circa 800–400 BC
The Hebrew Prophets
God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.
या कालखंडातील वचने
- यिर्मयाह २३:२१सुमारे इ.स.पू. ६०५
या संदेष्ट्यांना मी पाठविलेले नाही, तरीसुद्धा ते त्यांचा संदेश घेऊन धाव घेतात; मी त्यांच्याशी बोललो नाही, तरी ते संदेश देतात.
- यिर्मयाह २३:२२सुमारे इ.स.पू. ६०५
जर ते माझ्या समक्षतेत उभे राहिले असते, तर त्यांनी माझ्या लोकांना माझे वचन जाहीर केले असते आणि ते दुष्ट मार्गापासून परावृत्त झाले असते व त्यांच्या दुष्टकर्मापासून दूर झाले असते.
- यिर्मयाह २३:२३सुमारे इ.स.पू. ६०५
“मी केवळ जवळ असणाराच परमेश्वर आहे काय, दुरून बघणारा परमेश्वर नाही काय?” असे याहवेह जाहीर करतात.
- यिर्मयाह २३:२४सुमारे इ.स.पू. ६०५
“माझ्यापासून कोणाला गुप्तस्थळी लपून राहता येईल काय? जेणेकरून मी त्यांना बघू शकणार नाही.” असे याहवेह जाहीर करतात. मी स्वर्ग आणि पृथ्वी व्यापून टाकणारा नाही काय? असे याहवेह जाहीर करतात.
- यिर्मयाह २३:२५सुमारे इ.स.पू. ६०५
“माझ्या नावाने खोटे संदेश देणारे संदेष्टे काय म्हणतात ते मी ऐकले आहे. ते म्हणतात, ‘मला स्वप्न पडले! मला स्वप्न पडले!’
- यिर्मयाह २३:२६सुमारे इ.स.पू. ६०५
हा प्रकार या खोट्या संदेष्ट्यांच्या अंतःकरणात किती काळ चालणार, जे त्यांच्या मनाच्या भ्रांतीने भविष्यवाणी करतात?
- यिर्मयाह २३:२७सुमारे इ.स.पू. ६०५
त्यांचे पूर्वज बआल दैवताच्या उपासनेमुळे मला विसरले, तसे आपली खोटी स्वप्ने सांगितल्यास माझे लोक मला विसरून जातील असा ते विचार करतात.
- यिर्मयाह २३:२८सुमारे इ.स.पू. ६०५
ज्या खोट्या संदेष्ट्यांना स्वप्ने पडतात, त्यांना ती स्वप्ने सांगू दे, परंतु ज्याला माझे वचन प्राप्त झाले आहे, त्याने ते विश्वासूपणे सांगावे. कोंड्याचा गव्हाशी काय संबंध आहे?” असे याहवेह जाहीर करतात.
- यिर्मयाह २३:२९सुमारे इ.स.पू. ६०५
याहवेह जाहीर करतात, “माझे वचन अग्नीसारखे ज्वलंत नाही काय? खडक फोडून त्यांचे तुकडे तुकडे करणार्या हातोडीसारखे ते नाही काय?
- यिर्मयाह २३:३०सुमारे इ.स.पू. ६०५
“जे आपले संदेश एकमेकांपासून माझ्यापासून चोरतात, अशा संदेष्ट्यांच्या मी विरुद्ध उभा आहे,” याहवेह जाहीर करतात.
- यिर्मयाह २३:३१सुमारे इ.स.पू. ६०५
होय, याहवेह जाहीर करतात, हा संदेश याहवेहकडून आहे, असे जाहीर करून स्वतःच्या जिभा हेलकावितात, अशा संदेष्ट्यांच्या मी विरुद्ध उभा आहे.
- यिर्मयाह २३:३२सुमारे इ.स.पू. ६०५
जे खोटी स्वप्ने सांगून भविष्यवाणी करतात, अशा संदेष्ट्यांच्या मी निश्चितच विरुद्ध उभा आहे, असे याहवेह जाहीर करतात. ते त्यांना वाचाळपणाने लबाडपणे सांगतात आणि माझ्या लोकांना पापाकडे नेतात. याहवेह म्हणतात, “मी त्यांना पाठविले नाही किंवा त्यांना निवडले नाही. या लोकांच्या भल्यासाठी यांचा काहीही उपयोग नाही,” असे याहवेह जाहीर करतात.
- यिर्मयाह २३:३३सुमारे इ.स.पू. ६०५
“या लोकांपैकी, या संदेष्ट्यांपैकी, किंवा याजकांपैकी कोणी तुला विचारेल, ‘अरे यिर्मयाह, आज याहवेहकडून काय संदेश आहे?’ तेव्हा तू त्यांना असे उत्तर द्यावेस, ‘कसला संदेश? मी तुम्हाला दूर लोटून टाकणार आहे, असे याहवेह जाहीर करतात.’
- यिर्मयाह २३:३४सुमारे इ.स.पू. ६०५
आणि ‘हा याहवेहकडून आलेला संदेश आहे,’ असे हक्काने सांगणारे संदेष्टे आणि याजक वा इतर कोणीही लोक या सर्वांना आणि त्यांच्या कुटुंबांना मी शासन करेन.
- यिर्मयाह २३:३५सुमारे इ.स.पू. ६०५
तुम्ही व इतर इस्राएली एकमेकांना विचारीत असता, ‘याहवेहने काय उत्तर दिले? किंवा याहवेहने काय सांगितले?’
- यिर्मयाह २३:३६सुमारे इ.स.पू. ६०५
परंतु ‘परमेश्वराचा संदेश’ हा शब्दप्रयोग तुम्ही पुन्हा करू नये, कारण तुम्हा प्रत्येकाचे वचन तुमचा व्यक्तिगत संदेश होतो. म्हणून तुम्ही जिवंत परमेश्वर, सर्वसमर्थ याहवेह, आपले परमेश्वर यांच्या वचनाचा विपर्यास करता.
- यिर्मयाह २३:३७सुमारे इ.स.पू. ६०५
तुम्ही संदेष्ट्याला सतत विचारता, ‘याहवेहने तुला काय उत्तर दिले? किंवा याहवेहने काय सांगितले?’
- यिर्मयाह २३:३८सुमारे इ.स.पू. ६०५
‘हा याहवेहकडून आलेला संदेश आहे,’ असे हक्काने तुम्ही सांगता, याहवेह असे म्हणतात: ‘हा याहवेहकडून आलेला संदेश आहे,’ मी तुम्हाला हे वापरू नये अशी ताकीद दिल्यानंतरही हे शब्द तुम्ही वापरता.
- यिर्मयाह २३:३९सुमारे इ.स.पू. ६०५
म्हणून मी निश्चितच तुम्हाला विसरेन आणि तुम्हाला व तुमच्या पूर्वजांना दिलेल्या या शहराला माझ्या समक्षतेतून घालवून देईन.
- यिर्मयाह २३:४०सुमारे इ.स.पू. ६०५
मी तुमची कायमची अप्रतिष्ठा—तुम्हाला कायमचे लज्जास्पद करेन, जे कधीही विसरल्या जाणार नाही.”
- यिर्मयाह २४:१सुमारे इ.स.पू. ५९८
बाबिलोनचा राजा नबुखद्नेस्सर याने यहूदीयाचा राजा, यहोयाकीम याचा पुत्र, यकोन्याह, याच्याबरोबरच यहूदीयाचे अधिपती, निष्णात सुतार व लोहार असे कारागीर यांना यरुशलेमहून बाबिलोन येथे बंदिवासात नेले. या घटनेनंतर याहवेहने यरुशलेम येथील मंदिरासमोर अंजीर भरून ठेवलेल्या दोन टोपल्या मला दाखविल्या.
- यिर्मयाह २४:२सुमारे इ.स.पू. ५९८
एका टोपलीमध्ये उत्तम, आधी पिकलेले अंजीर होते, परंतु दुसर्या टोपलीतले अंजीर मात्र खराब झालेले होते, इतके खराब की ते खाण्यास योग्य नव्हते.
- यिर्मयाह २४:३सुमारे इ.स.पू. ५९८
तेव्हा याहवेहने मला विचारले, “यिर्मयाह, तुला काय दिसते?” मी उत्तर दिले. “अंजीर, काही जे चांगले आहेत ते अत्युत्तम आणि काही खराब, ते इतके खराब की खाण्यास अयोग्य.”
- यिर्मयाह २४:४सुमारे इ.स.पू. ५९८
तेव्हा याहवेहचे वचन माझ्याकडे आले:
- यिर्मयाह २४:५सुमारे इ.स.पू. ५९८
“याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: ‘हे उत्तम अंजीर यहूदीयातून बंदिवासात पाठवलेल्यांचे प्रतीक आहे, ज्यांना मी या ठिकाणातून खास्द्यांच्या देशामध्ये रवाना केले आहे.