मुख्य मजकुरावर जा

circa 6 BC – AD 30

The Life of Jesus

The eternal Son of God enters history: born in Bethlehem, baptized in the Jordan, crucified at Golgotha, raised on the third day.

3,779 वचने · 4 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. लूक २३:३५सुमारे इ.स. ३३

    लोक उभे राहून पाहत होते आणि शासक त्यांची थट्टा करीत होते. ते म्हणत होते, “त्याने दुसर्‍यांचे तारण केले, तो परमेश्वराचा निवडलेला म्हणजे ख्रिस्त असेल तर त्याने स्वतःचा बचाव करावा.”

  2. लूक २३:३६सुमारे इ.स. ३३

    सैनिकांनीही त्यांना शिरक्यात भिजविलेला आंब पिण्यास दिला आणि त्यांचा उपहास केला.

  3. लूक २३:३७सुमारे इ.स. ३३

    ते त्याला म्हणाले, “जर तू यहूद्यांचा राजा असशील तर स्वतःला वाचव.”

  4. लूक २३:३८सुमारे इ.स. ३३

    त्यांच्या डोक्याच्या वर एक लेखपत्रक लावण्यात आले. त्यावर लिहिले होते: हा यहूद्यांचा राजा आहे.

  5. लूक २३:३९सुमारे इ.स. ३३

    गुन्हेगारांपैकी एकजण त्यांची निंदा करून म्हणाला, “तू ख्रिस्त आहेस ना? तर मग स्वतःला आणि आम्हालाही वाचव.”

  6. लूक २३:४०सुमारे इ.स. ३३

    पण दुसर्‍या गुन्हेगाराने पहिल्याला दटावून म्हटले, “तुला परमेश्वराचे भय वाटत नाही काय, तू सुद्धा तीच शिक्षा भोगीत आहेस?

  7. लूक २३:४१सुमारे इ.स. ३३

    आपल्या दुष्ट कृत्यांमुळे आपणास झालेली मरणाची शिक्षा अगदी यथायोग्य आहे. पण याने तर काहीही चूक केली नाही.”

  8. लूक २३:४२सुमारे इ.स. ३३

    मग तो येशूंना म्हणाला, “अहो येशू, आपण आपल्या राज्यात याल, तेव्हा माझी आठवण ठेवा.”

  9. लूक २३:४३सुमारे इ.स. ३३

    येशूंनी त्याला उत्तर दिले, “मी तुला निश्चित सांगतो की आज तू मजबरोबर सुखलोकात असशील.”

  10. लूक २३:४४सुमारे इ.स. ३३

    आता दुपारची वेळ झाली होती, आणि संपूर्ण देशावर दुपारच्या तीन वाजेपर्यंत अंधार पडला.

  11. लूक २३:४५सुमारे इ.स. ३३

    सूर्यप्रकाश देण्याचे थांबला. मंदिराच्या पवित्रस्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत दोन भागात फाटला.

  12. लूक २३:४६सुमारे इ.स. ३३

    तेव्हा येशूंनी पुन्हा एकदा मोठी आरोळी मारून म्हटले, “हे पित्या, मी माझा आत्मा तुमच्या स्वाधीन करतो.” हे शब्द बोलल्यानंतर त्यांनी शेवटचा श्वास घेतला.

  13. लूक २३:४७सुमारे इ.स. ३३

    काय घडले हे पाहून रोमी शताधिपतीने परमेश्वराचे गौरव करून म्हटले, “खरोखर हा मनुष्य नीतिमान होता.”

  14. लूक २३:४८सुमारे इ.स. ३३

    क्रूसावर खिळण्याचा प्रसंग पाहण्याकरिता आलेल्या जमावाने घडलेल्या घटना पाहिल्या, तेव्हा ते शोकाकुल होऊन छाती बडवित घरी परतले.

  15. लूक २३:४९सुमारे इ.स. ३३

    परंतु जे सर्व येशूंना ओळखत होते, त्यामध्ये गालीलाहून त्यांच्यामागे आलेल्या अनेक स्त्रिया काही अंतरावर थांबल्या आणि या गोष्टी पाहत होत्या.

  16. लूक २३:५०सुमारे इ.स. ३३

    यहूदीयातील अरिमथिया शहराचा योसेफ नावाचा एक मनुष्य होता, तो न्यायसभेचा सदस्य असून चांगला व नीतिमान होता.

  17. लूक २३:५१सुमारे इ.स. ३३

    त्याने त्यांच्या या निर्णयाला आणि कारवाईला संमती दिली नव्हती. तो यहूदीयातील अरिमथिया नगरातून आला असून, तो स्वतः परमेश्वराच्या राज्याची वाट पाहत होता.

  18. लूक २३:५२सुमारे इ.स. ३३

    पिलाताकडे जाऊन त्याने येशूंचे शरीर मिळण्यासाठी विनंती केली.

  19. लूक २३:५३सुमारे इ.स. ३३

    त्याने येशूंचे शरीर क्रूसावरून खाली घेतले आणि ते तागाच्या वस्त्रात गुंडाळून खडकात खोदलेल्या एका कबरेत ठेवले, ज्यामध्ये आतापर्यंत कोणालाही ठेवले नव्हते.

  20. लूक २३:५४सुमारे इ.स. ३३

    हे सर्व संस्कार शब्बाथाची तयारी करण्याच्या दिवशी करण्यात आले.

  21. लूक २३:५५सुमारे इ.स. ३३

    येशूंबरोबर गालीलाहून आलेल्या स्त्रियांनी मागोमाग येऊन ती कबर पाहिली आणि येशूंचे शरीर कबरेत कसे ठेवले हे पाहिले.

  22. लूक २३:५६सुमारे इ.स. ३३

    नंतर त्या घरी गेल्या आणि त्यांनी मसाले आणि सुगंधी द्रव्ये तयार केली. परंतु यहूदी नियमशास्त्राच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी शब्बाथाच्या दिवशी विसावा घेतला.

  23. लूक २४:१सुमारे इ.स. ३३

    आठवड्याच्या पहिल्या दिवशी, भल्या पहाटेस, त्या स्त्रियांनी त्यांनी तयार केलेले मसाले घेतले आणि त्या कबरेकडे गेल्या;

  24. लूक २४:२सुमारे इ.स. ३३

    तिथे त्यांनी पाहिले की तो दगड कबरेपासून दूर सरकवलेला आहे,

  25. लूक २४:३सुमारे इ.स. ३३

    परंतु जेव्हा त्यांनी आत प्रवेश केला तेव्हा त्यांना प्रभू येशूंचे शरीर सापडले नाही.