मुख्य मजकुरावर जा

circa 6 BC – AD 30

The Life of Jesus

The eternal Son of God enters history: born in Bethlehem, baptized in the Jordan, crucified at Golgotha, raised on the third day.

3,779 वचने · 4 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. लूक २२:६सुमारे इ.स. ३३

    या गोष्टीला त्याने मान्यता दिली आणि येशूंभोवती समुदाय नसताना त्यांना त्यांच्या हाती देण्याची योग्य संधी तो शोधू लागला.

  2. लूक २२:७सुमारे इ.स. ३३

    आता बेखमीर भाकरीच्या सणाचा दिवस आला, त्या दिवशी वल्हांडणाच्या कोकर्‍याचा बळी दिला जाणार होता.

  3. लूक २२:८सुमारे इ.स. ३३

    येशूंनी पेत्र आणि योहान यांना पुढे पाठविले व म्हणाले, “जा आणि आपल्यासाठी वल्हांडणाच्या भोजनाची तयारी करा.”

  4. लूक २२:९सुमारे इ.स. ३३

    तेव्हा त्या दोघांनी विचारले, “आम्ही कुठे तयारी करावी?”

  5. लूक २२:१०सुमारे इ.स. ३३

    येशूंनी उत्तर दिले, “तुम्ही शहरात जा आणि एक मनुष्य पाण्याने भरलेली मोठी घागर घेऊन जात असलेला तुम्हाला भेटेल. ज्या घरात तो जाईल तिथे त्याच्यामागे जा.

  6. लूक २२:११सुमारे इ.स. ३३

    त्या घराच्या मालकाला सांगा, ‘गुरुजी विचारत आहेत की, ज्या ठिकाणी मला माझ्या शिष्यांबरोबर वल्हांडणाचे भोजन करता येईल ती पाहुण्यांची खोली कुठे आहे?’

  7. लूक २२:१२सुमारे इ.स. ३३

    तो तुम्हाला माडीवरील मोठी तयार असलेली एक खोली दाखवेल. तिथे तयारी करा.”

  8. लूक २२:१३सुमारे इ.स. ३३

    ते गेले आणि येशूंनी सांगितल्याप्रमाणे त्यांना आढळून आले. तेव्हा त्यांनी वल्हांडणाच्या भोजनाची तयारी केली.

  9. लूक २२:१४सुमारे इ.स. ३३

    जेव्हा ती वेळ आली तेव्हा येशू आणि त्यांचे शिष्य मेजावर टेकून भोजन करण्यास बसले.

  10. लूक २२:१५सुमारे इ.स. ३३

    मग ते शिष्यांना म्हणाले, “माझ्या दुःख सहन करण्यापूर्वी तुमच्याबरोबर हे वल्हांडणाचे भोजन करावे अशी माझी फार इच्छा होती.

  11. लूक २२:१६सुमारे इ.स. ३३

    कारण मी तुम्हाला सांगतो की, परमेश्वराच्या राज्यात याची पूर्तता झाल्याशिवाय मी हे भोजन पुन्हा करणार नाही.”

  12. लूक २२:१७सुमारे इ.स. ३३

    नंतर त्यांनी प्याला घेतला, त्याबद्दल उपकार मानले आणि ते म्हणाले, “हा घ्या आणि तुमच्यामध्ये त्याची वाटणी करा.

  13. लूक २२:१८सुमारे इ.स. ३३

    मी तुम्हाला सांगतो की, परमेश्वराचे राज्य येईपर्यंत मी पुन्हा द्राक्षवेलीचा उपज पिणार नाही.”

  14. लूक २२:१९सुमारे इ.स. ३३

    नंतर येशूंनी भाकर घेतली, आभार मानले आणि ती मोडली आणि ती त्यांना देत असताना म्हणाले, “हे माझे शरीर असून ते तुमच्याकरिता दिले जात आहे; माझ्या स्मरणार्थ हे करा.”

  15. लूक २२:२०सुमारे इ.स. ३३

    भोजन झाल्यानंतर येशूंनी द्राक्षारसाचा प्याला हाती घेतला व म्हणाले, “हा प्याला माझ्या रक्ताने केलेला नवा करार आहे, जे रक्त पुष्कळांसाठी ओतले जात आहे.

  16. लूक २२:२१सुमारे इ.स. ३३

    पण पाहा, जो माझा विश्वासघात करणार आहे त्याचा हात माझ्याबरोबर या मेजावर आहे.

  17. लूक २२:२२सुमारे इ.स. ३३

    परमेश्वराच्या संकल्पाप्रमाणे मानवपुत्र जातो खरा, पण जो मनुष्य त्यांना विश्वासघाताने धरून देत आहे त्याचा धिक्कार असो.”

  18. लूक २२:२३सुमारे इ.स. ३३

    हे ऐकून असे कृत्य करणारा आपल्यापैकी कोण असेल, असा प्रश्न ते आपसात विचारू लागले.

  19. लूक २२:२४सुमारे इ.स. ३३

    नंतर शिष्यात आपल्यापैकी सर्वात श्रेष्ठ कोण असा वादविवाद सुरू झाला.

  20. लूक २२:२५सुमारे इ.स. ३३

    येशू त्यांना म्हणाले, “गैरयहूदी लोकांचे राजे त्यांच्यावर हुकमत चालवितात आणि त्यांच्यावर अधिकार गाजविणारे स्वतःला त्यांचे उपकारकर्ते म्हणतात.

  21. लूक २२:२६सुमारे इ.स. ३३

    परंतु तुम्ही त्यांच्यासारखे असू नये. तुमच्यामध्ये जो कोणी श्रेष्ठ होऊ पाहतो, त्याने लहानासारखे झाले पाहिजे आणि जो अधिकार चालवितो त्याने तुमचा सेवक असावे.

  22. लूक २२:२७सुमारे इ.स. ३३

    श्रेष्ठ कोण आहे, जो भोजन करतो, की जो सेवा करतो? अर्थात् जो बसून जेवतो तोच ना? पाहा, सेवा करणार्‍यासारखा मी तुम्हामध्ये आहे.

  23. लूक २२:२८सुमारे इ.स. ३३

    माझ्या परीक्षामध्ये माझ्या बाजूने जे उभे राहिले, ते तुम्हीच आहात.

  24. लूक २२:२९सुमारे इ.स. ३३

    मी तुम्हाला राज्य बहाल करतो, ज्याप्रमाणे माझ्या पित्याने मला एक राज्य बहाल केले आहे,

  25. लूक २२:३०सुमारे इ.स. ३३

    तसेच माझ्या राज्यामध्ये माझ्याबरोबर बसून खातापिता येईल आणि तुम्ही सिंहासनावर बसून इस्राएलाच्या बारा वंशाचा न्यायनिवाडा कराल.