मुख्य मजकुरावर जा

circa 800–400 BC

The Hebrew Prophets

God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.

3,706 वचने · 14 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यिर्मयाह २७:९सुमारे इ.स.पू. ५९५

    तुमचे संदेष्टे, दैवप्रश्न करणारे, स्वप्नांचा अर्थ सांगणारे, मांत्रिक व जादूटोणा करणारे म्हणतील, ‘तुम्ही बाबेलच्या राजाची सेवा करणार नाही,’ पण त्यांचे ऐकू नका.

  2. यिर्मयाह २७:१०सुमारे इ.स.पू. ५९५

    कारण ते तुम्हाला खोटे संदेश देत आहेत. त्यांचे ऐकून तुम्ही केवळ तुमच्या देशातून दूर जाल; मी तुम्हाला तुमच्या देशातून हाकलून देईन आणि तुमचा नाश होईल.

  3. यिर्मयाह २७:११सुमारे इ.स.पू. ५९५

    परंतु बाबेलच्या राजाच्या गुलामीला शरण जाणार्‍या कोणत्याही राष्ट्राच्या लोकांना त्यांच्याच देशात राहण्याची मुभा असेल आणि त्यांना नेहमीप्रमाणे आपल्या शेतीची मशागत करता येईल, याहवेह असे म्हणतात.” ’ ”

  4. यिर्मयाह २७:१२सुमारे इ.स.पू. ५९५

    हा संदेश मी यहूदीयाचा राजा सिद्कीयाह यास सांगितला. मी म्हणालो, “बाबेलच्या राजाचे जू आपल्या मानेवर ठेव; त्याची व त्याच्या लोकांची सेवा कर, म्हणजे तुम्ही जगाल.

  5. यिर्मयाह २७:१३सुमारे इ.स.पू. ५९५

    जे राष्ट्र बाबेलच्या राजाला अधीन होणार नाही, त्यांना याहवेहने देऊ केलेल्या युद्ध, दुष्काळ व मरी यांनी तू आणि तुझे लोक का मरावे?

  6. यिर्मयाह २७:१४सुमारे इ.स.पू. ५९५

    ‘तुम्ही बाबेलच्या राजाची सेवा करणार नाही,’ असे सांगणार्‍या संदेष्ट्यांचे ऐकू नका, कारण ते तुम्हाला खोटे संदेश देत आहेत.

  7. यिर्मयाह २७:१५सुमारे इ.स.पू. ५९५

    याहवेह म्हणतात, ‘मी त्यांना पाठविलेले नाही, ते माझ्या नावाने खोटी भविष्यवाणी करतात. म्हणून मी तुमचा आणि या खोट्या संदेष्ट्यांचा नाश करण्यासाठी या देशातून तुम्हाला हाकलून देईन.’ ”

  8. यिर्मयाह २७:१६सुमारे इ.स.पू. ५९५

    मी याजकांशी व सर्व लोकांशी बोललो आणि त्यांना सांगितले, “याहवेह म्हणतात: ‘मंदिरातून नेलेली सुवर्णपात्रे लवकरच बाबेलमधून परत आणली जातील,’ असे सांगणार्‍या तुमच्या संदेष्ट्यांचे मुळीच ऐकू नका. ते तुम्हाला खोटे भविष्य सांगत आहेत.

  9. यिर्मयाह २७:१७सुमारे इ.स.पू. ५९५

    त्यांचे ऐकू नका. बाबेलच्या राजाच्या अधीन व्हा, तर तुम्ही जिवंत राहाल. हे नगर उद्ध्वस्त का व्हावे?

  10. यिर्मयाह २७:१८सुमारे इ.स.पू. ५९५

    जर ते संदेष्टे असतील व त्यांच्याकडे याहवेहचे वचन असेल तर, याहवेहच्या मंदिरातील सुवर्णपात्रे मंदिरात व यहूदीयाच्या राजाच्या महालात आणि यरुशलेममधील महालांमध्येच राहवी, ती बाबेलला नेली जाऊ नयेत, अशी त्यांनी सर्वसमर्थ याहवेहस विनंती करावी.

  11. यिर्मयाह २७:१९सुमारे इ.स.पू. ५९५

    कारण स्तंभ, कास्याचे गंगाळ, धातूच्या बैठकी व या नगरात उरलेल्या इतर वस्तूंच्या बाबतीत सर्वसमर्थ याहवेह म्हणतात,

  12. यिर्मयाह २७:२०सुमारे इ.स.पू. ५९५

    बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याने यहूदीयाचा राजा, यहोयाकीमचा पुत्र यकोन्याह, याच्यासह यहूदीया व यरुशलेम येथील सर्व महत्त्वाच्या व्यक्तींना बाबिलोन येथे कैद करून नेले,

  13. यिर्मयाह २७:२१सुमारे इ.स.पू. ५९५

    मंदिरातील उरलेली पात्रे व यहूदीया आणि यरुशलेमच्या राजांच्या महालातील उरलेल्या मौल्यवान वस्तू याविषयी सर्वसमर्थ याहवेह इस्राएलाचे परमेश्वर असे म्हणतात:

  14. यिर्मयाह २७:२२सुमारे इ.स.पू. ५९५

    ‘होय, त्या आता बाबेलला नेण्यात येतील आणि मी त्यांची भेट घेईपर्यंत त्या तिथेच राहतील,’ याहवेह घोषित करतात. ‘नंतर पुढे मी हे सर्व यरुशलेमला परत आणेन व पुनर्स्थापित करेन.’ ”

  15. यिर्मयाह २८:१सुमारे इ.स.पू. ५९५

    त्याच वर्षी, म्हणजे यहूदीयाचा राजा सिद्कीयाह याच्या कारकिर्दीच्या प्रारंभी म्हणजे चौथ्या वर्षातील पाचव्या महिन्यात, गिबोन येथील अज्जूरचा पुत्र हनन्याह नावाचा जो संदेष्टा होता, तो याजक व सर्व लोकांच्या समक्ष मला उद्देशून याहवेहच्या भवनात जाहीरपणे म्हणाला:

  16. यिर्मयाह २८:२सुमारे इ.स.पू. ५९५

    “सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर जाहीर करतात: ‘तुमच्या मानेवरील बाबेलच्या राजाचे जू मी काढून टाकेन.

  17. यिर्मयाह २८:३सुमारे इ.स.पू. ५९५

    बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने लुटून नेलेली याहवेहच्या मंदिरातील सर्व पात्रे मी दोन वर्षात परत आणेन.

  18. यिर्मयाह २८:४सुमारे इ.स.पू. ५९५

    आणि यहोयाकीमचा पुत्र, यहूदीयाचा राजा यकोन्याह व खास्द्यांच्या देशात बंदिवासात पाठविलेले सर्व बंदी यांनाही मी परत आणेन. बाबेलच्या राजाचे जोखड मी तोडून टाकेन,’ असे याहवेह जाहीर करतात.”

  19. यिर्मयाह २८:५सुमारे इ.स.पू. ५९५

    यावर याहवेहच्या मंदिरात उभे असलेले सर्व लोक आणि याजकांच्या समक्ष यिर्मयाह संदेष्टा हनन्याहला म्हणाला,

  20. यिर्मयाह २८:६सुमारे इ.स.पू. ५९५

    यिर्मयाह संदेष्टा म्हणाला, “आमेन! तुझे संदेश याहवेह खरे करोत! तू दिलेल्या संदेशाच्या वचनानुसार याहवेहच्या मंदिरातील पात्र व सर्व बंदिवान बाबेलमधून परत येवोत.

  21. यिर्मयाह २८:७सुमारे इ.स.पू. ५९५

    परंतु तरी देखील, आता या सर्व लोकांसमक्ष व तुझ्यासमक्ष मी जे सांगतो ते तू ऐक:

  22. यिर्मयाह २८:८सुमारे इ.स.पू. ५९५

    तुझ्या आणि माझ्या आधी जे संदेष्टे होऊन गेले, ज्यांनी युद्ध, विनाश व मरी याविषयी अनेक राष्ट्रांना व शक्तिशाली राज्यांना संदेश दिला.

  23. यिर्मयाह २८:९सुमारे इ.स.पू. ५९५

    परंतु जो संदेष्टा शांतीचा संदेश देत असे व त्याचे भविष्य खरे ठरताच, तो खरोखर याहवेहने पाठविला आहे, असे समजले जात असे.”

  24. यिर्मयाह २८:१०सुमारे इ.स.पू. ५९५

    यावर संदेष्टा हनन्याह याने यिर्मयाहच्या मानेवरील जू घेतले व ते मोडले;

  25. यिर्मयाह २८:११सुमारे इ.स.पू. ५९५

    आणि तिथे जमलेल्या समुदायाला उद्देशून हनन्याह म्हणाला, “याहवेह असे म्हणतात: याचप्रकारे बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याने सर्व राष्ट्रांच्या मानेवर ठेवलेले जोखड मी दोन वर्षात तोडून टाकेन.” हे ऐकताच यिर्मयाह संदेष्टा तिथून चालता झाला.