मुख्य मजकुरावर जा

circa 6 BC – AD 30

The Life of Jesus

The eternal Son of God enters history: born in Bethlehem, baptized in the Jordan, crucified at Golgotha, raised on the third day.

3,779 वचने · 4 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. लूक २२:५६सुमारे इ.स. ३३

    एका दासीने त्याला शेकोटीच्या उजेडात बसलेले पाहिले आणि ती त्याच्याकडे निरखून पाहून म्हणाली, “हा मनुष्य येशूंच्या बरोबर होता.”

  2. लूक २२:५७सुमारे इ.स. ३३

    पेत्र नकार देत म्हणाला, “बाई, मी त्या मनुष्याला ओळखत नाही.”

  3. लूक २२:५८सुमारे इ.स. ३३

    थोड्या वेळाने दुसर्‍या एकाने त्याच्याकडे पाहून म्हटले, “तू पण त्यांच्यापैकी एक आहेस.” “महाराज, मी तो नाही,” पेत्र नाकारून म्हणाला.

  4. लूक २२:५९सुमारे इ.स. ३३

    सुमारे तासाभराने आणखी एकाने खात्रीपूर्वक विधान केले व पेत्राला म्हटले, “हा मनुष्य त्यांच्याबरोबर होता. कारण तो गालील प्रांताचा आहे!”

  5. लूक २२:६०सुमारे इ.स. ३३

    हे ऐकून पेत्र त्यांना म्हणू लागला, “अरे माणसा, तू काय बोलतोस हे मला समजत नाही.” तेवढ्यात कोंबडा आरवला.

  6. लूक २२:६१सुमारे इ.स. ३३

    प्रभू येशूंनी पेत्राकडे वळून पाहिले तेव्हा त्याच क्षणाला पेत्राला येशूंचे शब्द आठवले, “पेत्रा, आज कोंबडा आरवण्यापूर्वी तू मला तीन वेळा नाकारशील.”

  7. लूक २२:६२सुमारे इ.स. ३३

    पेत्र दूर निघून गेला आणि मोठ्या दुःखाने रडला.

  8. लूक २२:६३सुमारे इ.स. ३३

    मग पहारेकर्‍यांनी त्यांना बुक्क्या मारल्या व त्यांची थट्टा करावयास सुरुवात केली.

  9. लूक २२:६४सुमारे इ.स. ३३

    त्यांनी त्यांचे डोळे बांधले आणि म्हटले, “अंतर्ज्ञानाने सांग, तुला कोणी चापट मारली?”

  10. लूक २२:६५सुमारे इ.स. ३३

    आणि त्यांनी त्यांची वाटेल तशी निंदा केली व अपमान केला.

  11. लूक २२:६६सुमारे इ.स. ३३

    प्रातःकाळ झाल्यावर, लोकांचे वडीलजन, नियमशास्त्राचे शिक्षक आणि दोघेही मुख्य याजक एकत्रित भेटले आणि येशूंना त्यांच्यासमोर आणण्यात आले.

  12. लूक २२:६७सुमारे इ.स. ३३

    ते म्हणाले, “जर तू ख्रिस्त आहेस तर तसे आम्हाला सांग.” पण येशू म्हणाले, “जर मी तुम्हाला सांगितले, तर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही,

  13. लूक २२:६८सुमारे इ.स. ३३

    आणि जर मी तुम्हाला विचारले, तर तुम्ही उत्तर देणार नाही.

  14. लूक २२:६९सुमारे इ.स. ३३

    परंतु येथून पुढे मानवपुत्राला सर्वसमर्थ परमेश्वराच्या उजवीकडे बसलेले पाहाल.”

  15. लूक २२:७०सुमारे इ.स. ३३

    त्या सर्वांनी विचारले, “तू परमेश्वराचा पुत्र आहेस काय?” येशूंनी उत्तर दिले, “तुम्ही म्हणता मी आहे.”

  16. लूक २२:७१सुमारे इ.स. ३३

    तेव्हा ते म्हणाले, “आता आपल्याला आणखी साक्षीदारांची काय गरज आहे?” ते आपण स्वतः त्याच्याच तोंडून ऐकले आहे.

  17. लूक २३:१सुमारे इ.स. ३३

    नंतर ती सर्व मंडळी उठली व त्यांनी येशूंना पिलाताकडे नेले.

  18. लूक २३:२सुमारे इ.स. ३३

    त्यांनी त्यांच्यावर दोषारोप केला व ते म्हणू लागले, “आम्हाला आढळून आले की हा मनुष्य आमच्या राष्ट्राचा घातपात करू पाहत आहे. कैसराला कर देण्यास विरोध करतो आणि असा दावा करतो की मी ख्रिस्त, राजा आहे.”

  19. लूक २३:३सुमारे इ.स. ३३

    तेव्हा पिलाताने येशूंना विचारले, “तू यहूद्यांचा राजा आहेस काय?” येशूंनी उत्तर दिले, “तुम्ही म्हणता ते बरोबर आहे.”

  20. लूक २३:४सुमारे इ.स. ३३

    तेव्हा पिलात मुख्य याजकांकडे आणि जमावाकडे वळून म्हणाला, “या माणसामध्ये मला कोणताही दोष दिसत नाही.”

  21. लूक २३:५सुमारे इ.स. ३३

    तेव्हा ते अधिकच आग्रह करून म्हणाले, “पण हा मनुष्य सर्व यहूदीया प्रांतातील लोकांस त्याच्या शिकवणीद्वारे भडकावित आहे आणि गालीलापासून सुरुवात करून तो येथे आला आहे.”

  22. लूक २३:६सुमारे इ.स. ३३

    हे ऐकल्यावर पिलाताने विचारले, “तो गालीली आहे काय?”

  23. लूक २३:७सुमारे इ.स. ३३

    तो गालीली असल्याचे समजल्यावर, पिलाताने येशूंना हेरोद राजाकडे घेऊन जाण्यास सांगितले, कारण गालील प्रांत हेरोदाच्या अधिकारकक्षेत होता आणि स्वतः हेरोद त्यावेळी यरुशलेमात होता.

  24. लूक २३:८सुमारे इ.स. ३३

    येशूंना प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाल्यामुळे हेरोद आनंदित झाला. कारण येशूंविषयी त्याने पुष्कळ ऐकले होते आणि त्याने केलेला एखादा चमत्कार डोळ्यांनी पाहण्याची त्याची फार इच्छा होती.

  25. लूक २३:९सुमारे इ.स. ३३

    त्याने येशूंना अनेक प्रश्न विचारले, परंतु येशूंनी त्याच्या एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नाही.