मुख्य मजकुरावर जा

circa 6 BC – AD 30

The Life of Jesus

The eternal Son of God enters history: born in Bethlehem, baptized in the Jordan, crucified at Golgotha, raised on the third day.

3,779 वचने · 4 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मार्क १३:३सुमारे इ.स. ३३

    येशू मंदिरासमोर असलेल्या जैतुनाच्या डोंगरावर बसले असताना, पेत्र, याकोब, योहान आणि आंद्रिया यांनी त्यांना खाजगी रीतीने विचारले,

  2. मार्क १३:४सुमारे इ.स. ३३

    “या घटना केव्हा घडतील या गोष्टी पूर्ण होण्याच्या सुमारास काय चिन्ह असतील हे आम्हाला सांगा.”

  3. मार्क १३:५सुमारे इ.स. ३३

    येशू त्यांना म्हणाले, “कोणीही तुम्हाला फसवू नये म्हणून सावध राहा.

  4. मार्क १३:६सुमारे इ.स. ३३

    कारण अनेकजण माझ्या नावाने येतील आणि, ‘तो मीच आहे,’ असा दावा करतील आणि पुष्कळांना फसवतील.

  5. मार्क १३:७सुमारे इ.स. ३३

    जेव्हा तुम्ही लढायांसंबंधी ऐकाल आणि लढायांच्या अफवा ऐकाल, तेव्हा तुम्ही घाबरू नका. या गोष्टी घडल्याच पाहिजेत. पण शेवट अजूनही यावयाचा आहे.

  6. मार्क १३:८सुमारे इ.स. ३३

    कारण राष्ट्रांविरुद्ध राष्ट्र व राज्याविरुद्ध राज्य उठतील. निरनिराळ्या ठिकाणी भूकंप होतील, दुष्काळ पडतील. या गोष्टी तर प्रसूती वेदनांची सुरुवात आहेत.

  7. मार्क १३:९सुमारे इ.स. ३३

    “तुम्ही सावध असले पाहिजे. तुम्हाला न्यायालयाकडे सोपविले जाईल आणि सभागृहामध्ये तुम्हाला फटके मारण्यात येईल आणि माझ्यामुळे तुम्हाला राज्यपाल आणि राजे त्यांच्यापुढे माझे साक्षी व्हावे लागेल.

  8. मार्क १३:१०सुमारे इ.स. ३३

    प्रथम शुभवार्तेचा प्रचार सर्व राष्ट्रांमध्ये झालाच पाहिजे.

  9. मार्क १३:११सुमारे इ.स. ३३

    परंतु जेव्हा ते तुम्हाला धरून नेतील व तुमच्याविरुद्ध खटला सुरू होईल, तेव्हा तुम्ही काय बोलावे याविषयी आधी चिंता करू नका. त्यावेळी तुम्हाला जे सुचविले जाईल ते बोला. कारण तुम्ही ते बोलणार नाही, तर पवित्र आत्मा बोलेल.

  10. मार्क १३:१२सुमारे इ.स. ३३

    “भाऊ भावाला, पिता आपल्या पोटच्या लेकरांना जिवे मारण्याकरिता विश्वासघाताने धरून देतील. लेकरेही आपल्या आईवडिलांविरुद्ध बंड करतील आणि त्यांचा वध घडवून आणतील.

  11. मार्क १३:१३सुमारे इ.स. ३३

    माझ्यामुळे सर्वजण तुमचा द्वेष करतील, परंतु जो शेवटपर्यंत स्थिर राहील, त्याचे मात्र तारण होईल.

  12. मार्क १३:१४सुमारे इ.स. ३३

    “जेव्हा तुम्ही ‘ओसाडीचा अमंगळ पदार्थ’ ज्या ठिकाणी त्याचा संबंध नाही, त्या ठिकाणी उभा असलेला पाहाल—वाचकाने हे समजून घ्यावे—त्यावेळी जे यहूदीयात आहेत त्यांनी डोंगरांकडे पळून जावे.

  13. मार्क १३:१५सुमारे इ.स. ३३

    जो कोणी घराच्या छपरांवर असेल, त्याने घरातून काही आणण्याकरिता प्रवेश करू नये;

  14. मार्क १३:१६सुमारे इ.स. ३३

    जो शेतात असेल, त्याने आपला अंगरखा नेण्यासाठी परत जाऊ नये.

  15. मार्क १३:१७सुमारे इ.स. ३३

    गर्भवती आणि दूध पाजणार्‍या स्त्रियांसाठी तर तो काळ किती क्लेशाचा असेल!

  16. मार्क १३:१८सुमारे इ.स. ३३

    तरी हे हिवाळ्यामध्ये होऊ नये, म्हणून प्रार्थना करा,

  17. मार्क १३:१९सुमारे इ.स. ३३

    कारण ते दिवस इतके कष्टाचे असतील की, परमेश्वराने पृथ्वी निर्माण केल्यापासून आजपर्यंत असे दिवस आले नाहीत किंवा पुढेही येणार नाहीत.

  18. मार्क १३:२०सुमारे इ.स. ३३

    “जर प्रभूने ते दिवस कमी केले नसते, तर कोणी वाचला नसता. तरी केवळ निवडलेल्या लोकांसाठी, ज्यांना त्यांनी निवडले आहे, त्यांच्यासाठी ते कमी केले जातील.

  19. मार्क १३:२१सुमारे इ.स. ३३

    त्या काळात, ‘येथे ख्रिस्त आहे!’ किंवा ‘पाहा, तो तिथे आहे,’ असे जर कोणी तुम्हाला सांगितले, तर अजिबात विश्वास ठेवू नका.

  20. मार्क १३:२२सुमारे इ.स. ३३

    कारण खोटे ख्रिस्त आणि खोटे संदेष्टे उदय पावतील आणि मोठी चिन्हे व अद्भुते करून, साधेल तर, निवडलेल्या लोकांनाही फसवतील.

  21. मार्क १३:२३सुमारे इ.स. ३३

    म्हणून तुम्ही सावध राहा. मी तुम्हाला आधी सर्वकाही सांगून ठेवलेले आहे.

  22. मार्क १३:२४सुमारे इ.स. ३३

    “हा भयानक क्लेशांचा काळ संपल्याबरोबर त्या दिवसात, “ ‘सूर्य अंधकारमय होईल, आणि चंद्र आपला प्रकाश देणार नाही;

  23. मार्क १३:२५सुमारे इ.स. ३३

    आकाशातून तारे गळून पडतील, आणि आकाशमंडळ डळमळेल.’

  24. मार्क १३:२६सुमारे इ.स. ३३

    “त्यावेळी लोक मानवपुत्राला परमेश्वराच्या उजवीकडे बसलेले आणि सामर्थ्याने व पराक्रमाने आकाशात मेघारूढ होऊन परत येत असलेले पाहतील.

  25. मार्क १३:२७सुमारे इ.स. ३३

    आणि चारही दिशांकडून, पृथ्वीच्या व आकाशांच्या या टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत त्यांच्या निवडलेल्या लोकांना एकत्र करण्यासाठी ते आपल्या दूतांस पाठवतील.