circa 6 BC – AD 30
The Life of Jesus
The eternal Son of God enters history: born in Bethlehem, baptized in the Jordan, crucified at Golgotha, raised on the third day.
या कालखंडातील वचने
- लूक २४:२९सुमारे इ.स. ३३
परंतु त्यांनी त्यांना आग्रह करून म्हटले, “आमच्या येथे राहा, कारण संध्याकाळ होत चालली आहे.” तेव्हा येशू त्यांच्या घरी गेले.
- लूक २४:३०सुमारे इ.स. ३३
ते भोजनास बसले असताना, येशूंनी भाकर घेतली, आभार मानले, ती मोडली आणि ती त्यांना दिली.
- लूक २४:३१सुमारे इ.स. ३३
तेव्हा त्यांचे डोळे उघडले आणि त्यांनी त्यांना ओळखले. त्याच क्षणाला येशू त्यांच्यापासून अंतर्धान पावले.
- लूक २४:३२सुमारे इ.स. ३३
ते एकमेकास म्हणू लागले, “ते रस्त्याने आपल्यासोबत बोलत असताना आणि आपल्याला शास्त्रलेख समजावून सांगत असताना आपली अंतःकरणे प्रज्वलित झाली नाहीत काय?”
- लूक २४:३३सुमारे इ.स. ३३
तेव्हा त्याच घटकेस ते उठून यरुशलेमास माघारी गेले, तिथे येशूंचे अकरा शिष्य आणि इतर अनुयायी एकत्र जमले आहेत, असे त्यांनी पाहिले.
- लूक २४:३४सुमारे इ.स. ३३
जमलेले लोक म्हणत होते, “प्रभू खरोखर उठले आहे व त्यांनी शिमोनाला दर्शन दिले आहे.”
- लूक २४:३५सुमारे इ.स. ३३
तेव्हा त्या दोघांनी सांगितले की, ते रस्त्याने असताना काय घडले होते आणि येशूंनी भाकर मोडली तेव्हा त्यांनी त्यांना कसे ओळखले.
- लूक २४:३६सुमारे इ.स. ३३
ते हे सर्व सांगत असतानाच, प्रत्यक्ष येशू स्वतः अकस्मात त्यांच्यामध्ये उभे राहिले आणि म्हणाले, “तुम्हाला शांती असो.”
- लूक २४:३७सुमारे इ.स. ३३
आपण एखादा दुष्टात्मा पाहत आहोत असे वाटून, ते सर्व विलक्षण भयभीत झाले.
- लूक २४:३८सुमारे इ.स. ३३
येशूंनी त्यांना विचारले, “तुम्ही का घाबरला आणि तुमच्या मनात संशय का आला?
- लूक २४:३९सुमारे इ.स. ३३
माझे हात व माझे पाय पाहा. मी तोच आहे. भुतांना मांस व हाडे नसतात, पण मला ती आहेत हे तुम्ही पाहत आहात.”
- लूक २४:४०सुमारे इ.स. ३३
हे बोलल्यावर येशूंनी आपले हात व पाय त्यांना दाखविले.
- लूक २४:४१सुमारे इ.स. ३३
त्यावेळी त्यांची हृदये आनंदाने भरली, पण त्याबरोबरच त्यांच्या मनात संशयही दाटला होता. तेव्हा येशूंनी त्यांना विचारले, “तुमच्याजवळ येथे खावयास काही आहे काय?”
- लूक २४:४२सुमारे इ.स. ३३
तेव्हा त्यांनी त्यांना भाजलेल्या माशाचा एक तुकडा दिला.
- लूक २४:४३सुमारे इ.स. ३३
त्यांनी तो घेऊन त्यांच्यादेखत खाल्ला.
- लूक २४:४४सुमारे इ.स. ३३
मग येशू त्यांना म्हणाले, “मोशेचे नियमशास्त्र, संदेष्टे आणि स्तोत्रसंहितेमध्ये जे काही माझ्याविषयी लिहिले आहे ते सर्व खरे झालेच पाहिजे, हे मी तुम्हाला तुमच्याबरोबर असताना सांगितले होते.”
- लूक २४:४५सुमारे इ.स. ३३
मग शास्त्रलेख त्यांना समजावा म्हणून त्यांनी त्यांची मने उघडली.
- लूक २४:४६सुमारे इ.स. ३३
त्यांनी पुढे म्हटले, “ख्रिस्ताने दुःख सहन करावे, मरावे आणि तिसर्या दिवशी मरणातून पुन्हा उठावे या गोष्टी फार पूर्वी लिहून ठेवल्या होत्या.
- लूक २४:४७सुमारे इ.स. ३३
आणि यरुशलेमापासून आरंभ करून सर्व राष्ट्रांमध्ये त्यांच्या नावाने पापांच्या क्षमेसाठी पश्चात्तापाची घोषणा करण्यात यावी.
- लूक २४:४८सुमारे इ.स. ३३
तुम्ही या सर्व गोष्टींचे साक्षी आहात.
- लूक २४:४९सुमारे इ.स. ३३
माझ्या पित्याने अभिवचन दिले ते मी तुम्हाकडे पाठवेन. तर तुम्हाला वरून सामर्थ्य मिळेपर्यंत या शहरातच राहा.”
- लूक २४:५०सुमारे इ.स. ३३
यानंतर येशूंनी त्यांना बेथानी गावापर्यंत नेले आणि आपले हात वर करून आशीर्वाद दिला.
- लूक २४:५१सुमारे इ.स. ३३
येशू त्यांना आशीर्वाद देत असताना त्यांना सोडून स्वर्गात वर घेतले गेले.
- लूक २४:५२सुमारे इ.स. ३३
तेव्हा त्यांनी त्यांना नमन केले आणि मोठ्या आनंदाने ते यरुशलेमास परतले
- लूक २४:५३सुमारे इ.स. ३३
आणि ते मंदिरामध्ये नियमितपणे परमेश्वराची स्तुती करीत राहिले.