मुख्य मजकुरावर जा

circa 800–400 BC

The Hebrew Prophets

God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.

3,706 वचने · 14 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यिर्मयाह ३१:३९सुमारे इ.स.पू. ६०६

    आणि गारेबच्या टेकडीपासून गोआहपर्यंत मापनसूत्र विस्तारित केले जाईल.

  2. यिर्मयाह ३१:४०सुमारे इ.स.पू. ६०६

    संपूर्ण खोरे जिथे प्रेते व राख फेकण्यात येत असे, व त्याचप्रमाणे किद्रोनच्या खोऱ्यापर्यंतची आणि तिथून पूर्वेकडील घोडवेशी पर्यंतची सर्व शेते याहवेहला पवित्र अशी होतील. या नगराचा पुन्हा कधीही पाडाव किंवा विध्वंस होणार नाही.”

  3. यिर्मयाह ३२:१सुमारे इ.स.पू. ५८९

    यहूदीयाचा राजा सिद्कीयाह याच्या राजवटीच्या दहाव्या वर्षी, म्हणजे बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी, याहवेहकडून यिर्मयाहला पुढील वचन प्राप्त झाले:

  4. यिर्मयाह ३२:२सुमारे इ.स.पू. ५८९

    यावेळी बाबेलच्या राजाच्या सैन्याने यरुशलेमला वेढा घातलेला होता, व यिर्मयाह संदेष्टा यहूदीयाच्या राजवाड्याच्या तळघरातील कोठडीत कैदेत होता.

  5. यिर्मयाह ३२:३सुमारे इ.स.पू. ५८९

    यहूदीयाचा राजा सिद्कीयाहने यिर्मयाहला कैदेत टाकले, असे म्हणून, “तू असा संदेश का देतोस? तू म्हणतोस याहवेह असे म्हणतात: ‘मी आता बाबेलच्या राजाच्या हातात हे नगर देणार आहे, आणि तो ते हस्तगत करणार आहे.

  6. यिर्मयाह ३२:४सुमारे इ.स.पू. ५८९

    यहूदीयाचा राजा सिद्कीयाहची खास्द्यांच्या हातून सुटका होणार नाही, पण तो निश्चितच बाबेलच्या राजाच्या हातात पडेल व त्याच्याशी तो समोरासमोर बोलेल आणि सर्व स्वतःच्या डोळ्याने बघेल.

  7. यिर्मयाह ३२:५सुमारे इ.स.पू. ५८९

    तो राजा सिद्कीयाहला खास्द्यांच्या येथे नेईल व मी येऊन तुझी भेट घेईपर्यंत तो तिथेच राहील, असे याहवेह जाहीर करतात. जर तू बाबेलांशी युद्ध केलेस तरी तुला विजय मिळणार नाही.’ ”

  8. यिर्मयाह ३२:६सुमारे इ.स.पू. ५८९

    यिर्मयाह म्हणाला, याहवेहकडून मला हे वचन आले आहे:

  9. यिर्मयाह ३२:७सुमारे इ.स.पू. ५८९

    शल्लूमचा पुत्र हानामेल, तुझा चुलतभाऊ, लवकरच येऊन तुला भेटेल व म्हणेल, ‘अनाथोथ येथील माझे शेत तू विकत घे, कारण तू माझा सर्वात जवळचा नातेवाईक म्हणून ते विकत घेण्याचे तुझे कर्तव्य आहे.’

  10. यिर्मयाह ३२:८सुमारे इ.स.पू. ५८९

    “याहवेहने म्हटल्याप्रमाणे माझा चुलतभाऊ हानामेल आला व त्याने तुरुंगात माझी भेट घेतली. तो मला म्हणाला, ‘बिन्यामीन प्रांतातील अनाथोथ येथील माझे शेत विकत घे, कारण कायद्याप्रमाणे ते सोडवून त्याची मालकी घेण्याचा प्रथम हक्क तुझा आहे, म्हणून ते तुझ्यासाठी तू विकत घे.’ “तत्काळ माझी खात्री झाली की हा संदेश खरोखर याहवेहकडून आला होता;

  11. यिर्मयाह ३२:९सुमारे इ.स.पू. ५८९

    मग मी माझा चुलतभाऊ हानामेलला सतरा शेकेल चांदी देऊन अनाथोथ येथील ते शेत विकत घेतले.

  12. यिर्मयाह ३२:१०सुमारे इ.स.पू. ५८९

    साक्षीदारांच्या सहीसमेत मी खरेदीखतावर सही केली, त्यावर शिक्का मारला व चांदी तोलून त्याला दिली.

  13. यिर्मयाह ३२:११सुमारे इ.स.पू. ५८९

    नंतर मी शर्ती व अटी नमूद केलेले—मोहोरबंद केलेले खरेदीखत घेतले, तसेच त्या खतपत्राची मोहोर न केलेली प्रत घेतली—

  14. यिर्मयाह ३२:१२सुमारे इ.स.पू. ५८९

    आणि सर्वांसमक्ष, माझा चुलतभाऊ हानामेल, खरेदीखतावर सह्या करणारे साक्षीदार त्यांच्या समक्ष व सर्व यहूदी पहारेकऱ्यांच्या चौकात बसले असताना, ती कागदपत्रे बारूख, जो नेरीयाहचा पुत्र, महसेयाहचा नातू, याच्या स्वाधीन केली.

  15. यिर्मयाह ३२:१३सुमारे इ.स.पू. ५८९

    “सर्व लोक ऐकत असताना मी नेरीयाहचा पुत्र बारूखाला या सूचना दिल्या:

  16. यिर्मयाह ३२:१४सुमारे इ.स.पू. ५८९

    ‘सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: मोहोरबंद खरेदीखत व त्याची प्रत ही दोन्हीही घेऊन दीर्घकाळापर्यंत टिकून राहवी म्हणून ती मातीच्या एका पात्रात घालून ठेव.

  17. यिर्मयाह ३२:१५सुमारे इ.स.पू. ५८९

    कारण सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: पुढे या देशामध्ये पुन्हा घरेदारे, शेते, द्राक्षमळे यांची खरेदी करण्यात येईल.’

  18. यिर्मयाह ३२:१६सुमारे इ.स.पू. ५८९

    “मग खरेदीखत नेरीयाहचा पुत्र, नेरीयाहचा पुत्र बारूखच्या हवाली केल्यावर मी याहवेहकडे प्रार्थना केली.

  19. यिर्मयाह ३२:१७सुमारे इ.स.पू. ५८९

    “हे सार्वभौम याहवेह, तुमच्या महान शक्तीने व विस्तारलेल्या भुजेने तुम्ही स्वर्ग व पृथ्वी निर्माण केली आहे. तुम्हाला अवघड असे काहीच नाही.

  20. यिर्मयाह ३२:१८सुमारे इ.स.पू. ५८९

    तुम्ही हजारांवर प्रीती करता, परंतु वडिलांच्या पापांसाठी मुलांना शिक्षा होतेच. परमथोर आणि सामर्थ्यवान, ज्यांचे नाव सर्वसमर्थ याहवेह आहे.

  21. यिर्मयाह ३२:१९सुमारे इ.स.पू. ५८९

    तुमच्या योजना महान आहेत व तुमची कार्ये अद्वितीय आहेत. सर्व मानवजातीचे मार्ग तुमच्या नेत्रांना उघड दिसतात; प्रत्येकाला तुम्ही त्याच्या वागणुकीनुसार व कृत्यानुसार योग्य मोबदला देता.

  22. यिर्मयाह ३२:२०सुमारे इ.स.पू. ५८९

    तुम्ही इजिप्त देशात, इस्राएलमध्ये व सर्व मानवजातीत चिन्हे व चमत्कार केले व आजही करीत आहात, त्यामुळे तुमच्या नावाला आजतागायत महान थोरवी लाभली आहे.

  23. यिर्मयाह ३२:२१सुमारे इ.स.पू. ५८९

    चिन्ह व चमत्कारांनी आणि सशक्त बाहूंनी व विस्तारलेल्या भुजांनी, तसेच मोठी दहशत बसवून तुम्ही तुमच्या इस्राएली लोकांना इजिप्तमधून बाहेर आणले.

  24. यिर्मयाह ३२:२२सुमारे इ.स.पू. ५८९

    आमच्या पूर्वजांना दिलेल्या शपथपूर्वक वचनाप्रमाणे, तुम्ही इस्राएलला दूध व मध वाहता देश दिला.

  25. यिर्मयाह ३२:२३सुमारे इ.स.पू. ५८९

    ते इथे आले व त्यांनी या देशाचा ताबा घेतला, परंतु तुमचे आज्ञापालन करण्याचे व तुमचे नियम अनुसरण्याचे त्यांनी नाकारले; म्हणूनच तुम्ही त्यांच्यावर हे सर्व अरिष्ट आणले आहे.