circa 800–400 BC
The Hebrew Prophets
God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.
या कालखंडातील वचने
- यिर्मयाह २५:२१सुमारे इ.स.पू. ६०६
एदोम, मोआब व अम्मोन;
- यिर्मयाह २५:२२सुमारे इ.स.पू. ६०६
तसेच सोर व सीदोन येथील सर्व राजे; समुद्रापलीकडच्या तटवर्तीप्रदेशातील सर्व राजे;
- यिर्मयाह २५:२३सुमारे इ.स.पू. ६०६
ददान, तेमा व बूज, तसेच जे दूरच्या देशात असलेले;
- यिर्मयाह २५:२४सुमारे इ.स.पू. ६०६
आणि अरबस्थानातील सर्व राजे व वाळवंटात राहणारे विदेशी लोकांचे राजे;
- यिर्मयाह २५:२५सुमारे इ.स.पू. ६०६
जिम्री, एलाम व मेदिया येथील सर्व राजे;
- यिर्मयाह २५:२६सुमारे इ.स.पू. ६०६
तसेच एकामागून एक उत्तरेकडील सर्व देशातील दूर व जवळचे सर्व राजे; जगातील सर्व राजे; सरतेशेवटी शेशाकचा राजा या प्याल्यातून पिईल.
- यिर्मयाह २५:२७सुमारे इ.स.पू. ६०६
“त्यांना सांग, ‘सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर म्हणतात: माझ्या क्रोधाने भरलेल्या या प्याल्यातून तुम्ही प्या, धुंद होईपर्यंत प्या, आणि मग ओकारी करा, व पुन्हा कधीही न उठण्याकरिता पडा, कारण मी तुमच्यावर तलवार पाठवित आहे.’
- यिर्मयाह २५:२८सुमारे इ.स.पू. ६०६
हा प्याला पिण्याचे त्यांनी नाकारले, तर त्यांना सांग, ‘सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: हा प्याला तुम्हाला प्यावाच लागेल!
- यिर्मयाह २५:२९सुमारे इ.स.पू. ६०६
माझे नाव धारण करणाऱ्या नगरावर मी विपत्ती आणत आहे, आणि मग तुम्ही शिक्षेवाचून राहाल काय? तुम्हाला शिक्षा चुकवता येणार नाही, कारण पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांविरुद्ध मी तलवार चालविणार आहे, असे सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात.’
- यिर्मयाह २५:३०सुमारे इ.स.पू. ६०६
“म्हणून आता त्यांच्याविरुद्ध हा सर्व संदेश दे व त्यांना सांग: “ ‘याहवेह त्यांच्या उच्च स्थानातून गर्जना करतील; त्यांच्या पवित्रस्थानातून ते मेघनाद करतील आणि स्वतःच्या भूमीविरुद्ध गर्जना करतील पृथ्वीवरील सर्व रहिवाशांविरुद्ध. द्राक्षे तुडविणाऱ्यासारखे ते आरोळी मारतील,
- यिर्मयाह २५:३१सुमारे इ.स.पू. ६०६
हा क्षोभ पृथ्वीच्या दिगंतापर्यंत दुमदुमेल, कारण सर्व राष्ट्रांविरुद्ध याहवेह आरोप करतील; ते संपूर्ण मानवजातीचा न्याय करतील सर्व दुष्ट लोकांना तलवारीच्या स्वाधीन करतील.’ ” याहवेहची ही घोषणा आहे.
- यिर्मयाह २५:३२सुमारे इ.स.पू. ६०६
सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात, “पाहा! विपत्ती पसरत आहे एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रात; पृथ्वीच्या टोकापासून एक भयंकर वादळ उठत आहे.”
- यिर्मयाह २५:३३सुमारे इ.स.पू. ६०६
त्या दिवशी याहवेहने वधलेल्या लोकांनी पृथ्वी व्यापून जाईल—त्यांच्यासाठी कोणीही विलाप करणार नाही, अथवा मूठमाती देण्यासाठी त्यांची प्रेते कोणी गोळा करणार नाही. ते भूमीवर शेणाप्रमाणे पडून राहतील.
- यिर्मयाह २५:३४सुमारे इ.स.पू. ६०६
अहो मेंढपाळांनो, दुःखाने रडा आणि विलाप करा; मानवजातीच्या कळपांच्या पुढार्यांनो, धुळीत लोळा. कारण तुमचा वध होण्याची वेळ आता आली आहे; मातीच्या उत्तम भांड्यासारखे तुम्ही सर्व कोसळून पडाल.
- यिर्मयाह २५:३५सुमारे इ.स.पू. ६०६
मेंढपाळांना पळून जाण्यास कुठेही जागा मिळणार नाही, पुढाऱ्यांना सुटकेसाठी मार्ग आढळणार नाही.
- यिर्मयाह २५:३६सुमारे इ.स.पू. ६०६
मेंढपाळ मारीत असलेल्या आरोळ्या ऐका, कळपांच्या पुढाऱ्यांचा विलाप ऐका! याहवेह त्यांची कुरणे उद्ध्वस्त करीत आहेत.
- यिर्मयाह २५:३७सुमारे इ.स.पू. ६०६
आता शांत कुरणे उजाड होतील याहवेहच्या भयानक क्रोधाला बळी पडतील.
- यिर्मयाह २५:३८सुमारे इ.स.पू. ६०६
सिंह आपली गुहा सोडतो तसे ते आपले विश्रांतिस्थान सोडतील, आणि जुलूम करणाऱ्यांच्या तलवारीमुळे आणि परमेश्वराच्या तीव्र क्रोधामुळे त्यांची भूमी उद्ध्वस्त होईल.
- यिर्मयाह २६:१सुमारे इ.स.पू. ६१०
यहूदीयाचा राजा, योशीयाहचा पुत्र यहोयाकीम याच्या कारकिर्दीच्या प्रारंभी यिर्मयाहला याहवेहकडून हा संदेश मिळाला:
- यिर्मयाह २६:२सुमारे इ.स.पू. ६१०
याहवेह असे म्हणतात, “यहूदीया प्रांताच्या विविध नगरातून लोक उपासना करावयास आले आहेत, तेव्हा तू याहवेहच्या मंदिरासमोर उभा राहा आणि यहूदीया नगरातील सर्व लोकांना जे याहवेहच्या मंदिरात उपासना करण्यास आले त्यांच्याशी बोल. मी तुला सांगितलेले सर्व त्यांना सांग; त्यातील एकही शब्द कमी करू नकोस.
- यिर्मयाह २६:३सुमारे इ.स.पू. ६१०
कारण कदाचित ते ऐकतील आणि आपल्या कुमार्गापासून मागे वळतील; मग त्यांच्या कुकर्माबद्दल मी त्यांना करणार होतो तो विनाश आवरून धरेन.
- यिर्मयाह २६:४सुमारे इ.स.पू. ६१०
त्यांना सांग, ‘याहवेह म्हणतात: जर तुम्ही माझे ऐकणार नाही व मी तुमच्यापुढे ठेवलेले नियम तुम्ही पाळणार नाही,
- यिर्मयाह २६:५सुमारे इ.स.पू. ६१०
आणि मी पाठविलेल्या माझ्या सेवक संदेष्ट्यांचे संदेश तुम्ही ऐकणार नाही, मी माझे संदेष्टे तुम्हाला सावध करण्याकरिता पुनः पुनः पाठविले (पण तुम्ही त्यांच्याकडे लक्ष दिले नाही),
- यिर्मयाह २६:६सुमारे इ.स.पू. ६१०
तर या मंदिरास मी शिलोह आणि या नगरासारखे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांमध्ये शाप असे करेन.’ ”
- यिर्मयाह २६:७सुमारे इ.स.पू. ६१०
याजक, संदेष्टे व सर्व लोकांनी यिर्मयाहने याहवेहची आज्ञापिलेली वचने सांगितलेले ऐकले.