४:४८सुमारे इ.स. ३३
येशूंनी विचारले, “मी बंडखोरांचा नेता आहे काय, की तुम्ही तरवारी आणि लाठ्या घेऊन मला धरावयास आला आहात?
- मार्क १४:४९सुमारे इ.स. ३३
मी दररोज तुमच्याबरोबर होतो, मंदिराच्या परिसरात शिकवीत असे, पण तुम्ही मला धरले नाही. परंतु धर्मशास्त्र पूर्ण झाले पाहिजे.”
- मार्क १४:५०सुमारे इ.स. ३३
मग सर्वजण त्यांना सोडून पळून गेले.
- मार्क १४:५१सुमारे इ.स. ३३
मात्र, तागाच्या वस्त्राशिवाय अंगावर काहीही न पांघरलेला एक तरुण येशूंच्या मागे चालला होता. जमावाने त्यालाही धरण्याचा प्रयत्न केला,
- मार्क १४:५२सुमारे इ.स. ३३
परंतु आपले वस्त्र सोडून तो तसाच उघडा पळून गेला.
- मार्क १४:५३सुमारे इ.स. ३३
येशूंना महायाजक कयफाकडे नेण्यात आले. लवकरच दुसरे सर्व मुख्य याजक व वडीलजन आणि नियमशास्त्र शिक्षक गोळा झाले.
- मार्क १४:५४सुमारे इ.स. ३३
पेत्र काही अंतरावरून, त्यांच्यामागे चालत, महायाजकाच्या अंगणात आला आणि तिथे तो पहारेकर्यांसोबत जाऊन बसला आणि शेकोटीजवळ ऊब घेत बसला.
- मार्क १४:५५सुमारे इ.स. ३३
मुख्य याजक आणि सर्व यहूदी न्यायसभा येशूंना जिवे मारण्यासाठी पुरावे शोधण्याचा प्रयत्न करीत होते, परंतु ते त्यांना सापडले नाही.
- मार्क १४:५६सुमारे इ.स. ३३
नंतर अनेकांनी त्यांच्याविरुद्ध खोटी साक्ष दिली, परंतु त्यांच्या बोलण्यात ताळमेळ बसत नव्हता.
- मार्क १४:५७सुमारे इ.स. ३३
नंतर काहींनी उठून त्यांच्याविरुद्ध ही खोटी साक्ष दिली:
- मार्क १४:५८सुमारे इ.स. ३३
“आम्ही त्याला बोलताना ऐकले, ‘मनुष्यांनी बांधलेले हे परमेश्वराचे मंदिर मी उद्ध्वस्त करेन आणि तीन दिवसात हातांनी न बांधलेले असे दुसरे मंदिर पुन्हा उभे करेन.’ ”
- मार्क १४:५९सुमारे इ.स. ३३
तरीपण त्यांच्या साक्षीमध्येही काही ताळमेळ नव्हता.
- मार्क १४:६०सुमारे इ.स. ३३
हे ऐकून महायाजक त्यांच्यापुढे उभा राहिला आणि त्याने येशूंना विचारले, “या आरोपांना तू उत्तर देणार नाही काय?” हे लोक जी साक्ष तुझ्याविरुद्ध सांगत आहेत ती काय आहे?
- मार्क १४:६१सुमारे इ.स. ३३
पण ख्रिस्त शांत राहिले आणि त्यांनी काही उत्तर दिले नाही. नंतर महायाजकाने त्यांना पुन्हा विचारले, “धन्यवादित परमेश्वराचा पुत्र ख्रिस्त तो तू आहेस का?”
- मार्क १४:६२सुमारे इ.स. ३३
“मी आहे,” येशूंनी उत्तर दिले, “आणि तुम्ही मानवपुत्राला सर्वसमर्थाच्या उजवीकडे बसलेले आणि आकाशातून मेघारूढ होऊन परत येत असलेले पाहाल.”
- मार्क १४:६३सुमारे इ.स. ३३
महायाजकाने आपली वस्त्रे फाडली आणि तो म्हणाला, “आता आणखी साक्षीदारांची आपल्याला काय गरज आहे?
- मार्क १४:६४सुमारे इ.स. ३३
तुम्ही ईश्वरनिंदा ऐकली आहे, आता तुम्हाला काय वाटते?” तो मृत्युदंडास पात्र आहे असा सर्वांनी त्यांच्यावर आरोप केला.
- मार्क १४:६५सुमारे इ.स. ३३
त्यांच्यापैकी काहीजण येशूंवर थुंकू लागले. त्यांनी त्यांचे डोळे बांधले, त्यांना बुक्क्या मारल्या आणि म्हटले, “भविष्यवाणी करा!” मग पहारेकर्यांनी त्यांना चपराका मारून आपल्या ताब्यात घेतले.