मुख्य मजकुरावर जा

circa 6 BC – AD 30

The Life of Jesus

The eternal Son of God enters history: born in Bethlehem, baptized in the Jordan, crucified at Golgotha, raised on the third day.

3,779 वचने · 4 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. लूक १९:३९सुमारे इ.स. ३३

    गर्दीत असलेले काही परूशी येशूंना म्हणाले, “गुरुजी, तुमच्या शिष्यांचा निषेध करा.”

  2. लूक १९:४०सुमारे इ.स. ३३

    पण येशूंनी त्यांना उत्तर दिले, “त्यांनी तोंडे बंद केली, तर धोंडे ओरडतील.”

  3. लूक १९:४१सुमारे इ.स. ३३

    जसे ते यरुशलेमजवळ आले आणि ते शहर पाहिले, त्यावरून ते रडले आणि म्हणाले,

  4. लूक १९:४२सुमारे इ.स. ३३

    “जर तू, हो तू सुद्धा, आज या दिवशी फक्त शांतीच्या गोष्टी जाणून घेतल्या असत्या तर! पण आता त्या तुझ्या दृष्टिआड झाल्या आहेत.

  5. लूक १९:४३सुमारे इ.स. ३३

    कारण अशी वेळ येत आहे की तुझे शत्रू तुझ्याभोवती मेढेकोट बांधून तुला वेढतील आणि चहूबाजूंनी तुला कोंडीत धरतील.

  6. लूक १९:४४सुमारे इ.स. ३३

    ते तुला जमीनदोस्त करून टाकतील, तुला आणि तुझ्या मुलांना भिंतींमध्ये गाडतील. ते एका दगडावर दुसरा दगड राहू देणार नाहीत, कारण परमेश्वराची तुझ्याकडे येण्याची वेळ तू ओळखली नाहीस.”

  7. लूक १९:४५सुमारे इ.स. ३३

    नंतर येशू मंदिराच्या अंगणात आले आणि तिथे विक्री करणार्‍यास बाहेर घालवून देऊ लागले.

  8. लूक १९:४६सुमारे इ.स. ३३

    ते त्यांना म्हणाले, “असे लिहिले आहे, ‘माझे घर हे प्रार्थनेचे घर होईल’ पण तुम्ही ते ‘एक लुटारूंची गुहा केली आहे.’”

  9. लूक १९:४७सुमारे इ.स. ३३

    त्यानंतर येशू मंदिराच्या आवारात दररोज शिक्षण देऊ लागले. परंतु प्रमुख याजकवर्ग आणि इतर नियमशास्त्र शिक्षक व वडीलजन त्यांना ठार मारण्याचा बेत करीत होते.

  10. लूक १९:४८सुमारे इ.स. ३३

    परंतु त्यांना कोणताही मार्ग सापडत नव्हता. कारण सर्व लोक येशूंचे मन लावून ऐकत होते.

  11. लूक २०:१सुमारे इ.स. ३३

    एके दिवशी येशू मंदिराच्या अंगणात लोकांना शिकवीत होते आणि शुभवार्तेची घोषणा करीत होते, तेव्हा मुख्य याजक आणि यहूदी पुढारी त्यांच्याकडे आले.

  12. लूक २०:२सुमारे इ.स. ३३

    त्यांनी येशूंना विचारले, “आम्हाला हे सांगा की तुम्ही कोणत्या अधिकाराने हे करत आहात? तुम्हाला हा अधिकार कोणी दिला?”

  13. लूक २०:३सुमारे इ.स. ३३

    येशूंनी उत्तर दिले, “मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, मला सांगा:

  14. लूक २०:४सुमारे इ.स. ३३

    योहानाचा बाप्तिस्मा स्वर्गापासून किंवा मनुष्याकडून होता?”

  15. लूक २०:५सुमारे इ.स. ३३

    या प्रश्नावर त्यांनी एकमेकांबरोबर चर्चा केली आणि म्हणाले, “जर आपण म्हणालो, ‘स्वर्गापासून होता,’ तर ते विचारतील, ‘त्यावर तुम्ही विश्वास का ठेवला नाही?’

  16. लूक २०:६सुमारे इ.स. ३३

    पण जर आपण म्हणालो ‘मनुष्यापासून होता,’ तर सर्व लोक आपल्याला दगडमार करतील. कारण योहान संदेष्टा होता, याबद्दल लोकांची पुरेपूर खात्री होती.”

  17. लूक २०:७सुमारे इ.स. ३३

    शेवटी त्यांनी उत्तर दिले, “तो कुठून होता हे आम्हाला माहीत नाही.”

  18. लूक २०:८सुमारे इ.स. ३३

    यावर येशू त्यांना म्हणाले, “तर मग मीही या गोष्टी कोणत्या अधिकाराने करतो, हे तुम्हाला सांगणार नाही.”

  19. लूक २०:९सुमारे इ.स. ३३

    नंतर लोकांकडे वळून येशूंनी त्यांना हा दाखला सांगितला, “एका मनुष्याने एक द्राक्षमळा लावला. तो मळा काही शेतकर्‍यांना भाड्याने देऊन तो बर्‍याच दिवसासाठी दूर निघून गेला.

  20. लूक २०:१०सुमारे इ.स. ३३

    हंगामाचे दिवस आल्यावर द्राक्षमळ्यातील फळातून काही मिळावे, म्हणून त्याने आपला एक सेवक शेतकर्‍यांकडे पाठविला. परंतु शेतकर्‍यांनी त्याला मार दिला आणि रिकाम्या हाताने माघारी पाठवून दिले.

  21. लूक २०:११सुमारे इ.स. ३३

    त्याने दुसर्‍या सेवकाला त्यांच्याकडे पाठविले, परंतु त्यांनी त्यालासुद्धा मारले आणि लज्जास्पद वागणूक दिली व रिकाम्या हाताने परत पाठविले.

  22. लूक २०:१२सुमारे इ.स. ३३

    तरी त्याने तिसर्‍याला पाठविले आणि त्यांनी त्याला जखमी केले आणि मळ्याबाहेर फेकून दिले.

  23. लूक २०:१३सुमारे इ.स. ३३

    “तेव्हा द्राक्षमळ्याचा धनी स्वतःशीच म्हणाला, ‘मी काय करावे बरे? आता माझा पुत्र ज्याच्यावर मी प्रीती करतो त्याला त्यांच्याकडे पाठवितो. कदाचित ते त्याचा मान राखतील.’

  24. लूक २०:१४सुमारे इ.स. ३३

    “पण शेतकर्‍यांनी मालकाच्या पुत्राला येताना पाहिले, तेव्हा ते आपसात विचार करून म्हणाले, ‘हा तर वारस आहे. आपण त्याला ठार करू या, म्हणजे हे वतन आपलेच होईल.’

  25. लूक २०:१५सुमारे इ.स. ३३

    तेव्हा त्यांनी त्याला द्राक्षमळ्याच्या बाहेर फेकून त्याला मारून टाकले. “आता त्या द्राक्षमळ्याचा धनी त्यांचे काय करेल?