circa 800–400 BC
The Hebrew Prophets
God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.
या कालखंडातील वचने
- यिर्मयाह २२:२६सुमारे इ.स.पू. ५९८
तू व तुझी माता, यांना मी अशा देशाबाहेर भिरकावून टाकेन, जिथे तुमचा जन्म झाला नव्हता आणि त्या देशात तुम्हाला मरण येईल.
- यिर्मयाह २२:२७सुमारे इ.स.पू. ५९८
ज्या देशात परत येण्याची तू उत्कट इच्छा करशील, त्या देशात तू कधीच परतणार नाहीस.
- यिर्मयाह २२:२८सुमारे इ.स.पू. ५९८
हा मनुष्य, कोन्याह, फुटक्या भांड्यासारखा कोणालाही नको असलेली वस्तू नाही का? तो व त्याच्या मुलांना त्यांना माहीत नसलेल्या देशात बंदिवान करून भिरकावून का टाकले गेले.
- यिर्मयाह २२:२९सुमारे इ.स.पू. ५९८
अगे, हे भूमी, हे भूमी, हे भूमी तू याहवेहचे वचन ऐक!
- यिर्मयाह २२:३०सुमारे इ.स.पू. ५९८
याहवेह असे म्हणतात: “कान्याह हा मनुष्य जणू अपत्यहीन आहे अशी नोंद करा, कारण त्याच्या जीवनात तो कधीही समृद्ध होणार नाही, त्याच्या मुलांपैकी कोणीही समृद्ध होणार नाही, त्याचा कोणताही वारस दावीदाच्या राजासनावर बसणार नाही, किंवा यहूदीया प्रांतावर राज्य करणार नाही.”
“धिक्कार असो त्या मेंढपाळांवर जे माझ्या कुरणातील मेंढरांचा नाश करतात व त्यांची पांगापांग करतात!” असे याहवेह जाहीर करतात.
म्हणून याहवेह, इस्राएलचे परमेश्वर मेंढपाळांना जे माझ्या लोकांची राखण करतात त्यांना असे म्हणतात: “कारण तुम्ही माझ्या कळपाची पांगापांग केली व त्यांना हुसकून लावले आणि त्यांची काळजी घेतली नाही, आता तुम्ही त्यांच्याशी केलेल्या दुष्टपणाबद्दल मी तुमच्यावर शिक्षांचा वर्षाव करेन.” असे याहवेह जाहीर करतात.
“जिथे माझ्या कळपाला मी पाठविले आहे, तिथून मी माझ्या कळपाच्या अवशेषाला त्या सर्व देशातून एकत्र करून पुन्हा त्यांच्या मेंढवाड्यात आणेन आणि मग ती मेंढरे फलद्रूप होतील व त्यांची संख्यावाढ होईल.
त्यांची काळजी घेण्यासाठी मी असे मेंढपाळ नेमीन, जे त्यांचे संगोपन करतील, व त्यांना पुन्हा भीती आणि दहशत वाटण्याचे कारण राहणार नाही, तसेच त्यातील कोणी हरविणारही नाही,” असे याहवेह जाहीर करतात.
याहवेह म्हणतात, “असे दिवस येत आहेत की, त्या समयी मी दावीदातून एक नीतिमान शाखा पुन्हा उगवेन, तो राजा सर्व देशात सुज्ञतेने, खरेपणाने आणि न्यायाने राज्य करेल.
तेव्हा यहूदीयाचे रक्षण होईल आणि इस्राएल सुरक्षिततेने जगेल. याहवेह आमचे नीतिमान तारणकर्ता या नावाने त्यांना संबोधित करण्यात येईल.
“असे दिवस येत आहेत की,” याहवेह म्हणतात, “शपथ घेताना इस्राएलचे लोक, ‘ज्या जिवंत याहवेहने इस्राएली लोकांना इजिप्त देशातून बाहेर आणले, त्यांच्या जीविताची शपथ’ असे न म्हणता,
‘ज्या जिवंत याहवेहने इस्राएली लोकांच्या वंशजांना उत्तरेकडील भूमीतून आणि ज्या वेगवेगळ्या देशात पांगविले होते, त्या देशातून परत आणले आहे. त्या जिवंत परमेश्वराची शपथ’ असे म्हणतील. मग ते स्वतःच्या भूमीवर वस्ती करतील.”
- यिर्मयाह २३:९सुमारे इ.स.पू. ६०५
संदेष्ट्याविषयी: माझे अंतःकरण विदीर्ण झाले आहे; माझी सर्व हाडे थरथर कापत आहेत. मद्यप्यासारखा माझा झोक जात आहे, एखाद्या बलवान पुरुषावर मद्याने मात केली आहे, कारण याहवेह व त्यांचे पवित्र शब्द.
- यिर्मयाह २३:१०सुमारे इ.स.पू. ६०५
सर्व देश व्यभिचाऱ्यांनी व्यापून टाकला आहे; कारण शाप त्यांच्यावर येऊन भूमी ओसाड झाली आहे. अरण्यातील हिरवीगार कुरणे वाळून गेली आहेत, कारण संदेष्टे दुष्कर्मे करतात आणि त्यांचे सामर्थ्य अयोग्य रीतीने वापरतात.
- यिर्मयाह २३:११सुमारे इ.स.पू. ६०५
“याजक व संदेष्टे हे दोघेही देवहीन आहेत; माझ्या मंदिरातही मी त्यांची तिरस्करणीय कृत्ये पाहिली आहेत,” असे याहवेह म्हणतात.
- यिर्मयाह २३:१२सुमारे इ.स.पू. ६०५
“म्हणूनच त्यांचे मार्ग निसरडे होतील; त्यांना अंधारात हद्दपार करण्यात येईल आणि तिथे ते पडतील. ज्या वर्षी त्यांना शिक्षा देईन मी त्यांच्यावर अरिष्टे आणेन.” असे याहवेह म्हणतात.
- यिर्मयाह २३:१३सुमारे इ.स.पू. ६०५
“शोमरोनच्या संदेष्ट्यांमध्ये मी ही तिरस्करणीय गोष्ट बघितली: त्यांनी बआल दैवताच्या नावाने संदेश देऊन माझ्या इस्राएली लोकांना मार्गभ्रष्ट केले.
- यिर्मयाह २३:१४सुमारे इ.स.पू. ६०५
आणि यरुशलेममधील संदेष्ट्यात मी काही भयानक गोष्टी बघितल्या: ते व्यभिचार करतात आणि लबाडीत जीवन जगतात. ते दुष्कर्म्याचे बाहू मजबूत करतात, जेणेकरून दुष्टतेपासून कोणीही परावृत्त होत नाही. ते सर्व मला सदोमातील लोकांसारखे वाटतात; यरुशलेम येथील लोक गमोरातील लोकांसारखे वाटतात.”
- यिर्मयाह २३:१५सुमारे इ.स.पू. ६०५
म्हणून सर्वसमर्थ याहवेह संदेष्ट्यांबद्धल असे म्हणतात: “मी त्यांना खावयास कडू दवणा देईन व प्यावयास विषारी पाणी देईन, कारण यरुशलेमच्या संदेष्ट्यांमुळेच देवहीनता देश व्यापून टाकीत आहे.”
- यिर्मयाह २३:१६सुमारे इ.स.पू. ६०५
सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “हे संदेष्टे जे संदेश तुम्हाला सांगतात ते ऐकू नका; ते तुम्हाला खोट्या आशेने भरून टाकतात. ते त्यांच्या मनाचेच दृष्टान्त सांगतात, त्यांचे शब्द याहवेहच्या मुखातील नाहीत!
- यिर्मयाह २३:१७सुमारे इ.स.पू. ६०५
माझा तिरस्कार करणार्या बंडखोरांना ते म्हणतात, ‘याहवेह म्हणतात: तुम्हाला शांतता लाभेल’ आणि जे स्वतःच्या मनाच्या हट्टीपणाने चालतात त्यांना ते म्हणतात, ‘तुमच्यावर कोणतेही संकट येणार नाही.’
- यिर्मयाह २३:१८सुमारे इ.स.पू. ६०५
परंतु त्यांचे वचन काय म्हणते हे बघण्यासाठी वा ऐकण्यासाठी, त्यांच्यापैकी कोण याहवेहच्या न्यायसभेत राहिला आहे, कोणी त्यांच्या वचनाकडे कान दिला आहे आणि ते ऐकले आहे?
- यिर्मयाह २३:१९सुमारे इ.स.पू. ६०५
पाहा, याहवेहचे भयावह वादळ पाहा. त्याचा प्रकोपात स्फोट होईल, दुष्टांच्या मस्तकावर ते एका वावटळीप्रमाणे येईल.
- यिर्मयाह २३:२०सुमारे इ.स.पू. ६०५
याहवेहच्या अंतःकरणाचा उद्देश पूर्ण झाल्याशिवाय त्यांचा महाभयंकर क्रोध शांत होणार नाही. पुढे येणाऱ्या दिवसात तुला ते अगदी स्पष्टपणे कळेल.