- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa AD 30–62
The Early Church
Pentecost ignites a movement; Peter, Paul, and countless others carry the gospel from Jerusalem to the ends of the earth.
या कालखंडातील वचने
- प्रेषित १५:३२सुमारे इ.स. ५१
मग यहूदाह आणि सीला, जे स्वतः संदेष्टे होते, त्यांनी विश्वासणार्यांना पुष्कळ गोष्टी बोलण्याद्वारे उत्तेजित करून स्थिरावले.
- प्रेषित १५:३३सुमारे इ.स. ५१
तिथे काही काळ राहिल्यानंतर, तेथील विश्वासणार्यांनी त्यांना शांतीचा आशीर्वाद देऊन, ज्यांनी त्यांना पाठविले होते त्यांच्याकडे परत पाठविले.
- प्रेषित १५:३४सुमारे इ.स. ५१
परंतु सीला तिथेच राहिला.
- प्रेषित १५:३५सुमारे इ.स. ५१
पौल व बर्णबा अंत्युखियामध्ये राहिले, तिथे ते व त्यांच्याबरोबर अनेकांनी शिक्षण दिले आणि प्रभूच्या वचनाची घोषणा केली.
- प्रेषित १५:३६सुमारे इ.स. ५१
काही काळानंतर पौलाने बर्णबाला म्हटले, “आपण परत जावे व ज्या ज्या सर्व शहरांत जिथे आपण प्रभूच्या वचनाचा प्रचार केला होता, तेथील विश्वासणार्यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस करावी.”
- प्रेषित १५:३७सुमारे इ.स. ५१
बर्णबाला हवे होते की योहान, ज्याला मार्क असेही म्हणत, त्यालाही आपल्याबरोबर न्यावे.
- प्रेषित १५:३८सुमारे इ.स. ५१
परंतु पौलाला त्याला बरोबर नेणे सुज्ञपणाचे वाटले नाही, कारण मार्क त्यांना पंफुल्यामध्ये सोडून गेला होता आणि या कार्यात पुढे जाण्यासाठी त्याने साथ दिली नव्हती.
- प्रेषित १५:३९सुमारे इ.स. ५१
याबाबत त्यांचा मतभेद एवढा तीव्र झाला की त्यांनी एकमेकांची सोबत सोडली. बर्णबाने आपल्याबरोबर मार्कला घेतले आणि जहाजात बसून ते सायप्रसला गेले,
- प्रेषित १५:४०सुमारे इ.स. ५१
परंतु पौलाने सीलाची निवड केली व त्यासह तो निघाला. विश्वासणार्यांनी त्यांना शाबासकी देऊन प्रभूच्या कृपेवर सोपविले.
- प्रेषित १५:४१सुमारे इ.स. ५१
तो सिरिया व किलिकियामधून मंडळ्यांना बळकट करीत गेला.
- प्रेषित १६:१सुमारे इ.स. ५३
पौल दर्बे आणि नंतर लुस्त्र येथे आला, तिथे तीमथ्य नावाचा एक शिष्य राहत होता, त्याची आई यहूदी असून विश्वासणारी होती, परंतु त्याचे वडील ग्रीक होते.
- प्रेषित १६:२सुमारे इ.स. ५३
लुस्त्र व इकुन्या येथील विश्वासणारे त्याच्याबद्दल चांगली साक्ष देत होते.
- प्रेषित १६:३सुमारे इ.स. ५३
त्याला आपल्याबरोबर फेरीत सामील करावयाचे असल्यामुळे पौलाने निघण्यापूर्वी तीमथ्याची सुंता करविली, कारण त्या भागातील सर्व यहूदीयांना त्याचे वडील ग्रीक असल्याचे माहीत होते.
- प्रेषित १६:४सुमारे इ.स. ५३
गावागावातून प्रवास करीत असताना, त्यांनी यरुशलेममधील प्रेषित व वडीलजन यांनी जे निर्णय ठरविले होते त्याचे पालन लोकांनी करावे, असे सांगितले.
- प्रेषित १६:५सुमारे इ.स. ५३
म्हणून मंडळ्या विश्वासात स्थिर झाल्या व त्यांच्या संख्येत दररोज वाढ होत गेली.
- प्रेषित १६:६सुमारे इ.स. ५३
त्यानंतर पौल आणि त्याचे सहकारी यांनी फ्रुगिया आणि गलातीया प्रांतातून सगळीकडे प्रवास केला, कारण आशिया प्रांतात जाऊन परमेश्वराच्या वचनाचा प्रचार करू नये असे पवित्र आत्म्याकडून त्यांना सांगण्यात आले होते.
- प्रेषित १६:७सुमारे इ.स. ५३
मुसियाच्या सरहद्दीवर आल्यानंतर, ते बिथुनिया प्रांतामध्ये प्रवेश करावयास निघाले, तेव्हा येशूंच्या आत्म्याने त्यांना तशी परवानगी दिली नाही.
- प्रेषित १६:८सुमारे इ.स. ५३
म्हणून ते मुसिया प्रांतातून खाली त्रोवास येथे गेले.
- प्रेषित १६:९सुमारे इ.स. ५३
रात्रीच्या वेळी पौलाने दृष्टान्तात असे पाहिले की मासेदोनियातील मनुष्य उभा राहून गयावया होऊन विनंती करीत आहे, “मासेदोनियात या व आम्हास मदत करा.”
- प्रेषित १६:१०सुमारे इ.स. ५३
पौलाने हा दृष्टान्त पाहिल्यानंतर आपल्याला परमेश्वराने यांच्यामध्ये शुभवार्ता प्रचार करावयास बोलाविले आहे, असे समजून लगेच आम्ही मासेदोनियास जाण्याची तयारी केली.
- प्रेषित १६:११सुमारे इ.स. ५३
आम्ही त्रोवास येथून जहाजात चढलो व सरळ समथ्राकेस पोहोचलो व दुसर्या दिवशी नियापुलीस येथे गेलो.
- प्रेषित १६:१२सुमारे इ.स. ५३
तिथून आम्ही प्रवास करून फिलिप्पै, जे रोमी वसाहतीत असून मासेदोनियाच्या शहरामधील एक महत्त्वाचे नगर होते तिथे गेलो. तिथे आम्ही बरेच दिवस राहिलो.
- प्रेषित १६:१३सुमारे इ.स. ५३
मग शब्बाथ दिवशी आम्ही शहराच्या द्वारातून बाहेर नदीकाठी गेलो, तिथे प्रार्थनेसाठी ठिकाण असेल अशी आमची अपेक्षा होती. आम्ही तिथे बसलो आणि ज्या स्त्रिया तिथे जमल्या होत्या, त्यांच्याबरोबर बोलण्यास सुरुवात केली.
- प्रेषित १६:१४सुमारे इ.स. ५३
त्या ऐकणार्या स्त्रियांमध्ये थुवतीरा शहराची लुदिया नावाची कोणी एक स्त्री होती. ती जांभळ्या वस्त्रांचा व्यवसाय करीत असे, ती परमेश्वराची उपासना करणारी होती. पौलाच्या संदेशाचा स्वीकार करण्यासाठी प्रभूने तिचे हृदय उघडले.
- प्रेषित १६:१५सुमारे इ.स. ५३
मग तिचा आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांचा बाप्तिस्मा झाला व तिने आम्हाला तिच्या घरी बोलाविले. ती म्हणाली, “मी प्रभूवर विश्वास ठेवणारी आहे, असे जर तुम्ही मान्य करीत असाल तर, या आणि माझ्या घरी राहा.” तिच्या आग्रहामुळे आम्हाला ते मान्य करावे लागले.