मुख्य मजकुरावर जा

circa 6 BC – AD 30

The Life of Jesus

The eternal Son of God enters history: born in Bethlehem, baptized in the Jordan, crucified at Golgotha, raised on the third day.

3,779 वचने · 4 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. लूक २३:१०सुमारे इ.स. ३३

    इकडे मुख्य याजक आणि नियमशास्त्र शिक्षक उभे राहून आवेशाने येशूंवर आरोप करीत राहिले.

  2. लूक २३:११सुमारे इ.स. ३३

    त्यावेळी हेरोद आणि त्याचे शिपाई येशूंचा उपहास आणि चेष्टा करू लागले. त्यांना झगझगीत कपडे घालून त्यांनी पिलाताकडे परत पाठविले.

  3. लूक २३:१२सुमारे इ.स. ३३

    त्या दिवशी हेरोद आणि पिलात मित्र झाले. त्याआधी ते एकमेकांचे शत्रू होते.

  4. लूक २३:१३सुमारे इ.स. ३३

    नंतर पिलाताने प्रमुख याजक, अधिकारी आणि लोक यांना एकत्र बोलावून म्हटले,

  5. लूक २३:१४सुमारे इ.स. ३३

    “तुम्ही या मनुष्याला, तो लोकांना बंड करावयास चिथावीतो म्हणून माझ्याकडे आणले. मी त्याची तुमच्यासमोर कसून चौकशी केली आणि तो निर्दोष आहे, असे मला आढळून आले.

  6. लूक २३:१५सुमारे इ.स. ३३

    हेरोदाचा निर्णय देखील असाच आहे, म्हणूनच त्याने याला आमच्याकडे परत पाठविले आहे. मरणदंडाची शिक्षा व्हावी असे या मनुष्याने काहीही केलेले नाही.

  7. लूक २३:१६सुमारे इ.स. ३३

    म्हणून मी याला फटके मारतो आणि नंतर त्याला सोडून देतो.”

  8. लूक २३:१७सुमारे इ.स. ३३

    कारण या सणात त्यांच्यासाठी त्याला एका गुन्हेगाराला सोडावे लागत असे.

  9. लूक २३:१८सुमारे इ.स. ३३

    परंतु गर्दीतील सर्व लोक ओरडून म्हणाले, “याला जिवे मारा आणि आमच्यासाठी बरब्बाला सोडा.”

  10. लूक २३:१९सुमारे इ.स. ३३

    बरब्बाला त्यावेळी शहरामध्ये उठाव करणे व खून करणे यासाठी तुरुंगात ठेवले होते.

  11. लूक २३:२०सुमारे इ.स. ३३

    येशूंना सोडून देण्याची पिलाताची इच्छा होती, म्हणून तो त्यांच्याशी वाद घालू लागला

  12. लूक २३:२१सुमारे इ.स. ३३

    पण लोक ओरडतच राहिले, “त्याला क्रूसावर खिळा! त्याला क्रूसावर खिळा!”

  13. लूक २३:२२सुमारे इ.स. ३३

    तरीही आणखी एकदा तिसर्‍या खेपेस पिलाताने खुलासा विचारला, “या मनुष्याने कोणता गुन्हा केला आहे? त्याला क्रूसखांबावर खिळावे असा कोणताही दोष त्याच्यामध्ये मला आढळला नाही, मी त्याला फटके मारून सोडून देतो.”

  14. लूक २३:२३सुमारे इ.स. ३३

    परंतु येशूंना क्रूसावर खिळण्याची मागणी करीत, ते ओरडू लागले, शेवटी त्यांचे ओरडणे सफल झाले,

  15. लूक २३:२४सुमारे इ.स. ३३

    आणि पिलाताने त्यांची मागणी मान्य करण्याचे ठरविले.

  16. लूक २३:२५सुमारे इ.स. ३३

    तसेच त्यांच्या मागणीप्रमाणे, बंडाळी आणि खून करण्याच्या आरोपावरून तुरुंगात असलेला बरब्बाला सोडून दिले आणि येशूंना क्रूसावर खिळावे म्हणून त्यांच्या स्वाधीन केले.

  17. लूक २३:२६सुमारे इ.स. ३३

    ते येशूंना घेऊन जात असताना, कुरेने गावचा रहिवासी शिमोन नावाचा एक मनुष्य रानातून परत येत होता. त्याला त्यांनी धरले व येशूंचा क्रूसखांब त्याच्यावर ठेवला व त्याला तो येशूंच्या मागोमाग वाहून नेण्यास भाग पाडले.

  18. लूक २३:२७सुमारे इ.स. ३३

    येशूंच्या मागे लोकांचा प्रचंड समुदाय चालला होता. त्यांच्यामध्ये अनेक शोक करणार्‍या स्त्रियाही होत्या.

  19. लूक २३:२८सुमारे इ.स. ३३

    तेव्हा येशू त्या स्त्रियांकडे वळून त्यांना म्हणाले, “यरुशलेमच्या कन्यांनो, माझ्यासाठी रडू नका, तर स्वतःसाठी आणि आपल्या मुलाबाळांसाठी रडा.

  20. लूक २३:२९सुमारे इ.स. ३३

    कारण असे दिवस येत आहेत की, त्या दिवसात तुम्ही म्हणाल, ‘लेकरे न झालेल्या स्त्रिया, न प्रसवलेली उदरे व न पाजलेली स्तने धन्य आहेत.’ ”

  21. लूक २३:३०सुमारे इ.स. ३३

    त्यावेळी, “ ‘ते पर्वतांना म्हणतील, “आमच्यावर येऊन पडा!” आणि टेकड्यांना म्हणतील, आम्हाला “झाकून टाका!” ’

  22. लूक २३:३१सुमारे इ.स. ३३

    कारण जर लोक हिरव्या वृक्षाची अशी गत करतात, तर सुकलेल्या वृक्षाचे काय होईल?”

  23. लूक २३:३२सुमारे इ.स. ३३

    येशूंबरोबर आणखी दोन माणसे, दोघेही अपराधी होते, त्यांनाही जिवे मारण्याकरिता नेण्यात आले.

  24. लूक २३:३३सुमारे इ.स. ३३

    जेव्हा ते कवटी म्हटलेल्या जागी आले, तिथे त्यांनी त्याला अपराध्यांबरोबर क्रूसावर खिळले, एक त्यांच्या उजवीकडे आणि दुसरा त्यांच्या डावीकडे होता.

  25. लूक २३:३४सुमारे इ.स. ३३

    तेव्हा येशू म्हणाले, “हे पित्या, यांना क्षमा कर, कारण ते काय करीत आहेत, ते त्यांना समजत नाही.” आणि येशूंची वस्त्रे सैनिकांनी चिठ्ठ्या टाकून वाटून घेतली.