मुख्य मजकुरावर जा

circa 6 BC – AD 30

The Life of Jesus

The eternal Son of God enters history: born in Bethlehem, baptized in the Jordan, crucified at Golgotha, raised on the third day.

3,779 वचने · 4 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. लूक १९:१४सुमारे इ.स. ३३

    “परंतु त्याच्या प्रजेने त्याचा द्वेष केला व त्यांनी त्याच्या पाठोपाठ एक प्रतिनिधीमंडळ हे सांगण्यासाठी पाठविले, ‘हा मनुष्य आमचा राजा असावा अशी आमची इच्छा नाही.’

  2. लूक १९:१५सुमारे इ.स. ३३

    “तरीपण त्याचा राज्याभिषेक करण्यात येऊन तो घरी परतला. मग त्याने ज्या दासांना पैसे दिले होते, त्यांनी त्या पैशावर किती नफा मिळविला, हे पाहण्याकरिता बोलाविले.

  3. लूक १९:१६सुमारे इ.स. ३३

    “पहिला सेवक म्हणाला, ‘महाराज, मी तुमच्या एका मीनावर आणखी दहा मीना मिळविल्या आहेत.’

  4. लूक १९:१७सुमारे इ.स. ३३

    “त्याचा धनी म्हणाला, ‘शाबास, चांगल्या दासा! अतिशय थोडक्या बाबतीत तू विश्वासू राहिलास, म्हणून तू दहा शहरांची जबाबदारी घे.’

  5. लूक १९:१८सुमारे इ.स. ३३

    “नंतर दुसरा दास आला आणि म्हणाला, ‘महाराज, मी तुमच्या मीनावर आणखी पाच मीना मिळविल्या आहेत.’

  6. लूक १९:१९सुमारे इ.स. ३३

    “त्याचा धनी त्याला म्हणाला, ‘तू पाच शहरांची जबाबदारी घे.’

  7. लूक १९:२०सुमारे इ.स. ३३

    “मग तिसरा दास पुढे येऊन म्हणाला, ‘महाराज, ही तुमची मीना घ्या; मी ती एका कापडात गुंडाळून जपून ठेवली होती,

  8. लूक १९:२१सुमारे इ.स. ३३

    तुम्ही एक कठोर गृहृस्थ आहात, म्हणून मला तुमची भीती वाटली. जिथे तुम्ही ठेवले नाही, तिथे घेता आणि जे पेरलेले नाही, ते कापून नेता.’

  9. लूक १९:२२सुमारे इ.स. ३३

    “यावर त्याचा धनी म्हणाला, ‘अरे दुष्ट दासा! मी आता तुझ्या शब्दाप्रमाणेच तुझा न्याय करतो, तुला माहीत होते की मी कठोर स्वभावाचा आहे, जे माझे नाही ते बळकावितो आणि मी स्वतः पेरले नाही ते कापून नेतो,

  10. लूक १९:२३सुमारे इ.स. ३३

    तर माझे रुपये सावकाराकडे गुंतवून ठेवावयास हवे होते, म्हणजे मी परत आल्यावर त्यावर काही व्याज तरी मिळाले असते?’

  11. लूक १९:२४सुमारे इ.स. ३३

    “नंतर तो त्याच्याजवळ जे उभे होते त्यांना म्हणाला, ‘त्याच्याकडून त्याची मीना घ्या आणि ज्याच्याजवळ दहा मीना आहेत त्याला द्या.’

  12. लूक १९:२५सुमारे इ.स. ३३

    “पण ‘महाराज,’ ते म्हणाले, ‘त्याच्याजवळ आधीच दहा मीना आहेत.’

  13. लूक १९:२६सुमारे इ.स. ३३

    “यावर त्याने उत्तर दिले, ‘मी तुम्हाला सांगतो, कारण ज्याला आहे त्याला अधिक दिले जाईल व ज्याच्याजवळ नाही त्याच्याजवळ जे असेल ते देखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल.’

  14. लूक १९:२७सुमारे इ.स. ३३

    आणि आता ज्यांनी मला त्यांचा राजा मानण्याचे नाकारले आहे, त्या माझ्या शत्रूंना येथे आणा आणि माझ्यासमोर त्यांचा वध करा.”

  15. लूक १९:२८सुमारे इ.स. ३३

    हा दाखला सांगितल्यानंतर येशू यरुशलेमच्या दिशेने निघाले. ते आपल्या शिष्यांपुढे चालत होते.

  16. लूक १९:२९सुमारे इ.स. ३३

    जैतून डोंगरावर असलेल्या बेथफगे व बेथानी या गावाजवळ ते आले, तेव्हा येशूंनी आपल्या शिष्यांपैकी दोन शिष्यांना असे सांगून पाठविले की:

  17. लूक १९:३०सुमारे इ.स. ३३

    “समोरच्या गावात जा आणि तिथे शिरताच, ज्याच्यावर कधी कोणी स्वार झाले नाही असे एक शिंगरू बांधून ठेवलेले तुम्हाला आढळेल. ते सोडून इकडे आणा.

  18. लूक १९:३१सुमारे इ.स. ३३

    ‘तुम्ही हे शिंगरू का सोडीत आहात?’ असे कोणी तुम्हाला विचारले, तर त्याला सांगा, ‘प्रभूला त्याची गरज आहे.’ ”

  19. लूक १९:३२सुमारे इ.स. ३३

    ज्यांना पुढे पाठविले होते, ते तिथे गेल्यावर त्यांना सांगितल्याप्रमाणेच आढळून आले.

  20. लूक १९:३३सुमारे इ.स. ३३

    ते शिंगरू सोडीत असताना शिंगराच्या धन्यांनी त्यांना विचारले, “तुम्ही शिंगरू का सोडीत आहात?”

  21. लूक १९:३४सुमारे इ.स. ३३

    त्यांनी उत्तर दिले, “प्रभूला याची गरज आहे.”

  22. लूक १९:३५सुमारे इ.स. ३३

    त्यांनी ते शिंगरू येशूंकडे आणले, त्यांनी त्यांची वस्त्रे, शिंगराच्या पाठीवर घातली आणि येशूंना त्याच्यावर बसविले.

  23. लूक १९:३६सुमारे इ.स. ३३

    जेव्हा ते त्यांच्याबरोबर निघाले, लोकांनी आपले अंगरखे रस्त्यावर पसरले.

  24. लूक १९:३७सुमारे इ.स. ३३

    जैतून डोंगराच्या उतरणीवरून सुरू होणार्‍या रस्त्यावर त्यांच्या शिष्यांचा समुदाय होता, ज्यांनी येशूंचे जे अद्भुत चमत्कार पाहिले होते, त्याबद्दल ते परमेश्वराची स्तुती करीत घोषणा देऊ लागले:

  25. लूक १९:३८सुमारे इ.स. ३३

    “प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो!” “स्वर्गात शांती आणि परमोच्चस्थानी गौरव!”