circa 800–400 BC
The Hebrew Prophets
God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.
या कालखंडातील वचने
- यिर्मयाह २०:८सुमारे इ.स.पू. ६०७
जेव्हा मी बोलू लागतो, मी आक्रोश करतो हिंसाचार व विनाश हेच जाहीर करतो. कारण याहवेहच्या वचनामुळे माझ्या वाट्याला दिवसभर निंदा व अप्रतिष्ठाच आली आहे.
- यिर्मयाह २०:९सुमारे इ.स.पू. ६०७
परंतु जर मी म्हटले, “मी त्यांचे शब्द उच्चारणार नाही किंवा त्यांच्या नावाने संदेश देणार नाही,” तर त्यांचे वचन माझ्या अंतःकरणात अग्नीप्रमाणे पेटते, व तो अग्नी माझ्या हाडात बंदिस्त राहतो. तो आतील आत इतःपर दाबून ठेवणे मला असह्य होते. निश्चितच, मी ते करू शकत नाही.
- यिर्मयाह २०:१०सुमारे इ.स.पू. ६०७
मी कित्येकांना कुजबुजतांना ऐकले आहे, “सर्व बाजूंनी दहशत! त्याला दोषी ठरवा! चला, त्याला दोषी ठरवू या!” माझे सर्व मित्रगण माझ्या हातून एखादी चूक होण्याची वाट पाहत आहेत. ते म्हणतात, “कदाचित त्याची फसवणूक होईल; मग आपण त्याच्यावर वर्चस्व करू आणि आपला सूड उगवू.”
- यिर्मयाह २०:११सुमारे इ.स.पू. ६०७
परंतु याहवेह सामर्थ्यवान योद्ध्यासारखे माझ्यासोबत आहेत; म्हणून माझा छळ करणारे अडखळतील व वरचढ होणार नाहीत. ते पराजित होतील आणि पुरेपूर फजीत होतील; आणि त्यांची अप्रतिष्ठा कधीही विसरली जाणार नाही.
- यिर्मयाह २०:१२सुमारे इ.स.पू. ६०७
हे सर्वसमर्थ याहवेह, तुम्ही नीतिमानाची पारख करता अंतःकरणाची व मनाची तपासणी करता, तुम्ही त्यांचा सूड घेतांना मला पाहू द्या, कारण मी माझी फिर्याद तुमच्यापुढे सादर केली आहे.
- यिर्मयाह २०:१३सुमारे इ.स.पू. ६०७
याहवेहचे स्तवन करा! याहवेहची स्तुती गा! दुष्टजनांच्या हातातून ते गरजवंताचे प्राण वाचवितात.
- यिर्मयाह २०:१४सुमारे इ.स.पू. ६०७
मी जन्मलो तो दिवस शापित होवो! ज्या दिवशी आईने मला जन्म दिला तो आशीर्वादित नसो!
- यिर्मयाह २०:१५सुमारे इ.स.पू. ६०७
“तुला बाळ झाले आहे—पुत्र झाला आहे!” हा संदेश ज्या मनुष्याने माझ्या पित्यास कळविला, तो मनुष्य शापित असो, याव्दारे त्यांना मोठा आनंद झाला होता.
- यिर्मयाह २०:१६सुमारे इ.स.पू. ६०७
याहवेहने दयामाया न दाखविता प्राचीन नगरांचा जसा नाश केला, तसाच त्या निरोप्याचाही नाश होवो. सकाळी तो शोकगीते ऐको, व दुपारी रणगर्जना.
- यिर्मयाह २०:१७सुमारे इ.स.पू. ६०७
कारण त्यांनी मला गर्भाशयामध्ये मारून टाकले नाही, मी माझ्या आईच्या उदरातच मेलो असतो, तिचे गर्भाशयच माझी कबर होऊन ते विस्तृत झाले असते,
- यिर्मयाह २०:१८सुमारे इ.स.पू. ६०७
मी गर्भाशयातून बाहेरच का आलो, ही संकटे व दुःख बघण्यासाठी आणि अप्रतिष्ठा सोसत जीवनाचा शेवट करण्यासाठी?
- यिर्मयाह २१:१सुमारे इ.स.पू. ५८९
याहवेहचे वचन यिर्मयाहकडे आले जेव्हा सिद्कीयाह राजाने मल्कीयाहचा पुत्र पशहूर व मासेयाहचा पुत्र सफन्याह याजक यांना यिर्मयाहकडे पाठविले. ते त्याला म्हणाले,
- यिर्मयाह २१:२सुमारे इ.स.पू. ५८९
“आम्हाला साहाय्य करावे, अशी विनंती याहवेहला कर, कारण बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर आमच्यावर आक्रमण करणार आहे. याहवेह आमच्यावर कृपा करतील आणि प्राचीन काळी ते करीत असत तसा एखादा महान चमत्कार करून नबुखद्नेस्सरला सैन्य घेऊन परत जायला भाग पाडतील.”
- यिर्मयाह २१:३सुमारे इ.स.पू. ५८९
यावर यिर्मयाहने उत्तर दिले, “सिद्कीयाहला सांगा,
- यिर्मयाह २१:४सुमारे इ.स.पू. ५८९
‘इस्राएलचे परमेश्वर याहवेह म्हणतात की तुम्हाला ज्या बाबेलच्या राजाने व खाल्डियन लोकांनी वेढा घातला आहे, त्यांच्याशी लढताना मी तुमची शस्त्रे तुमच्याच विरुद्ध करेन. मी तुमच्या शत्रूंना या नगराच्या आत एकत्रित करणार आहे.
- यिर्मयाह २१:५सुमारे इ.स.पू. ५८९
माझ्या अतिक्रोध व भयानक कोपामुळे माझा उगारलेला हात व शक्तिशाली भुजा घेऊन मी स्वतःच तुमच्याविरुद्ध लढणार आहे.
- यिर्मयाह २१:६सुमारे इ.स.पू. ५८९
या नगरात राहणाऱ्या सर्वांवर—मनुष्य व प्राणी या दोघांवर—मी भयानक मरी पाठवेन आणि ते मरतील.
- यिर्मयाह २१:७सुमारे इ.स.पू. ५८९
त्यानंतर याहवेहने ही घोषणा केली, मी यहूदीयाचा राजा सिद्कीयाह, त्याचे अधिकारी, व मरीमधून वाचलेल्या या नगरातील सर्व लोकांना बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर व त्यांचे शत्रू, जे त्यांचा प्राण घेऊ पाहतात त्यांच्या हाती देईन. तो त्यांना तलवारीने ठार करेल; तो त्यांच्यावर कोणतीही दया, करुणा वा कृपा करणार नाही.’
- यिर्मयाह २१:८सुमारे इ.स.पू. ५८९
“पुढे या लोकांना सांग, ‘याहवेह म्हणतात: पाहा मी तुमच्यासमोर जीवनाचा मार्ग आणि मरणाचा मार्ग ठेवला आहे.
- यिर्मयाह २१:९सुमारे इ.स.पू. ५८९
या नगरात जे कोणी राहतील ते तलवारीने, दुष्काळाने, मरीने मरतील. परंतु जे कोणी ज्यांनी तुम्हाला वेढा घातला आहे त्या खास्द्यांच्या सैन्यास समर्पण करतील ते जगतील; त्यांचा जीव वाचेल.
- यिर्मयाह २१:१०सुमारे इ.स.पू. ५८९
कारण मी या नगराचे भले नाही, तर विध्वंस करण्याचा निर्धार केला आहे, ही याहवेहची घोषणा आहे. हे नगर बाबेलच्या राजाच्या हाती देण्यात येईल आणि तो ते अग्नीने जाळून भस्म करेल.’
- यिर्मयाह २१:११सुमारे इ.स.पू. ५८९
“यहूदीयाच्या राजघराण्याला असे म्हण, ‘याहवेहचे वचन ऐका.
- यिर्मयाह २१:१२सुमारे इ.स.पू. ५८९
दावीदाच्या घराण्याला, याहवेह काय म्हणतात ते ऐका: “ ‘रोज सकाळी योग्य न्यायनिवाडा करा; दुष्टांनी ज्याला लुबाडले आहे अशांना त्यांच्या हातातून सोडवा, नाहीतर माझा क्रोध भडकेल व अग्नीसारखा पेटेल कारण तुम्ही दुष्कर्म केले आहे— हा क्रोधाग्नी कोणीही शांत करू शकणार नाही.
- यिर्मयाह २१:१३सुमारे इ.स.पू. ५८९
हे यरुशलेमा, मी तुझ्याविरुद्ध आहे, तुम्ही जे या खोर्यावर राहता खडकाळ पठारावरील रहिवासी, याहवेह असे म्हणतात; तुम्ही म्हणता, “आमच्याविरुद्ध कोण येईल? आमच्या वस्ती मध्ये कोण प्रवेश करेल?”
- यिर्मयाह २१:१४सुमारे इ.स.पू. ५८९
याहवेह म्हणतात, तुमच्या कृत्याच्या योग्य शिक्षा मी तुम्हाला करेन. मी तुमच्या अरण्यामध्ये अग्नी पेटवेन तो तुमच्या सभोवती असलेले सर्वकाही जाळून टाकेल.’ ”