circa 6 BC – AD 30
The Life of Jesus
The eternal Son of God enters history: born in Bethlehem, baptized in the Jordan, crucified at Golgotha, raised on the third day.
या कालखंडातील वचने
- मार्क १२:२२सुमारे इ.स. ३३
ते सातही भाऊ मूलबाळ न होता मरण पावले. सर्वांच्या शेवटी ती स्त्री मरण पावली.
- मार्क १२:२३सुमारे इ.स. ३३
आता पुनरुत्थान होईल त्यावेळी ती स्त्री कोणाची पत्नी होईल, कारण त्या सातही जणांनी तिच्याशी विवाह केला होता?”
- मार्क १२:२४सुमारे इ.स. ३३
येशूंनी उत्तर दिले, “तुम्ही चुकत नाहीत काय, कारण ना तुम्ही धर्मशास्त्र जाणता, नाही परमेश्वराचे सामर्थ्य ओळखता?
- मार्क १२:२५सुमारे इ.स. ३३
जेव्हा मृत लोक उठतील, ते विवाह करत नाही किंवा विवाह करूनही देत नाही; तर ते स्वर्गातील देवदूतांप्रमाणे असतील.
- मार्क १२:२६सुमारे इ.स. ३३
पण आता मृतांच्या पुनरुत्थानासंबंधी, मोशेच्या पुस्तकात जळत्या झुडूपांच्या संदर्भात वाचले नाही काय? परमेश्वराने त्याला असे सांगितले, ‘मी अब्राहामाचा परमेश्वर, इसहाकाचा परमेश्वर आणि याकोबाचा परमेश्वर आहे?’
- मार्क १२:२७सुमारे इ.स. ३३
ते मृतांचे नसून जिवंतांचे परमेश्वर आहेत, तुम्ही फार मोठी चूक करत आहात.”
- मार्क १२:२८सुमारे इ.स. ३३
कोणी एक नियमशास्त्र शिक्षक तिथे आला व त्याने त्यांचा वाद ऐकला. येशूंनी योग्य उत्तर दिले आहे, हे पाहून त्याने येशूंना विचारले, “सर्व आज्ञांपैकी महत्त्वाची कोणती आहे?”
- मार्क १२:२९सुमारे इ.स. ३३
येशूंनी उत्तर दिले, “सर्वात महत्त्वाची आज्ञा ही आहे: ‘हे इस्राएला ऐक: प्रभू आपले परमेश्वर एकच प्रभू आहेत.
- मार्क १२:३०सुमारे इ.स. ३३
प्रभू तुमचे परमेश्वर यांच्यावर तुमच्या पूर्ण हृदयाने, तुमच्या पूर्ण जिवाने आणि तुमच्या पूर्ण मनाने आणि तुमच्या पूर्णशक्तीने प्रीती करा.’
- मार्क १२:३१सुमारे इ.स. ३३
दुसरी ही आहे: ‘जशी तुम्ही स्वतःवर तशी तुमच्या शेजार्यावर प्रीती करा.’ या आज्ञांपेक्षा दुसरी कोणतीही आज्ञा मोठी नाही.”
- मार्क १२:३२सुमारे इ.स. ३३
“योग्य बोललात, गुरुजी” त्या मनुष्याने उत्तर दिले, “परमेश्वर ‘एकच आहेत आणि त्यांच्याशिवाय दुसरे परमेश्वर नाहीत’ हे आपण बरोबर सांगितले आहे.
- मार्क १२:३३सुमारे इ.स. ३३
त्यांच्यावर पूर्ण अंतःकरणाने आणि तुमच्या पूर्ण जिवाने आणि तुमच्या पूर्णशक्तीने प्रीती करणे आणि जशी स्वतःवर तशी तुमच्या शेजार्यावर प्रीती करणे, हे सर्व प्रकारची होमार्पणे व बली वाहण्यापेक्षा फारच महत्त्वाचे आहे.”
- मार्क १२:३४सुमारे इ.स. ३३
त्याने सुज्ञतेने उत्तर दिले आहे हे पाहून येशू त्याला म्हणाले, “तू परमेश्वराच्या राज्यापासून दूर नाहीस.” आणि तेव्हापासून कोणी त्यांना आणखी प्रश्न विचारावयास धजले नाहीत.
- मार्क १२:३५सुमारे इ.स. ३३
नंतर मंदिराच्या आवारात लोकांना शिक्षण देतांना, येशूंनी त्यांना विचारले, “ख्रिस्त, हा दावीदाचा पुत्र आहे, असे तुमचे नियमशास्त्र शिक्षक का म्हणतात?”
- मार्क १२:३६सुमारे इ.स. ३३
कारण दावीद स्वतः पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने म्हणतो, “ ‘प्रभू माझ्या प्रभूला म्हणाले, “मी तुझ्या शत्रूंना, तुझ्या पायाखाली ठेवीपर्यंत, तू माझ्या उजव्या हाताला बसून राहा.” ’
- मार्क १२:३७सुमारे इ.स. ३३
स्वतः दावीद त्यांना ‘प्रभू’ असे म्हणतो तर तो त्याचा पुत्र कसा असू शकेल?” जमलेला मोठा जमाव येशूंचे भाषण मोठ्या आनंदाने ऐकत होता.
- मार्क १२:३८सुमारे इ.स. ३३
येशू शिकवीत होते, ते म्हणाले, “या नियमशास्त्राच्या शिक्षकांबाबत खबरदारी बाळगा! त्यांना लांब झगे घालून बाजारात लोकांकडून आदरपूर्वक अभिवादन घेणे,
- मार्क १२:३९सुमारे इ.स. ३३
सभागृहामध्ये आणि मेजवान्यामध्ये उत्तम व मानाच्या जागा मिळविणे फार आवडते.
- मार्क १२:४०सुमारे इ.स. ३३
ते देखाव्यासाठी लांबलचक प्रार्थना करतात आणि विधवांची घरे लुबाडतात, अशा लोकांना अधिक शिक्षा होईल.”
- मार्क १२:४१सुमारे इ.स. ३३
येशू दानपात्रासमोर बसले आणि समुदाय मंदिरातील दानपात्रामध्ये आपले दान कसे टाकतात हे लक्षपूर्वक पाहत होते. पुष्कळ धनवान लोकांनी पुष्कळ दान टाकले.
- मार्क १२:४२सुमारे इ.स. ३३
मग एक गरीब विधवा आली आणि या गरीब विधवेला तांब्याची दोन छोटी नाणी टाकताना त्यांनी पाहिले, ज्याची किंमत फक्त एक पैसा होती.
- मार्क १२:४३सुमारे इ.स. ३३
ते पाहून येशूंनी आपल्या शिष्यांना जवळ बोलावून सांगितले, “मी तुम्हाला निश्चित सांगतो की, या गरीब विधवेने दान पात्रात इतर सर्वांपेक्षा अधिक टाकले आहे.
- मार्क १२:४४सुमारे इ.स. ३३
कारण त्या सर्वांनी आपल्या संपत्तीतून थोडेसे दिले, पण हिने तर आपल्या गरिबीतून सर्व देऊन टाकले—जी तिची उपजीविका होती.”
- मार्क १३:१सुमारे इ.स. ३३
येशू मंदिरातून बाहेर निघत असताना, त्यांच्या शिष्यांपैकी एकजण त्यांना म्हणाले, “पाहा ना, गुरुजी! किती भव्य हे दगड आणि सुंदर इमारती!”
- मार्क १३:२सुमारे इ.स. ३३
येशू उत्तरले, “तुम्ही आता या भव्य इमारती पाहता ना? याच्या एका दगडावर दुसरा दगड राहणार नाही. प्रत्येक दगड पाडला जाईल.”