मुख्य मजकुरावर जा

circa 6 BC – AD 30

The Life of Jesus

The eternal Son of God enters history: born in Bethlehem, baptized in the Jordan, crucified at Golgotha, raised on the third day.

3,779 वचने · 4 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. लूक २०:४१सुमारे इ.स. ३३

    नंतर येशूंनी त्यांना एक प्रश्न विचारला, “ख्रिस्त हा दावीदाचा पुत्र आहे असे का म्हटले जाते?

  2. लूक २०:४२सुमारे इ.स. ३३

    कारण दावीदाने स्वतः स्तोत्रांच्या पुस्तकात म्हटले आहे: “ ‘प्रभू माझ्या प्रभूला म्हणाले, “मी तुझ्या शत्रूंना तुझ्या पायाखाली ठेवीपर्यंत माझ्या उजव्या हाताला बसून राहा.” ’

  3. लूक २०:४३सुमारे इ.स. ३३

    Till I make thine enemies thy footstool.

  4. लूक २०:४४सुमारे इ.स. ३३

    दावीदच ख्रिस्ताला ‘प्रभू’ म्हणतो तर तो त्याचा पुत्र कसा असू शकेल?”

  5. लूक २०:४५सुमारे इ.स. ३३

    सभोवतालचा लोकसमुदाय हे ऐकत असतानाच ते आपल्या शिष्यांकडे वळून त्यांना म्हणाले,

  6. लूक २०:४६सुमारे इ.स. ३३

    “या नियमशास्त्राच्या शिक्षकांपासून सावध राहा. त्यांना लांब झगे घालून बाजारात लोकांकडून आदरपूर्वक अभिवादन घेणे, सभागृहामध्ये आणि मेजवान्यामध्ये उत्तम व मानाच्या जागा मिळविणे प्रिय आहे.

  7. लूक २०:४७सुमारे इ.स. ३३

    ते देखाव्यासाठी लांबलचक प्रार्थना करतात आणि विधवांची घरे लुबाडतात. अशा लोकांना अधिक शिक्षा होईल.”

  8. लूक २१:१सुमारे इ.स. ३३

    जेव्हा येशूंनी पाहिले, की श्रीमंत लोक मंदिरातील दानपात्रामध्ये आपले दान टाकत होते.

  9. लूक २१:२सुमारे इ.स. ३३

    त्यांनी एका गरीब विधवेलासुद्धा तांब्याची दोन छोटी नाणी टाकताना पाहिले.

  10. लूक २१:३सुमारे इ.स. ३३

    येशू म्हणाले, “मी तुम्हाला निश्चित सांगतो की, या गरीब विधवेने इतर सर्वांपेक्षा अधिक दिले आहे.

  11. लूक २१:४सुमारे इ.स. ३३

    कारण या सर्व लोकांनी आपल्या संपत्तीतून दान दिले आहे, परंतु हिने तर आपल्या गरिबीतून सर्व उपजीविका देऊन टाकली.”

  12. लूक २१:५सुमारे इ.स. ३३

    त्यांचे काही शिष्य मंदिराबद्दल प्रशंसा करीत होते की, ते कसे सुंदर पाषाणांनी आणि परमेश्वराला अर्पण केलेल्या देणग्यांनी सजविले आहे. परंतु येशू म्हणाले,

  13. लूक २१:६सुमारे इ.स. ३३

    “जे तुम्ही पाहत आहात, पण अशी वेळ येत आहे की, त्यावेळेस एकावर एक स्थापित असा एकही दगड राहणार नाही; त्यांच्यामधील प्रत्येक दगड खाली पाडला जाईल.”

  14. लूक २१:७सुमारे इ.स. ३३

    “गुरुजी,” शिष्यांनी विचारले, “या गोष्टी केव्हा घडतील? व या गोष्टी होण्याच्या सुमारास काय चिन्हे असतील?”

  15. लूक २१:८सुमारे इ.स. ३३

    येशूंनी उत्तर दिले, “तुम्ही फसविले जाऊ नये म्हणून सावध राहा, कारण अनेकजण माझ्या नावाने येतील आणि ‘मीच तो आहे,’ असा दावा करतील. ते म्हणतील ‘काळ जवळ आला आहे,’ त्यांच्यामागे जाऊ नका.

  16. लूक २१:९सुमारे इ.स. ३३

    तुम्ही लढायासंबंधी ऐकाल व दंगे याविषयी ऐकाल, तेव्हा भयभीत होऊ नका. प्रथम या गोष्टी घडल्याच पाहिजेत, पण शेवट एवढ्यात होणार नाही.”

  17. लूक २१:१०सुमारे इ.स. ३३

    मग त्यांनी म्हटले: “राष्ट्रांविरुद्ध राष्ट्र व राज्याविरुद्ध राज्य उठतील.

  18. लूक २१:११सुमारे इ.स. ३३

    निरनिराळ्या ठिकाणी भूकंप होतील, दुष्काळही पडतील आणि वेगवेगळ्या ठिकाणी साथीचे रोग उद्भवतील, भीतिदायक घटना आणि आकाशात मोठी चिन्हे घडतील.

  19. लूक २१:१२सुमारे इ.स. ३३

    “तरी हे सर्व घडण्यापूर्वी, ते तुम्हाला पकडून तुमचा छळ करतील. माझ्या नावामुळे तुम्हाला सभागृहामध्ये नेतील व तुरुंगात टाकतील आणि तुम्हाला राज्यपाल आणि राजे यांच्यापुढे आणण्यात येईल.

  20. लूक २१:१३सुमारे इ.स. ३३

    यामुळे तुम्हाला त्यांच्यापुढे माझे साक्षी व्हावे लागेल.

  21. लूक २१:१४सुमारे इ.स. ३३

    तेव्हा स्वतःचा बचाव कसा करावा व काय बोलावे याविषयी आधी चिंता करू नका.

  22. लूक २१:१५सुमारे इ.स. ३३

    कारण मी तुम्हाला योग्य शब्द आणि सुज्ञपणाचे विचार सुचवेन की ज्यास तुमचे शत्रू तुम्हाला अडविण्यास किंवा त्याचे खंडन करण्यास असमर्थ ठरतील.

  23. लूक २१:१६सुमारे इ.स. ३३

    आईवडील, भाऊ आणि बहीण, नातेवाईक आणि मित्र, देखील तुमचा विश्वासघात करतील व तुम्हापैकी काहींना जिवे मारतील.

  24. लूक २१:१७सुमारे इ.स. ३३

    माझ्यामुळे सर्वजण तुमचा द्वेष करतील.

  25. लूक २१:१८सुमारे इ.स. ३३

    परंतु तुमच्या डोक्यावरील एका केसाचा देखील नाश होणार नाही.