circa 800–400 BC
The Hebrew Prophets
God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.
या कालखंडातील वचने
- यिर्मयाह ३१:१४सुमारे इ.स.पू. ६०६
मी मंदिरातील याजकांना विपुल पुरवठ्याने समाधानी करेन, आणि माझे लोक भरघोस साठ्याने तृप्त होतील.” असे याहवेह जाहीर करतात.
- यिर्मयाह ३१:१५सुमारे इ.स.पू. ६०६
याहवेह असे म्हणतात: “रामाह मधून आवाज ऐकू येत आहे, शोक आणि घोर आकांत, राहेल आपल्या लेकरांसाठी रडत आहे. ती सांत्वन पावण्यास नकार देते, कारण ते आता राहिले नाहीत.”
- यिर्मयाह ३१:१६सुमारे इ.स.पू. ६०६
परंतु याहवेह असे म्हणतात: “तुझा रुदनस्वर आणि तुझ्या डोळ्यातील अश्रू आता आवर, कारण तुझ्या कार्यास फलप्राप्ती होणार आहे,” याहवेह असे जाहीर करतात “ते शत्रूच्या देशातून परत येतील.
- यिर्मयाह ३१:१७सुमारे इ.स.पू. ६०६
तुझ्या वंशजासाठी आशा आहे,” याहवेह असे जाहीर करतात. तुझी मुले आपल्या देशात परत येतील.
- यिर्मयाह ३१:१८सुमारे इ.स.पू. ६०६
“मी एफ्राईमचे आक्रंदन निश्चितच ऐकले: ‘तुम्ही मला अनावर वासराला लावावी तशी शिस्त लावली आहे, आणि मी ही शिस्त ग्रहण केली आहे. मला पुन्हा माझ्या पूर्वस्थितीत आणा, म्हणजे मी पूर्ववत होईन, कारण तुम्ही याहवेह, माझे परमेश्वर आहात.
- यिर्मयाह ३१:१९सुमारे इ.स.पू. ६०६
मी भरकटल्यानंतर, मला पश्चात्ताप झाला; मला समज आल्यानंतर, मी दुःखातिशयाने ऊर बडवून घेतला. माझ्या तरुणपणाच्या दिवसात मी जे आचरण केले, त्यामुळे मी लज्जित व अपमानित झालो आहे.’
- यिर्मयाह ३१:२०सुमारे इ.स.पू. ६०६
हा एफ्राईम माझा लाडका पुत्र नाही का, जे माझे लेकरू, मला अत्यंत सुखदायक? जरी मी बरेचदा त्याच्याविरुद्ध बोललो, तरी मला आताही त्याची आठवण येते. म्हणून माझ्या मनाला त्याची ओढ लागली आहे; मला त्याची अत्यंत दया येते.” असे याहवेह जाहीर करतात.
- यिर्मयाह ३१:२१सुमारे इ.स.पू. ६०६
“जाताना वाटेवर खुणा कर; दिशादर्शक लाव. तू गेलीस तो महामार्ग ध्यानात ठेव, त्या मार्गावर लक्ष ठेव. हे इस्राएली कुमारी, परत ये, तू आपल्या नगरांमध्ये परत ये.
- यिर्मयाह ३१:२२सुमारे इ.स.पू. ६०६
अगे विश्वासघातकी कन्ये, तू कुठवर भटकत राहणार? याहवेह पृथ्वीवर नवीन गोष्ट घडविणार आहेत— स्त्री पुरुषाकडे परत येईल.”
- यिर्मयाह ३१:२३सुमारे इ.स.पू. ६०६
सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: “मी जेव्हा बंदिवासातून त्यांना परत आणेन, तेव्हा यहूदीयामधील व त्यांच्या नगरांमधील लोक असे म्हणतील: हे समृद्ध नगरी, ‘हे पवित्र डोंगरा, याहवेह तुला आशीर्वादित करो’
- यिर्मयाह ३१:२४सुमारे इ.स.पू. ६०६
मग यहूदीया नगरवासी—शेतकरी व कळप घेऊन फिरणारे मेंढपाळ सर्वच एकत्र नांदतील.
- यिर्मयाह ३१:२५सुमारे इ.स.पू. ६०६
मी थकलेल्यांना व मूर्छित झालेल्यांना ताजेतवाने व संतुष्ट करेन.”
- यिर्मयाह ३१:२६सुमारे इ.स.पू. ६०६
एवढ्यात मी जागा झालो व सभोवती पाहिले. माझी झोप अत्यंत सुखद होती.
- यिर्मयाह ३१:२७सुमारे इ.स.पू. ६०६
याहवेह जाहीर करतात, “असे दिवस येत आहेत जेव्हा लोकांच्या व गुरांच्या वंशजाचे मी इस्राएल व यहूदीयामध्ये रोपण करेन.
- यिर्मयाह ३१:२८सुमारे इ.स.पू. ६०६
जसे त्यांना उपटून टाकताना व विदीर्ण होतांना, जमीनदोस्त होतांना, नष्ट होतांना व विपत्ती येत असताना लक्षपूर्वक नजर ठेवून होतो, तर पुन्हा त्यांचे रोपण व उभारणेही लक्ष लावून बघेन,” असे याहवेह जाहीर करतात.
- यिर्मयाह ३१:२९सुमारे इ.स.पू. ६०६
“लोक त्या दिवसात पुन्हा म्हणणार नाहीत, ‘पालकांनी आंबट द्राक्षे खाल्ली, आणि मुलांचे दात आंबले.’
- यिर्मयाह ३१:३०सुमारे इ.स.पू. ६०६
कारण प्रत्येकजण स्वतःच्या पापांमुळे मरेल; जो कोणी आंबट द्राक्षे खाईल—त्याचेच दात आंबतील.
- यिर्मयाह ३१:३१सुमारे इ.स.पू. ६०६
“असे दिवस येतील जेव्हा, इस्राएलच्या लोकांशी व यहूदीयाच्या लोकांशी मी एक नवीन करार करेन,” याहवेह म्हणतात.
- यिर्मयाह ३१:३२सुमारे इ.स.पू. ६०६
“मी त्यांच्या पूर्वजांचा हात धरून त्यांना इजिप्त देशातून बाहेर आणले, तेव्हा मी त्यांच्याशी केलेल्या कराराप्रमाणे हा करार नसेल. मी जरी त्यांचा पती होतो, तरी त्यांनी माझा करार मोडला.” असे याहवेह जाहीर करतात.
- यिर्मयाह ३१:३३सुमारे इ.स.पू. ६०६
“परंतु मी इस्राएलाच्या लोकांबरोबर करार करेन तो असा” याहवेह जाहीर करतात, “त्या वेळेनंतर मी माझा नियम त्यांच्या मनात ठेवेन, आणि ते त्यांच्या हृदयावर लिहेन, मी त्यांचा परमेश्वर होईन, आणि ते माझे लोक होतील.
- यिर्मयाह ३१:३४सुमारे इ.स.पू. ६०६
कोणीही आपल्या शेजाऱ्याला बोध करणार नाही, किंवा ‘याहवेहला ओळखा’ असे कोणी कोणाला बोलणार नाही, कारण लहानापासून ते थोरापर्यंत सर्वजण मला ओळखतील,” असे याहवेह जाहीर करतात. “मी त्यांच्या दुष्कृत्यांची क्षमा करेन व यापुढे त्यांची पापे स्मरणार नाही.”
- यिर्मयाह ३१:३५सुमारे इ.स.पू. ६०६
याहवेह असे म्हणतात, दिवसा सूर्यप्रकाश द्यावा म्हणून ज्यांनी सूर्याला नियुक्त केले, व रात्री प्रकाश देण्यासाठी चंद्र व ताऱ्यांना आज्ञा दिली, गर्जना करणार्या लाटा उसळाव्यात म्हणून जे समुद्र ढवळतात; त्यांचे नाव सर्वसमर्थ याहवेह असे आहे:
- यिर्मयाह ३१:३६सुमारे इ.स.पू. ६०६
“जर हे नियम माझ्या नजरेपुढून नाहीसे झाले तरच माझ्यापुढे एक राष्ट्र म्हणून इस्राएलचे अस्तित्व समाप्त होईल.” याहवेह असे जाहीर करतात.
- यिर्मयाह ३१:३७सुमारे इ.स.पू. ६०६
याहवेह असे म्हणतात: “जर आकाशाचे मोजमाप करता आले असते व पृथ्वीच्या पायांचा थांग लावता आला असता, तर मी माझ्या इस्राएली लोकांच्या सर्व वंशजांना त्यांनी जे सर्व केले त्याबद्दल त्यांना नाकारले असते,” याहवेह जाहीर करतात.
- यिर्मयाह ३१:३८सुमारे इ.स.पू. ६०६
याहवेह जाहीर करतात, “असे दिवस येत आहेत, कोपर्यातील हनानेलच्या बुरुजापासून कोपर्याच्या वेशीपर्यंत या नगरीची पुनर्बांधणी होईल.