मुख्य मजकुरावर जा

circa 6 BC – AD 30

The Life of Jesus

The eternal Son of God enters history: born in Bethlehem, baptized in the Jordan, crucified at Golgotha, raised on the third day.

3,779 वचने · 4 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. लूक २४:४सुमारे इ.स. ३३

    याबद्दल ते आश्चर्य करीत असतानाच, अकस्मात त्यांच्या बाजूला विजेसारखी चकाकणारी वस्त्रे घातलेले दोन पुरुष उभे राहिले.

  2. लूक २४:५सुमारे इ.स. ३३

    त्यामुळे त्या स्त्रिया भयभीत झाल्या व खाली वाकून त्यांनी आपली तोंडे भूमीकडे केली. पण ते पुरुष त्यांना म्हणाले, “जे जिवंत आहेत त्यांना तुम्ही मृतांमध्ये का शोधता?

  3. लूक २४:६सुमारे इ.स. ३३

    ते येथे नाही, ते पुन्हा उठले आहेत! गालीलात असताना त्यांनी तुम्हाला काय सांगितले होते याची आठवण करा.

  4. लूक २४:७सुमारे इ.स. ३३

    ‘मानवपुत्र दुष्ट लोकांच्या हाती विश्वासघाताने धरून दिला जाईल, त्यांना क्रूसावर खिळून मारण्यात येईल आणि ते तिसर्‍या दिवशी पुन्हा उठतील.’ ”

  5. लूक २४:८सुमारे इ.स. ३३

    तेव्हा त्यांना त्यांचे शब्द आठवले.

  6. लूक २४:९सुमारे इ.स. ३३

    मग कबरेपासून परत येऊन त्यांनी येशूंच्या अकरा शिष्यांना आणि इतर सर्वांना हे वर्तमान सांगितले.

  7. लूक २४:१०सुमारे इ.स. ३३

    ज्या स्त्रिया कबरेकडे गेल्या होत्या, त्यात मरीया मग्दालिया, योहान्ना, याकोबाची आई मरीया आणि इतर ज्या त्यांच्याबरोबर होत्या त्यांनी हे प्रेषितांना सांगितले.

  8. लूक २४:११सुमारे इ.स. ३३

    परंतु त्यांनी त्या स्त्रियांवर विश्वास ठेवला नाही कारण त्यांना त्यांचे शब्द मूर्खपणाचे वाटले.

  9. लूक २४:१२सुमारे इ.स. ३३

    पेत्र कबरेजवळ धावत गेला व त्याने आत डोकावून पाहिले, तेव्हा त्याला केवळ तागाच्या पट्ट्या पडलेल्या दिसल्या, तेव्हा काय घडले असावे याविषयी तो आश्चर्य करीत परत गेला.

  10. लूक २४:१३सुमारे इ.स. ३३

    त्याच दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी, येशूंचे दोन अनुयायी यरुशलेमपासून अंदाजे सात मैल असलेल्या अम्माऊस नावाच्या गावी चालले होते.

  11. लूक २४:१४सुमारे इ.स. ३३

    घडलेल्या त्या सर्व गोष्टींविषयी ते एकमेकांबरोबर बोलत होते.

  12. लूक २४:१५सुमारे इ.स. ३३

    ते एकमेकांशी बोलत व चर्चा करीत असताना प्रत्यक्ष येशू तिथे आले आणि त्यांच्याबरोबर चालू लागले.

  13. लूक २४:१६सुमारे इ.स. ३३

    परंतु ते त्यांना ओळखणार नाहीत असे करण्यात आले होते.

  14. लूक २४:१७सुमारे इ.स. ३३

    येशूंनी त्यांना विचारले, “चालताना, तुम्ही काय चर्चा करीत आहात?” हा प्रश्न ऐकून ते शांत उभे राहिले, त्यांचे चेहरे दुःखी झाले.

  15. लूक २४:१८सुमारे इ.स. ३३

    त्यांच्यापैकी क्लयपा नावाचा एकजण म्हणाला, “गेल्या काही दिवसात यरुशलेममध्ये घडलेल्या त्या घटनांची माहिती नसलेले असे तुम्ही एकटेच आहात काय?”

  16. लूक २४:१९सुमारे इ.स. ३३

    “कशा घटना?” येशूंनी विचारले. ते म्हणाले, “नासरेथ या गावातून आलेल्या येशूंविषयी, जो परमेश्वराच्या आणि सर्व लोकांच्या दृष्टीने उक्ती व कृती यामध्ये सामर्थ्यशाली असा संदेष्टा होता.

  17. लूक २४:२०सुमारे इ.स. ३३

    महायाजकांनी आणि आमच्या अधिकार्‍यांनी त्यांना मृत्युदंडाची शिक्षा दिली, त्यांनी त्यांना क्रूसावर खिळून मारले.

  18. लूक २४:२१सुमारे इ.स. ३३

    परंतु आम्हाला आशा होती की तोच इस्राएलास मुक्ती देणारा होता. या सर्वगोष्टी घडून आज तीन दिवस झाले आहेत.

  19. लूक २४:२२सुमारे इ.स. ३३

    पण आमच्यातील काही स्त्रियांनी आम्हाला आश्चर्याचा मोठाच धक्का दिला आहे. त्या अगदी आज पहाटे कबरेकडे गेल्या.

  20. लूक २४:२३सुमारे इ.स. ३३

    पण त्यांना त्यांचे शरीर सापडले नाही. तेव्हा त्यांनी येऊन सांगितले की त्यांना देवदूतांचे दर्शन झाले व ते म्हणाले की येशू जिवंत आहेत.

  21. लूक २४:२४सुमारे इ.स. ३३

    तेव्हा आमच्यातील काही लोक कबरेकडे गेले आणि त्या स्त्रियांनी जसे सांगितले होते तसेच त्यांना दिसले. परंतु येशूंचे शरीर त्यांना दिसले नाही.”

  22. लूक २४:२५सुमारे इ.स. ३३

    तेव्हा येशू त्यांना म्हणाले, “तुम्ही मूर्ख आहात आणि संदेष्ट्यांनी जे लिहिले आहे त्यावर विश्वास ठेवण्यास मतिमंद आहात.

  23. लूक २४:२६सुमारे इ.स. ३३

    आपल्या गौरवात जाण्यापूर्वी या गोष्टी ख्रिस्ताने सहन करणे गरजेचे आहे असे नाही काय?”

  24. लूक २४:२७सुमारे इ.स. ३३

    नंतर त्यांनी संपूर्ण धर्मशास्त्रातील मोशे व सर्व संदेष्ट्यांच्या लिखाणामधून स्वतःविषयी काय सांगितले आहे, हे त्यांना स्पष्ट केले.

  25. लूक २४:२८सुमारे इ.स. ३३

    जेव्हा ते त्या गावाजवळ आले जिथे ते जात होते, तेव्हा येशूंनी पुढे जाणे चालू ठेवले, जसे की ते पुढे जात होते असे दर्शविले.