circa 6 BC – AD 30
The Life of Jesus
The eternal Son of God enters history: born in Bethlehem, baptized in the Jordan, crucified at Golgotha, raised on the third day.
या कालखंडातील वचने
- लूक २१:१९सुमारे इ.स. ३३
खंबीरपणे उभे राहा, म्हणजे जीवन मिळवाल.
- लूक २१:२०सुमारे इ.स. ३३
“तुम्ही यरुशलेम शहर शत्रुसैन्यांनी वेढलेले पाहाल, तेव्हा त्याचा विनाशकाळ जवळ आला आहे, हे तुमच्या लक्षात येईल.
- लूक २१:२१सुमारे इ.स. ३३
त्यावेळी जे यहूदीयात आहेत त्यांनी डोंगरांकडे पळून जावे, जे शहरात आहेत त्यांनी ते सोडावे आणि जे बाहेर रानात आहेत, त्यांनी शहरात येण्याचा प्रयत्न करू नये.
- लूक २१:२२सुमारे इ.स. ३३
कारण आता जे सर्व लिहिलेले आहे ते पूर्ण होण्यासाठी हे शिक्षेचे दिवस आहेत.
- लूक २१:२३सुमारे इ.स. ३३
गर्भवती आणि दूध पाजणार्या स्त्रियांसाठी तर तो काळ क्लेशाचा असेल! कारण पृथ्वीवर महान संकटे कोसळतील आणि लोकांवर क्रोधाचा वर्षाव होईल.
- लूक २१:२४सुमारे इ.स. ३३
काही तलवारीमुळे पडतील आणि काहींना सर्व राष्ट्रांमध्ये कैद करून नेण्यात येईल आणि गैरयहूदीयांचा काळ पूर्ण होईपर्यंत यरुशलेम शहरास गैरयहूदी पायाखाली तुडवतील.
- लूक २१:२५सुमारे इ.स. ३३
“तेव्हा सूर्य, चंद्र व तारे यामध्ये चिन्हे घडतील. पृथ्वीवर राष्ट्रे समुद्राच्या गर्जणार्या लाटांनी हैराण होतील आणि गोंधळून जातील.
- लूक २१:२६सुमारे इ.स. ३३
भीतीमुळे लोक बेशुद्ध पडतील, जगावर काय घडून येणार आहे, या गोष्टीमुळे काळजीत पडतील. कारण आकाशमंडळ डळमळेल.
- लूक २१:२७सुमारे इ.स. ३३
त्यावेळी ते मानवपुत्राला परमेश्वराच्या उजवीकडे बसलेले आणि आकाशात मेघारूढ होऊन सामर्थ्याने व पराक्रमाने परत येत असलेले पाहाल.
- लूक २१:२८सुमारे इ.स. ३३
या सर्वगोष्टी घडण्यास प्रारंभ होईल, तेव्हा उभे राहा आणि वर नजर लावा कारण तुमच्या सुटकेची वेळ जवळ आली आहे असे समजा.”
- लूक २१:२९सुमारे इ.स. ३३
नंतर येशूंनी लोकांना हा दाखला सांगितला: “अंजिराच्या झाडाकडे आणि सर्व झाडांकडे पाहा.
- लूक २१:३०सुमारे इ.स. ३३
जेव्हा पालवी फुटू लागते तेव्हा तुम्ही स्वतःच पाहू शकता आणि ओळखता की उन्हाळा जवळ आला आहे.
- लूक २१:३१सुमारे इ.स. ३३
तसेच मी सांगितलेल्या गोष्टी घडत असताना तुम्ही पाहाल, तेव्हा परमेश्वराचे राज्य जवळ आहे हे समजून घ्या.
- लूक २१:३२सुमारे इ.स. ३३
“मी तुम्हाला निश्चित सांगतो की या सर्वगोष्टी घडून आल्याशिवाय ही पिढी खात्रीने नाहीशी होणार नाही.
- लूक २१:३३सुमारे इ.स. ३३
आकाश व पृथ्वी नाहीशी होतील, पण माझी वचने नाहीशी होणार नाहीत.
- लूक २१:३४सुमारे इ.स. ३३
“सावध राहा! नाही तर तुमची अंतःकरणे दारुबाजी, मद्यपान आणि जीवनातील चिंता यामुळे निराश होतील आणि तो दिवस तुम्हावर अकस्मात एखाद्या पाशासारखा येईल.
- लूक २१:३५सुमारे इ.स. ३३
कारण संपूर्ण पृथ्वीवर राहणार्या सर्व लोकांवर तो येईल.
- लूक २१:३६सुमारे इ.स. ३३
पुढे घडणार्या या सर्व गोष्टीतून सुटण्यास आणि मानवपुत्रासमोर उभे राहण्यास तुम्ही समर्थ व्हावे, म्हणून प्रार्थना करा आणि जागृत राहा.”
- लूक २१:३७सुमारे इ.स. ३३
येशू दररोज मंदिरात शिक्षण देण्यासाठी जात असत, नंतर रोज संध्याकाळी ते जैतून डोंगरावर रात्र घालविण्यासाठी जात असत.
- लूक २१:३८सुमारे इ.स. ३३
आणि सर्व लोक त्यांचे ऐकण्यासाठी सकाळीच मंदिराकडे येत.
- लूक २२:१सुमारे इ.स. ३३
आता वल्हांडण सण जवळ आला होता. यालाच बेखमीर भाकरीचा सण म्हणत असत.
- लूक २२:२सुमारे इ.स. ३३
प्रमुख याजकवर्ग आणि नियमशास्त्र शिक्षक आता येशूंना कसे ठार करावे याचा विचार करू लागले. कारण ते लोकांना भीत होते.
- लूक २२:३सुमारे इ.स. ३३
तेव्हा येशूंच्या बारा शिष्यांपैकी एक म्हणजे यहूदाह इस्कर्योत याच्यात सैतानाने प्रवेश केला.
- लूक २२:४सुमारे इ.स. ३३
तो प्रमुख याजकवर्ग आणि मंदिराचे सुरक्षा अधिकाऱ्यांकडे गेला आणि येशूंना विश्वासघाताने कसे धरून देता येईल, याविषयी त्याने त्यांच्याशी चर्चा केली.
- लूक २२:५सुमारे इ.स. ३३
त्यांना आनंद झाला आणि त्यांनी त्याला मोबदला देण्याचे मान्य केले.