मुख्य मजकुरावर जा

circa 800–400 BC

The Hebrew Prophets

God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.

3,706 वचने · 14 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यिर्मयाह १७:२३सुमारे इ.स.पू. ६११

    परंतु त्यांनी ती ऐकली नाही किंवा त्याकडे लक्ष दिले नाही. ते हट्टी होते आणि ते ऐकत नव्हते वा शिस्तीस प्रतिसाद देत नव्हते.

  2. यिर्मयाह १७:२४सुमारे इ.स.पू. ६११

    याहवेह म्हणतात, परंतु तुम्ही जर माझ्या आज्ञा काळजीपूर्वक पाळल्या, आणि शब्बाथ दिवशी कोणताही भार नगरीच्या प्रवेश व्दारातून नेआण न करता, काहीही काम न करता तो पवित्र दिवस असा पाळलात,

  3. यिर्मयाह १७:२५सुमारे इ.स.पू. ६११

    तर असे होईल, दावीदाच्या सिंहासनावर बसणारे राजे आणि अधिपती थाटाने, वैभवाने रथारूढ व अश्वारूढ होऊन येणारे या शहराच्या प्रवेश व्दारातून प्रवेश करतील, आणि त्यांचे सरदार, यहूदीयाचे लोक व यरुशलेमनिवासी या लोकांवर राज्य करतील आणि हे शहर कायम वसलेले राहील.

  4. यिर्मयाह १७:२६सुमारे इ.स.पू. ६११

    तेव्हा लोकसमुदाय यहूदीयाच्या शहरातून आणि यरुशलेमच्या परिसरातून, त्याचप्रमाणे बिन्यामीन या प्रांतांच्या डोंगरदऱ्यांच्या नेगेव येथून, पश्चिमेकडील तळवटीतून, सर्व लोक आपआपली होमार्पणे, धान्यार्पणे व ऊद आणतील व याहवेहच्या मंदिरामध्ये त्यांना उपकारस्तुतीची अर्पणे आणतील.

  5. यिर्मयाह १७:२७सुमारे इ.स.पू. ६११

    परंतु जर तुम्ही शब्बाथ पवित्रपणे पाळण्याचे ऐकले नाही, शब्बाथ दिवशी यरुशलेमच्या या प्रवेश व्दारातून इतर दिवशी करता तसे मालाचे भार आणले, तर मी या यरुशलेमचे प्रवेश व्दार पेटवून त्याचा पूर्णपणे विध्वंस करेन, जो अग्नी कधीही विझणार नाही, जो तेथील गड भस्म करेल.’ ”

  6. याहवेहकडून यिर्मयाहला हे वचन प्राप्त झाले:

  7. यिर्मयाह १८:२सुमारे इ.स.पू. ६०८

    “कुंभाराच्या घरी जा आणि तिथे मी तुला माझा संदेश देईन.”

  8. यिर्मयाह १८:३सुमारे इ.स.पू. ६०८

    म्हणून मी कुंभाराच्या घरी गेलो, आणि तिथे तो आपल्या चाकावर काम करताना मला दिसला.

  9. यिर्मयाह १८:४सुमारे इ.स.पू. ६०८

    परंतु तो जे मडके करीत होता, त्याच्या हातातील मातीचा आकार बिघडला; म्हणून त्याने त्याचे, त्याला योग्य वाटेल तसे दुसरे मडके बनविले.

  10. यिर्मयाह १८:५सुमारे इ.स.पू. ६०८

    तेव्हा याहवेहचे वचन माझ्याकडे आले.

  11. यिर्मयाह १८:६सुमारे इ.स.पू. ६०८

    ते म्हणाले, “हे इस्राएला, या कुंभाराने आपल्या मातीचे केले तसे मला तुझे करता येणार नाही काय? कुंभाराच्या हातात माती असते तसे इस्राएला, तुम्ही माझ्या हातात आहात,” असे याहवेह जाहीर करतात.

  12. यिर्मयाह १८:७सुमारे इ.स.पू. ६०८

    एखाद्या राष्ट्राचा भेद पाडावा, त्याचे निर्मूलन करावे, व समूळ नाश करावा, असे जेव्हा मी जाहीर करतो,

  13. यिर्मयाह १८:८सुमारे इ.स.पू. ६०८

    तेव्हा ज्यास मी सावध केले त्या राष्ट्राने आपल्या कुमार्गाबद्दल पश्चात्ताप केला, तर मी त्यांच्यावर दया करेन व माझ्या योजनेप्रमाणे त्यांचा नाश करणार नाही.

  14. यिर्मयाह १८:९सुमारे इ.स.पू. ६०८

    आणि जर मी एखाद्या राष्ट्राची बांधणी करण्याची आणि वसविण्याची घोषणा केली,

  15. यिर्मयाह १८:१०सुमारे इ.स.पू. ६०८

    आणि जर त्यांनी माझ्या दृष्टीने पाप केले आणि माझी आज्ञा पाळली नाही, तर मी त्याला आशीर्वाद देण्यासाठी पुनर्विचार करेन.

  16. यिर्मयाह १८:११सुमारे इ.स.पू. ६०८

    “म्हणून आता यहूदीयातील लोकांना आणि जे यरुशलेममध्ये राहतात, त्यांना सांग, ‘याहवेहचा संदेश ऐका: पाहा! मी तुमच्यासाठी विपत्ती तयार करीत आहे आणि तुमच्याविरुद्ध योजना आखीत आहे. म्हणून तुम्ही प्रत्येकजण दुष्ट मार्गापासून वळा, व तुमचे मार्ग व तुमचे आचरण सुधारा.’

  17. यिर्मयाह १८:१२सुमारे इ.स.पू. ६०८

    परंतु त्यांनी उत्तर दिले, ‘हे उपयोगाचे नाही. आम्ही आमच्या आखलेल्या योजनेप्रमाणे करीत राहू; आम्ही आमच्या हृदयाच्या हट्टीपणा व दुष्टपणानेच चालणार.’ ”

  18. यिर्मयाह १८:१३सुमारे इ.स.पू. ६०८

    म्हणून याहवेह असे म्हणतात: “आता राष्ट्रांमध्ये जाऊन चौकशी करा: असा प्रकार कोणी कधी ऐकला आहे काय? इस्राएलाच्या कुमारिकेने एवढे भयंकर कर्म केले आहे.

  19. यिर्मयाह १८:१४सुमारे इ.स.पू. ६०८

    लबानोनच्या खडकाळ घसरणीचा बर्फ कधी वितळतो का? दूरच्या स्त्रोतातून वाहत येणारे थंड पाणी कधी वाहण्याचे थांबते काय?

  20. यिर्मयाह १८:१५सुमारे इ.स.पू. ६०८

    तरीसुद्धा माझे लोक मला विसरले; ते व्यर्थ मूर्तीला व्यर्थ धूप जाळतात, ते त्यांना अडखळत चालावयास लावतात ते पूर्वजांचे मार्ग आहेत. जे मार्ग नीट बांधलेले नाही, म्हणून त्या आडमार्गावरून त्यांना चलविले गेले.

  21. यिर्मयाह १८:१६सुमारे इ.स.पू. ६०८

    त्यांचा देश भयानकतेचे, आणि नेहमीसाठी तिरस्काराचे उदाहरण होईल; येजा करणाऱ्या सर्वांना हे बघून दहशत भरेल आणि ते आश्चर्याने आपली डोकी हालवितील.

  22. यिर्मयाह १८:१७सुमारे इ.स.पू. ६०८

    जसा पूर्वेकडील वारा धूळ उडवितो, त्याप्रमाणे मी त्यांना त्यांच्या शत्रूंपुढे उडवेन; त्यांच्या दुर्दशेच्या दिवशी मी माझे मुख नव्हे, तर त्यांच्याकडे पाठ फिरवेन.”

  23. यिर्मयाह १८:१८सुमारे इ.स.पू. ६०८

    त्यांनी म्हटले, “चला, उठा, यिर्मयाह विरुद्ध काहीतरी कारस्थान करू; आम्हाला नियम शिकविण्यास आमचे याजक, बोध देण्यासाठी आमचे ज्ञानी लोक, आणि संदेश देण्यासाठी आमचे संदेष्टेही नष्ट होणार नाहीत. म्हणून चला, आपण त्याच्यावर वाक्बाणाचा हल्ला करू आणि तो काय बोलतो याच्याकडे लक्ष देऊ नये.”

  24. यिर्मयाह १८:१९सुमारे इ.स.पू. ६०८

    “हे याहवेह, माझे ऐका, माझ्याविरुद्ध कारस्थान करणारे काय म्हणतात ते ऐका!

  25. यिर्मयाह १८:२०सुमारे इ.स.पू. ६०८

    चांगल्याची वाईटाने भरपाई करावी का? माझा जीव घेण्यासाठी त्यांनी खड्डा खोदला आहे. आठवण ठेवा की मी आपल्यासमोर उभा राहिलो आणि त्यांच्यावतीने बोललो जेणेकरून तुमचा क्रोध त्यांच्यापासून दूर व्हावा.