circa 800–400 BC
The Hebrew Prophets
God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.
या कालखंडातील वचने
- यिर्मयाह १८:२१सुमारे इ.स.पू. ६०८
म्हणून त्यांच्या मुलांना दुष्काळामध्ये जाऊ द्या; त्यांना तलवारीच्या बलाच्या स्वाधीन करा. त्यांच्या स्त्रिया अपत्यहीन व विधवा होऊ द्या; त्यांचे पुरुष मृत्यू पावोत, व त्यांचे तरुण लढाईत तलवारीने मारले जावोत.
- यिर्मयाह १८:२२सुमारे इ.स.पू. ६०८
जेव्हा स्वारी करणारे त्यांच्यावर अचानक हल्ला करतील तेव्हा त्यांच्या घरातून आक्रोश व किंचाळ्या ऐकू येवोत, कारण मला पकडावे म्हणून त्यांनी खड्डा खणला आहे आणि माझ्या वाटेवर त्यांनी गुप्त सापळे लावले आहेत.
- यिर्मयाह १८:२३सुमारे इ.स.पू. ६०८
परंतु याहवेह, मला मारण्याच्या त्यांच्या सर्व युक्त्या तुम्ही जाणता. त्यांच्या अपराधांची क्षमा करू नका, किंवा त्यांचे पाप दृष्टीपुढून पुसून जाऊ नये. ते तुमच्यापुढे उलटून पडोत; तुम्ही आपल्या क्रोधाच्या वेळी त्यांचा समाचार घ्या.”
- यिर्मयाह १९:१सुमारे इ.स.पू. ६०७
याहवेह मला असे म्हणतात: “जा व एक मातीचे मडके विकत घे आणि जाताना लोकांमधील काही वडीलजन आणि काही याजक यांना आपल्याबरोबर घे.
- यिर्मयाह १९:२सुमारे इ.स.पू. ६०७
आणि बेन-हिन्नोमच्या खोर्यातून जा, तुटलेल्या मडक्याच्या व्दारा जवळ जा. तिथे जाऊन मी सांगेन त्या वचनाची घोषणा कर,
- यिर्मयाह १९:३सुमारे इ.स.पू. ६०७
आणि म्हण, अहो यहूदीयाच्या राजांनो, आणि यरुशलेमच्या लोकांनो, याहवेहचे वचन ऐका! सर्वसमर्थ याहवेह इस्राएलचे परमेश्वर म्हणतात: या स्थानावर मी असे भयंकर अरिष्ट आणेन की त्याविषयी जे ऐकतील त्यांचे कान भणभणतील.
- यिर्मयाह १९:४सुमारे इ.स.पू. ६०७
कारण त्यांनी मला सोडले आहे आणि हे स्थान त्यांनी परक्या दैवताचे केले आहे; हे लोक अन्य दैवतांपुढे धूप जाळतात, जे त्यांच्या पूर्वजांना किंवा यहूदीयाच्या राजांना कधीही माहीत नव्हते, आणि त्यांनी ही जागा निर्दोष रक्ताने भरून टाकली आहे.
- यिर्मयाह १९:५सुमारे इ.स.पू. ६०७
त्यांनी बआल दैवतासाठी होमार्पण म्हणून वेद्या बांधल्या आहेत आणि त्यावर ते आपल्या मुलांचा होम करतात—असे करण्याची मी त्यांना कधी आज्ञा दिली नव्हती किंवा कधी उल्लेखही केला नव्हता, अथवा विचारही केला नव्हता.
- यिर्मयाह १९:६सुमारे इ.स.पू. ६०७
याहवेह म्हणाले, पाहा, असे दिवस येत आहेत, तेव्हा या खोर्याला ‘तोफेत’ किंवा ‘बेन-हिन्नोमचे खोरे’ असे म्हणणार नाहीत, तर ‘कत्तलीचे खोरे’ असे म्हणतील.
- यिर्मयाह १९:७सुमारे इ.स.पू. ६०७
“ ‘या ठिकाणी यहूदीया व यरुशलेम यांच्या योजना मी उधळून लावेन. मी त्यांच्या शत्रूच्या समक्ष तलवारीने त्यांचा वध करेन, जे त्यांचा प्राण घेऊ पाहतात, आणि मी त्यांची प्रेते पक्ष्यांना आणि हिंस्र पशूंना खावयास देईन.
- यिर्मयाह १९:८सुमारे इ.स.पू. ६०७
मी या नगराचा नाश करेन आणि ते दहशतीचे व आणि घृणेचे ठिकाण बनवीन; त्याच्या जवळून जाणारा कोणीही त्याच्या सर्व जखमांमुळे भयचकित होतील आणि त्यांचा उपहास करतील.
- यिर्मयाह १९:९सुमारे इ.स.पू. ६०७
मी त्यांना त्यांच्या पुत्र आणि कन्यांचे मांस खाण्यास लावेन, आणि त्यांचे शत्रू त्यांच्या सभोवतीच्या वेढ्याने त्यांच्यावर एवढा दबाव आणतील की ते एक दुसऱ्याचे मांस खातील.’
- यिर्मयाह १९:१०सुमारे इ.स.पू. ६०७
“यिर्मयाह, आता हे लोक पाहत असताना तू आणलेले ते मडके फोडून टाक,
- यिर्मयाह १९:११सुमारे इ.स.पू. ६०७
आणि त्यांना सांग, ‘सर्वसमर्थ याहवेहचा तुम्हाला हा संदेश आहे: ज्याप्रमाणे या मडक्याच्या ठिकर्या ठिकर्या झाल्या आहेत व हे मडके जसे पुन्हा नीट करता येणार नाही, त्याप्रमाणेच मी या नगरीच्या लोकांचा चुराडा करेन. तोफेतमध्ये इतक्या प्रेतांना मूठमाती देण्यात येईल की कुठे जागा उरणार नाही.
- यिर्मयाह १९:१२सुमारे इ.स.पू. ६०७
या ठिकाणी मी हेच करणार व इथे राहणाऱ्या लोकांनाही करेन, ही याहवेहची घोषणा आहे. मी या नगराला तोफेतासारखे करेन.
- यिर्मयाह १९:१३सुमारे इ.स.पू. ६०७
यरुशलेममधील घरे व यहूदीयांच्या राजांचे राजवाडे तोफेतासारखे भ्रष्ट करेन—ज्या घरांच्या धाब्यांवर त्यांनी आकाशातील शक्तींना धूप जाळला व इतर दैवतांस पेयार्पणे वाहिली.’ ”
- यिर्मयाह १९:१४सुमारे इ.स.पू. ६०७
नंतर यिर्मयाह तोफेत येथे हा संदेश देऊन परतला, जिथे याहवेहने यिर्मयाहला भविष्यवाणी करण्यासाठी पाठविले होते, तिथे तो मंदिरापुढे थांबला व सर्व लोकांना उद्देशून म्हणाला,
- यिर्मयाह १९:१५सुमारे इ.स.पू. ६०७
“सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर, काय म्हणतात: ‘ऐका! मी या नगरावर आणि सभोवतालच्या गावावर मी शपथपूर्वक म्हटल्याप्रमाणे सर्व अरिष्टे आणणार आहे, कारण ते हट्टी होते व माझी वचने ऐकत नव्हते.’ ”
- यिर्मयाह २०:१सुमारे इ.स.पू. ६०७
जेव्हा याहवेहच्या मंदिराचा मुख्य अधिकारी इम्मेरचा पुत्र पशहूर याजक, याने यिर्मयाहास अशी भविष्यवाणी करताना ऐकले, तेव्हा
- यिर्मयाह २०:२सुमारे इ.स.पू. ६०७
पशहूराने यिर्मयाह संदेष्ट्याला पकडून फटके मारविले आणि याहवेहच्या मंदिराजवळच्या बिन्यामीन दरवाजाजवळ खोड्यात अडकवून ठेवले.
- यिर्मयाह २०:३सुमारे इ.स.पू. ६०७
पशहूरने जेव्हा दुसर्या दिवशी यिर्मयाहाला खोड्यातून मोकळे केले, तेव्हा यिर्मयाह त्याला म्हणाला, “याहवेहने तुझे पशहूर नाव बदलून, येथून पुढे सर्व बाजूने दहशत असे ठेवले आहे.
- यिर्मयाह २०:४सुमारे इ.स.पू. ६०७
याहवेह असे म्हणतात: मी तुला स्वतःकरिता व तुझ्या मित्राकरिता दहशत असे करेन; ते सर्व शत्रूंच्या तलवारींनी बळी पडलेले तू आपल्या नजरेने पाहशील. मी संपूर्ण यहूदीया प्रांत बाबेलच्या राजाच्या स्वाधीन करेन, तो या लोकांना गुलाम करून बाबेलला नेईल किंवा त्यांना ठार मारेल.
- यिर्मयाह २०:५सुमारे इ.स.पू. ६०७
मी या नगरातील सर्व संपत्ती त्यांच्या शत्रूंच्या हातात देईन—सर्व उत्पादन, सर्व जडजवाहीर आणि यहूदीयाच्या राजांचा सर्व खजिना. ते त्यांना लुटतील आणि बाबेलला ते घेऊन जातील.
- यिर्मयाह २०:६सुमारे इ.स.पू. ६०७
आणि हे पशहूरा, तू स्वतः व तुझ्यासह तुझ्या घरात राहणारे सर्वजण बाबेलमध्ये बंदिवासात जाल. तू तिथेच मरशील व पुरला जाशील, तू व ज्यांच्याकडे तू खोटी भविष्यवाणी केलीस त्या तुझ्या सर्व मित्रगणाची गतही तशीच होईल.”
- यिर्मयाह २०:७सुमारे इ.स.पू. ६०७
याहवेह, तुम्ही मला फसविले आणि मी फसलो; तुम्ही माझ्यापेक्षा प्रबळ आहात म्हणून विजयी झालात. मी दिवसभर उपहासाचा विषय झालो आहे; सर्वजण माझी थट्टा करतात.