मुख्य मजकुरावर जा

circa 800–400 BC

The Hebrew Prophets

God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.

3,706 वचने · 14 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यिर्मयाह ३०:१३सुमारे इ.स.पू. ६०६

    तुझे समर्थन करण्यासाठी कोणीही नाही, तुझ्या दुखापतीवर काहीही इलाज नाही, तुला आरोग्य प्राप्त होणार नाही.

  2. यिर्मयाह ३०:१४सुमारे इ.स.पू. ६०६

    तुझे सर्व मित्रगण तुला विसरले आहेत; त्यांना तुझी चिंता नाही; एखाद्या शत्रुगत मी तुला जखमी केले आहे निर्दयागत मी तुला शासन केले, कारण तुझा अपराध फार मोठा आहे तुझी पातके पुष्कळ झाली आहेत.

  3. यिर्मयाह ३०:१५सुमारे इ.स.पू. ६०६

    तुझ्या जखमेबद्दल तू विलाप का करतोस, तुझ्या दुखण्यावर काहीही इलाज नाही का? कारण तुझा अपराध खूप मोठा व तुझी पातके अनेक आहेत म्हणून मी तुझ्याशी असा व्यवहार केला.

  4. यिर्मयाह ३०:१६सुमारे इ.स.पू. ६०६

    “ ‘परंतु ज्यांनी तुला गिळंकृत केले, ते गिळंकृत केले जातील; तुझे सर्व शत्रू बंदिवासात जातील. ज्यांनी तुला लुटले, तेच लुटले जातील; ज्यांनी तुला लुबाडले, तेच लुबाडल्या जातील.

  5. यिर्मयाह ३०:१७सुमारे इ.स.पू. ६०६

    मी तुझे आरोग्य पुनर्स्थापित करेन आणि तुझ्या जखमा बर्‍या करेन,’ याहवेह जाहीर करतात, ‘कारण तू बहिष्कृत म्हणविली जात होती, सीयोन नगरी, जिची कोणासही चिंता नाही.’

  6. यिर्मयाह ३०:१८सुमारे इ.स.पू. ६०६

    “परंतु याहवेह असे म्हणतात: “ ‘मी तुझी धनसंपत्ती तुला परत देईन, आणि याकोबाच्या निवासावर करुणा करेन; त्याच्या भग्नावशेषांवरही नगरी पुन्हा बांधली जाईल आणि राजवाडा पुन्हा त्याच्या ठराविक जागी उभारला जाईल.

  7. यिर्मयाह ३०:१९सुमारे इ.स.पू. ६०६

    तिथून उपकारस्तुतिगान गाईले जातील आणि आनंदगीतांचे ध्वनी येतील. मी त्यांची लोकसंख्या वाढवेन, पण त्यात घट होऊ देणार नाही; मी त्यांना प्रतिष्ठित करेन, पण ते तुच्छ मानले जाणार नाहीत.

  8. यिर्मयाह ३०:२०सुमारे इ.स.पू. ६०६

    त्यांची मुलेबाळे पूर्ववत होतील, त्यांचे समाज माझ्यासमोर स्थापित होतील; त्यांचा छळ करणार्‍या सर्वांना मी शिक्षा करेन.

  9. यिर्मयाह ३०:२१सुमारे इ.स.पू. ६०६

    त्यांना त्यांच्या स्वजनापैकीच राजा पुन्हा लाभेल; त्यांचा शासनकर्ता त्यांच्यामधून उभारल्या जाईल. मी त्याला माझ्या निकट आणेन आणि तो माझ्या निकट येईल, कारण माझ्या निकट येण्यासाठी त्याने स्वतःस मला समर्पित केले पाहिजे ना?’ असे याहवेह जाहीर करतात.

  10. यिर्मयाह ३०:२२सुमारे इ.स.पू. ६०६

    ‘तुम्ही माझे लोक व्हाल व मी तुमचा परमेश्वर होईन.’ ”

  11. यिर्मयाह ३०:२३सुमारे इ.स.पू. ६०६

    पाहा, याहवेहचे भयावह वादळ पाहा. त्याचा प्रकोपात स्फोट होईल, दुष्टांच्या मस्तकावर ते एका वावटळीप्रमाणे येईल.

  12. यिर्मयाह ३०:२४सुमारे इ.स.पू. ६०६

    याहवेहच्या अंतःकरणाचा उद्देश पूर्ण झाल्याशिवाय त्यांचा महाभयंकर क्रोध शांत होणार नाही. पुढे येणाऱ्या दिवसात तुला हे कळेल.

  13. यिर्मयाह ३१:१सुमारे इ.स.पू. ६०६

    याहवेह जाहीर करतात, “त्याकाळी मी इस्राएलमधील सर्व कुळांचा परमेश्वर असेन व ते माझे लोक असतील.”

  14. यिर्मयाह ३१:२सुमारे इ.स.पू. ६०६

    याहवेह जे म्हणतात ते असे: “जे तलवारीच्या प्रहारातून वाचले त्यांना रानात अनुकूलता सापडेल इस्राएलला विश्रांती देण्यासाठी मी स्वतः येईन.”

  15. यिर्मयाह ३१:३सुमारे इ.स.पू. ६०६

    कारण पूर्वी याहवेहने आम्हाला दर्शन दिले व म्हटले: “मी सार्वकालिक प्रीतीने तुमच्यावर प्रीती केली आहे; मी अविनाशी प्रेमदयेने तुम्हाला माझ्याकडे ओढून घेतले आहे.

  16. यिर्मयाह ३१:४सुमारे इ.स.पू. ६०६

    मी तुला पुन्हा उभारेन, आणि तू, इस्राएली कुमारिके, पुनर्वसित होशील. तू पुन्हा तुझे खंजीर घेशील आणि बाहेर जाऊन आनंदाने नृत्य करशील.

  17. यिर्मयाह ३१:५सुमारे इ.स.पू. ६०६

    शोमरोनच्या डोंगरावर तू पुन्हा आपले द्राक्षमळे लावशील; शेतकरी ते मळे लावतील व स्वतःची फळे खाण्याचा आनंद उपभोगतील.

  18. यिर्मयाह ३१:६सुमारे इ.स.पू. ६०६

    ‘चला, उठा, आपण सीयोनकडे जाऊ, आपले परमेश्वर याहवेहकडे, जाऊ या.’ ” पहारेकरी एफ्राईमच्या टेकड्यांवरून अशी आरोळी मारण्याचा दिवस येत आहे,

  19. यिर्मयाह ३१:७सुमारे इ.स.पू. ६०६

    याहवेह असे म्हणतात: “याकोबासाठी हर्षाने गाणी गा; सर्वश्रेष्ठ इस्राएली राष्ट्रासाठी गर्जना करा. तुमचे स्तुतिगान जाहीरपणे ऐकू यावे आणि म्हणा, ‘याहवेह, आपल्या लोकांचे, इस्राएलाच्या अवशेषाचे तारण करा’

  20. यिर्मयाह ३१:८सुमारे इ.स.पू. ६०६

    पाहा, मी त्यांना उत्तरेकडील देशातून आणेन आणि पृथ्वीच्या दिगंतापासून गोळा करेन. त्यांच्यात आंधळे व पांगळे, गर्भवती स्त्रिया, प्रसूती वेदना लागलेल्या माता असतील; फार मोठा समुदाय परत येईल.

  21. यिर्मयाह ३१:९सुमारे इ.स.पू. ६०६

    ते आनंदाश्रू ढाळतील. मी त्यांना परत आणतांना ते प्रार्थना करतील. मी त्यांना जलप्रवाहाच्या बाजूने चालवेन समतल भूमीवरून ते न अडखळता चालतील, कारण मी इस्राएलचा पिता आहे, आणि एफ्राईम माझा ज्येष्ठपुत्र आहे.

  22. यिर्मयाह ३१:१०सुमारे इ.स.पू. ६०६

    “अहो राष्ट्रांनो, याहवेहचे वचन ऐका, आणि दूरवरील सर्व सागरतीरांवर ते जाहीर करा: ‘ज्यांनी इस्राएली लोकांना विखरले, तेच त्यांना एकत्र करतील. मेंढपाळाप्रमाणे आपल्या कळपांची निगा राखतील.’

  23. यिर्मयाह ३१:११सुमारे इ.स.पू. ६०६

    याहवेह याकोबाची सुटका करतील आणि त्यांच्यापेक्षा बलाढ्य राष्ट्रांपासून त्यांना सोडवितील.

  24. यिर्मयाह ३१:१२सुमारे इ.स.पू. ६०६

    ते येतील आणि सीयोनाच्या टेकड्यांवर हर्षगीते गातील; याहवेहच्या विपुल पुरवठ्यासाठी— धान्य, नवा द्राक्षारस, आणि जैतुनाचे तेल, गुरातील व कळपातील पिल्लांसाठी आनंद करतील. भरपूर पाणी दिलेल्या बागेप्रमाणे ते होतील आणि त्यांची सर्व दुःखे नाहीशी होतील.

  25. यिर्मयाह ३१:१३सुमारे इ.स.पू. ६०६

    त्या समयी तरुण कुमारिका नृत्य करून हर्षावतील, तरुण व ज्येष्ठ लोकही त्यात सहभागी होतील. कारण मी त्यांच्या विलापाचे आनंदात रूपांतर करेन; मी त्यांचे सांत्वन करेन आणि दुःखाऐवजी त्यांना हर्ष प्रदान करेन.