circa 800–400 BC
The Hebrew Prophets
God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.
या कालखंडातील वचने
- यिर्मयाह २९:२०सुमारे इ.स.पू. ५९९
म्हणून यरुशलेम येथून बाबिलोन येथे मी पाठविलेल्या सर्व यहूदी बंदिवानांनो, आता याहवेहचे वचन ऐका.
- यिर्मयाह २९:२१सुमारे इ.स.पू. ५९९
सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर कोलायाहचा पुत्र अहाब व मासेयाहचा पुत्र सिद्कीयाह या तुमच्या खोट्या संदेष्ट्याविषयी असे म्हणतात: “त्यांचा तुमच्यासमोर जाहीरपणे वध व्हावा म्हणून मी त्यांना बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरच्या हवाली करणार आहे.
- यिर्मयाह २९:२२सुमारे इ.स.पू. ५९९
ज्या लोकांना यहूदीयामधून खास्द्यांमध्ये बंदिवान म्हणून नेले, ते शाप देताना म्हणतील: ‘ज्याप्रमाणे बाबेलच्या राजाने सिद्कीयाह व अहाब यांना जिवंत जाळले, त्यांच्याप्रमाणेच याहवेह तुझे करो.’
- यिर्मयाह २९:२३सुमारे इ.स.पू. ५९९
कारण त्यांनी इस्राएलमध्ये एक अति घृणास्पद कृत्य केले आहे; त्यांनी आपल्या शेजार्यांच्या स्त्रियांशी व्यभिचार केला, आणि माझ्या नावाने खोटे संदेश दिले—जो अधिकार मी त्यांना दिला नव्हता. हे मला माहीत आहे, कारण त्यांचे प्रत्येक कृत्य मी पाहिले आहे,” असे याहवेह जाहीर करतात.
- यिर्मयाह २९:२४सुमारे इ.स.पू. ५९९
नेहेलामी शमायाह याला सांग,
- यिर्मयाह २९:२५सुमारे इ.स.पू. ५९९
“सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: तू स्वतःच्या नावाने मासेयाहचा पुत्र सफन्याह याजक याला, इतर सर्व याजकांना व यरुशलेममधील प्रत्येकाला पत्रे लिहिली आहेस. तू सफन्याहला असे म्हटले,
- यिर्मयाह २९:२६सुमारे इ.स.पू. ५९९
‘यहोयादाच्या जागेवर याजक म्हणून याहवेहने तुला नेमले आहे; म्हणून एखादा वेडा मनुष्य स्वतःला संदेष्टा म्हणवू लागला, तर त्याला खोड्यात घालून लोखंडी गळपट्टा घालण्याची जबाबदारी तुझ्यावर आहे.
- यिर्मयाह २९:२७सुमारे इ.स.पू. ५९९
मग तू या अनाथोथच्या यिर्मयाहला का फटकारले नाहीस, जो स्वतःला संदेष्टा म्हणवितो?
- यिर्मयाह २९:२८सुमारे इ.स.पू. ५९९
कारण त्याने आम्हाला येथे बाबेलमध्ये हा संदेश पाठविला आहे: आमचा बंदिवास दीर्घकाळचा आहे. आम्ही येथे पक्की खरे बांधून वसती करावी; मळा लावावा व त्यातील उत्पादन खावे.’ ”
- यिर्मयाह २९:२९सुमारे इ.स.पू. ५९९
याजक सफन्याह हे पत्र घेऊन यिर्मयाह संदेष्ट्याकडे गेला व त्याने त्याला वाचून दाखविले.
- यिर्मयाह २९:३०सुमारे इ.स.पू. ५९९
तेव्हा याहवेहचे यिर्मयाहला हे वचन मिळाले:
- यिर्मयाह २९:३१सुमारे इ.स.पू. ५९९
“खास्द्यांमध्ये बंदिवासात असलेल्या सर्वांना हा संदेश पाठव: ‘नेहेलामी शमायाहविषयी याहवेह असे म्हणतात: कारण त्याला मी पाठविले नसतानाही त्याने तुम्हाला संदेश दिला, आणि त्याच्या खोट्या वचनावर विश्वास ठेवण्यास तुम्हाला विवश केले,
- यिर्मयाह २९:३२सुमारे इ.स.पू. ५९९
याहवेह असे म्हणतात: मी नेहेलामी शमायाहला व त्याच्या वंशजांना निश्चितच शिक्षा करेन. त्याच्या लोकांपैकी कोणीही हयात राहणार नाही, माझ्या लोकांचे जे अभीष्ट मी करणार आहे, ते तो बघू शकणार नाही, असे याहवेह जाहीर करतात, कारण माझ्याविरुद्ध बंडखोरी करण्याचा त्याने संदेश दिला आहे.’ ”
- यिर्मयाह ३०:१सुमारे इ.स.पू. ६०६
याहवेहकडून यिर्मयाहला हे वचन प्राप्त झाले:
- यिर्मयाह ३०:२सुमारे इ.स.पू. ६०६
“इस्राएलचे परमेश्वर याहवेह असे म्हणतात: ‘मी तुला सांगितलेली सर्व वचने एका नोंदवहीत लिहून ठेव.
- यिर्मयाह ३०:३सुमारे इ.स.पू. ६०६
याहवेह जाहीर करतात, असे दिवस येत आहेत की जेव्हा मी इस्राएल आणि यहूदीयातील माझ्या लोकांना बंदिवासातून परत आणेन व त्यांच्या पूर्वजांना मी वतन म्हणून दिलेल्या भूमीवर पुनर्स्थापित करेन,’ असे याहवेह म्हणतात.”
- यिर्मयाह ३०:४सुमारे इ.स.पू. ६०६
इस्राएल व यहूदीया यांच्यासंबंधी याहवेह असे म्हणतात:
- यिर्मयाह ३०:५सुमारे इ.स.पू. ६०६
“याहवेह म्हणतात: “ ‘त्यांचा भयभीत आक्रोश ऐकू येत आहे— शांती नव्हे, तर दहशत.
- यिर्मयाह ३०:६सुमारे इ.स.पू. ६०६
विचारून पाहा: पुरुष मुले प्रसवू शकतात काय? मग प्रसूती वेदनांनी व्याकूळ झालेल्या स्त्रियांप्रमाणे आपल्या पोटावर हात ठेऊन मेल्यागत फिक्के पडलेल्या चेहऱ्याचे बलवान पुरुष मला का दिसत आहेत?
- यिर्मयाह ३०:७सुमारे इ.स.पू. ६०६
हाय हाय! तो दिवस किती भयंकर असेल! इतर कोणताही दिवस असा नसेल. याकोबासाठी तो संकटकाळ असेल. पण तो यातून वाचून बाहेर पडेल.
- यिर्मयाह ३०:८सुमारे इ.स.पू. ६०६
“कारण सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात, ‘त्या दिवशी,’ मी त्यांच्या मानेवरचे जू मोडून टाकेन, त्यांच्या बेड्या तोडेन, आणि यापुढे परकीय लोक त्यांना गुलाम करणार नाहीत;
- यिर्मयाह ३०:९सुमारे इ.स.पू. ६०६
याउलट, ते व दावीद, त्यांचा राजा, ज्याला मी त्यांच्यातून उभारेन, ते त्यांचे परमेश्वर याहवेहची सेवा करतील!
- यिर्मयाह ३०:१०सुमारे इ.स.पू. ६०६
“ ‘म्हणून भिऊ नको! याकोबा, माझ्या सेवका; हे इस्राएला, निराश होऊ नको,’ याहवेह असे जाहीर करतात. ‘मी तुला निश्चितच दूरच्या देशातून, व तुझ्या वंशजांना त्यांच्या बंदिवासातून वाचवेन. याकोबाला परत शांती व संरक्षण लाभेल आणि त्यांना कोणीही भयभीत करणार नाही.’
- यिर्मयाह ३०:११सुमारे इ.स.पू. ६०६
कारण याहवेह जाहीर करतात, ‘मी तुझ्याबरोबर आहे आणि तुझी मुक्तता करेन. जरी ज्या राष्ट्रात मी तुझी पांगापांग केली, त्या राष्ट्रांचा मी समूळ नायनाट केला, तरी मी तुझा पूर्णपणे नायनाट करणार नाही. मी तुला योग्य शासन करेन, पण ते मर्यादित; तुला शिक्षा केल्यावाचून सोडणार नाही.’
- यिर्मयाह ३०:१२सुमारे इ.स.पू. ६०६
“याहवेह असे म्हणतात: “ ‘तुझी जखम असाध्य आहे, तुझा घाव बरा होण्यापलिकडे आहे.