मुख्य मजकुरावर जा

circa 6 BC – AD 30

The Life of Jesus

The eternal Son of God enters history: born in Bethlehem, baptized in the Jordan, crucified at Golgotha, raised on the third day.

3,779 वचने · 4 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मार्क ११:५सुमारे इ.स. ३३

    त्यावेळी उभ्या असलेल्या काहींनी विचारले, “तुम्ही बांधलेल्या शिंगरूचे काय करत आहात?”

  2. मार्क ११:६सुमारे इ.स. ३३

    येशूंनी त्यांना सांगितल्याप्रमाणेच त्यांनी उत्तर दिले. तेव्हा त्या माणसांनी त्यांना जाऊ दिले.

  3. मार्क ११:७सुमारे इ.स. ३३

    जेव्हा त्यांनी ते शिंगरू येशूंकडे आणले आणि त्यावर बसण्यासाठी आपले वस्त्रे शिंगराच्या पाठीवर घातले, तेव्हा येशू त्यावर बसले.

  4. मार्क ११:८सुमारे इ.स. ३३

    अनेक लोकांनी आपले अंगरखे काढून रस्त्यावर पसरले आणि दुसर्‍यांनी शेतातून तोडून आणलेल्या डाहळ्या रस्त्यावर पसरल्या.

  5. मार्क ११:९सुमारे इ.स. ३३

    मग जे त्यांच्यापुढे गेले आणि जे त्यांच्यामागून चालले ते मोठ्याने ओरडून म्हणाले: “होसान्ना!” “प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो!”

  6. मार्क ११:१०सुमारे इ.स. ३३

    “आमचा पिता दावीदाचे येणारे राज्य आशीर्वादित होवो!” “सर्वोच्च स्वर्गात होसान्ना!”

  7. मार्क ११:११सुमारे इ.स. ३३

    येशूंनी यरुशलेममध्ये प्रवेश केला आणि ते मंदिराच्या अंगणात गेले. त्यांनी सर्व गोष्टींचे बारकाईने निरीक्षण केले, कारण आता उशीर झाला होता, म्हणून आपल्या बारा शिष्यांबरोबर ते बेथानीस गेले.

  8. मार्क ११:१२सुमारे इ.स. ३३

    दुसर्‍या दिवशी ते बेथानी सोडत असताना, येशूंना भूक लागली.

  9. मार्क ११:१३सुमारे इ.स. ३३

    काही अंतरावर पानांनी बहरलेले एक अंजिराचे झाड त्यांच्या दृष्टीस पडले, त्यावर काही फळे सापडतील या शोधार्थ ते तिथे गेले. तिथे पोहोचल्यावर, त्यांना फक्त पानांशिवाय काही आढळले नाही, कारण तो अंजिरांचा हंगाम नव्हता.

  10. मार्क ११:१४सुमारे इ.स. ३३

    तेव्हा येशू झाडाला म्हणाले, “तुझे फळ कोणीही कधीही न खावो.” त्यांचे हे बोलणे शिष्य ऐकत होते.

  11. मार्क ११:१५सुमारे इ.स. ३३

    यरुशलेमला पोहोचल्यावर, येशू मंदिराच्या अंगणात गेले आणि तिथे खरेदीविक्री करणार्‍या सर्वांना ते बाहेर घालवून देऊ लागले. पैशाची अदलाबदल करणार्‍यांचे मेज आणि कबुतरे विकणार्‍यांची आसने त्यांनी उधळून लावली.

  12. मार्क ११:१६सुमारे इ.स. ३३

    त्याचप्रमाणे मंदिराच्या आवारातून विक्रीच्या मालाची नेआण करण्यासही त्यांनी मनाई केली.

  13. मार्क ११:१७सुमारे इ.स. ३३

    येशू त्यांना शिकवीत होते, ते म्हणाले, “असे लिहिले नाही का: माझ्या घराला ‘सर्व राष्ट्रांसाठी प्रार्थना घर म्हणतील,’ परंतु तुम्ही ती ‘लुटारूंची गुहा केली आहे.’ ”

  14. मार्क ११:१८सुमारे इ.स. ३३

    येशूंनी काय केले, हे प्रमुख याजकवर्ग आणि इतर नियमशास्त्र शिक्षकांनी ऐकले, तेव्हा त्यांना कसे ठार मारता येईल याचा मार्ग ते शोधू लागले. त्यांना येशूंची भीती वाटत होती. कारण त्यांच्या शिक्षणामुळे सर्व समुदाय आश्चर्यचकित झाला होता.

  15. मार्क ११:१९सुमारे इ.स. ३३

    संध्याकाळ झाली, तेव्हा येशू व त्यांचे शिष्य शहराच्या बाहेर गेले.

  16. मार्क ११:२०सुमारे इ.स. ३३

    सकाळी जात असताना अंजिराचे झाड मुळापासून सुकून गेले आहे असे त्यांना दिसले!

  17. मार्क ११:२१सुमारे इ.स. ३३

    पेत्राला आठवण आली आणि त्यांनी येशूंना म्हटले, “गुरुजी, पाहा! ज्याला आपण शाप दिला ते अंजिराचे झाड वाळून गेले आहे!”

  18. मार्क ११:२२सुमारे इ.स. ३३

    येशूंनी उत्तर दिले, “परमेश्वरावर विश्वास ठेवा,

  19. मार्क ११:२३सुमारे इ.स. ३३

    मी तुम्हाला निश्चित सांगतो की, जर कोणी या डोंगराला, ‘ऊठ आणि समुद्रात जाऊन पड,’ असे म्हणेल आणि अंतःकरणात संशय न धरता आपण म्हटले तसे होईल असा विश्वास धरला, तर ती गोष्ट त्यांच्यासाठी केली जाईल.

  20. मार्क ११:२४सुमारे इ.स. ३३

    यास्तव मी तुम्हाला सांगतो की, प्रार्थना करून जे काही मागाल, ते तुम्हाला मिळालेच आहे असा विश्वास ठेवा आणि ते तुम्हाला प्राप्त होईल.

  21. मार्क ११:२५सुमारे इ.स. ३३

    आणि जेव्हा तुम्ही प्रार्थना करावयास उभे राहता, तेव्हा तुमच्या मनात कोणाविरुद्ध काही असेल, तर त्याची क्षमा करा, म्हणजे तुमचा स्वर्गीय पिता तुम्हाला तुमच्या पातकांची क्षमा करतील.

  22. मार्क ११:२६सुमारे इ.स. ३३

    पण तुम्ही क्षमा करणार नाही, तर तुमचा स्वर्गीय पिताही तुम्हाला क्षमा करणार नाही.”

  23. मार्क ११:२७सुमारे इ.स. ३३

    ते परत यरुशलेमला आले, तेव्हा येशू मंदिराच्या आवारात चालत असता, मुख्य याजक व यहूदी पुढारी त्यांच्याकडे आले.

  24. मार्क ११:२८सुमारे इ.स. ३३

    “कोणत्या अधिकाराने या गोष्टी तुम्ही करत आहात? व तुम्हाला हा अधिकार कोणी दिला?” असे त्यांना विचारू लागले.

  25. मार्क ११:२९सुमारे इ.स. ३३

    येशूंनी उत्तर दिले, “मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. त्याचे उत्तर द्या आणि मी हे कोणत्या अधिकाराने करीत आहे, हे मी तुम्हाला सांगेन.