- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 930–586 BC
The Divided Kingdom
The kingdom splits into Israel and Judah; prophets warn of judgment as both nations slowly drift into idolatry and exile.
या कालखंडातील वचने
- 2 राजे ६:२८सुमारे इ.स.पू. ८९३
मग राजाने तिला विचारले, “तुला काय झाले आहे?” स्त्रीने उत्तर दिले, “या स्त्रीने मला म्हटले, ‘तू आपला मुलगा दे म्हणजे आज आपण त्याला खाऊ आणि उद्या आपण माझ्या मुलाला खाऊ.’
- 2 राजे ६:२९सुमारे इ.स.पू. ८९३
तेव्हा आम्ही माझ्या मुलाला शिजवून खाल्ले. दुसर्या दिवशी मी तिला म्हणाले, ‘आता तुझ्या मुलाला आण म्हणजे आपण त्याला खाऊ,’ पण तिने त्याला कुठेतरी लपवून ठेवले.”
- 2 राजे ६:३०सुमारे इ.स.पू. ८९३
जेव्हा राजाने स्त्रीचे शब्द ऐकले, तेव्हा त्याने आपला अंगरखा फाडला. त्याला तटावरून फिरत असता लोकांनी पाहिले आणि त्यांच्या नजरेस आले की त्याच्या अंगरख्या खाली त्याने गोणपाट गुंडाळलेले आहे.
- 2 राजे ६:३१सुमारे इ.स.पू. ८९३
तो म्हणाला, “मी जर आज शाफाटाचा पुत्र अलीशाचे शिर उडविले नाही, तर परमेश्वर माझे त्याहूनही अधिक वाईट करो.”
- 2 राजे ६:३२सुमारे इ.स.पू. ८९३
अलीशा आपल्या घरात बसलेला होता आणि वडीलजन त्याच्यासोबत बसलेले होते. राजाने आपल्यापुढे दूत पाठविला, पण तो येण्यापूर्वी अलीशा वडीलजनांना म्हणाला, “या खुनी मनुष्याने माझा शिरच्छेद करण्यासाठी कोणाला तरी पाठविले आहे, हे तुम्ही पाहिले काय? पाहा, जेव्हा दूत येईल तेव्हा दार बंद करून त्याला बाहेरच ठेवा, कारण त्याच्या पाठोपाठ त्याच्या धन्याच्या पावलांचा आवाज आहे की नाही?”
- 2 राजे ६:३३सुमारे इ.स.पू. ८९३
अलीशा हे सांगत असतानाच तो दूत खाली त्याच्याजवळ आला. राजा म्हणाला, “हे अरिष्ट याहवेहकडून आहे. तेव्हा मी याहवेहची अजून वाट का पाहावी?”
- 2 राजे ७:१सुमारे इ.स.पू. ८९२
अलीशाने उत्तर दिले, “याहवेहचे वचन ऐका. याहवेह असे म्हणतात: उद्या याच सुमारास शोमरोनच्या वेशीत तुम्हाला एका शेकेलला एक सिआ सपीठ आणि एका शेकेलला दोन सिआ सातू मिळेल.”
- 2 राजे ७:२सुमारे इ.स.पू. ८९२
ज्या कारभाऱ्याच्या हातावर राजा टेकायचा तो परमेश्वराच्या मनुष्याला म्हणाला, “याहवेहने आकाशाच्या खिडक्या उघडल्या, तरी असे घडणे शक्य नाही.” अलीशाने त्याला उत्तर दिले, “तसे तू आपल्या डोळ्यांनी पाहशील, पण त्यातील तू काहीही खाऊ शकणार नाही!”
- 2 राजे ७:३सुमारे इ.स.पू. ८९२
त्यावेळी शहराच्या वेशीजवळ चार कुष्ठरोगी बसले होते. त्यांनी एकमेकास म्हटले, “आपण मरेपर्यंत इथे का राहावे?
- 2 राजे ७:४सुमारे इ.स.पू. ८९२
जर आपण म्हणालो, ‘आपण शहरात जाऊ,’ तर तिथे दुष्काळ आहे आणि आपण तर मरणारच. येते बसून राहिलो तरीही आपण मरणारच आहोत. तर मग आपण अरामी सैन्याच्या छावणीत जाऊ आणि शरण घेऊ. त्यांनी आपल्याला जीवदान दिले, तर जिवंत राहू आणि मारून टाकले, तर आपण मरू, तर त्यात काही हरकत नाही.”
- 2 राजे ७:५सुमारे इ.स.पू. ८९२
संध्याकाळी ते उठले आणि अरामी सैन्याच्या छावणीत गेले, पण जेव्हा ते छावणीच्या सीमेवर आले तेव्हा तिथे एकही मनुष्य नव्हता,
- 2 राजे ७:६सुमारे इ.स.पू. ८९२
कारण प्रभू परमेश्वराने अरामी सेनेला रथांचा आणि घोड्यांचा आणि मोठ्या सैन्याचा आवाज ऐकविला होता. तेव्हा ते एकमेकांना म्हणाले, “पाहा, आमच्यावर हल्ला चढविण्यासाठी इस्राएलाच्या राजाने पैसे देऊन हिथी व इजिप्ती राजे बोलाविले आहे.”
- 2 राजे ७:७सुमारे इ.स.पू. ८९२
तेव्हा ते उठले आणि संध्याकाळी पळून गेले. त्यांनी आपले तंबू, घोडे, गाढवे यांचा त्याग केला. आपले तंबू तसेच सोडून प्राण वाचविण्यासाठी त्यांनी पलायन केले.
- 2 राजे ७:८सुमारे इ.स.पू. ८९२
जेव्हा हे कुष्ठरोगी अरामी छावणीच्या सीमेजवळ आले, तेव्हा त्यांनी एका तंबूत घुसून खाणेपिणे केले. त्यांनी चांदी, सोने आणि कपडे गोळा करून ते लपवून ठेवले. ते परत येऊन दुसर्या तंबूत गेले आणि त्यातून काही वस्तू घेतल्या आणि त्यादेखील लपवून ठेवल्या.
- 2 राजे ७:९सुमारे इ.स.पू. ८९२
तेव्हा ते एकमेकास म्हणाले, “आपण जे करत आहोत ते योग्य नाही. हा आनंदाच्या शुभवार्तेचा दिवस आहे आणि ती आपण स्वतःजवळच ठेवीत आहोत. जर आपण सकाळ होईपर्यंत थांबून राहिलो तर आपण दंडपात्र होऊ. तेव्हा चला, आपण राजवाड्यात जाऊन ही बातमी सांगू.”
- 2 राजे ७:१०सुमारे इ.स.पू. ८९२
नंतर ते गेले आणि शहराच्या पहारेकर्यांना हाक मारून सांगितले, “आम्ही अरामी छावणीत गेलो होतो आणि तिथे कोणीही मनुष्य नव्हता—कोणाचाही शब्द नाही—तेथील घोडे व गाढवे बांधून ठेवली आहेत आणि तंबूही जसेच्या तसे आहेत.”
- 2 राजे ७:११सुमारे इ.स.पू. ८९२
तेव्हा पहारेकर्यांनी ओरडून ही बातमी सांगितली आणि राजवाड्यात कळविली.
- 2 राजे ७:१२सुमारे इ.स.पू. ८९२
तेव्हा राजा रात्री उठला आणि आपल्या सेवकांना म्हणाला, “मी तुम्हाला सांगतो की अरामी लोकांनी आपल्यासोबत काय केले आहे. आपण भुकेने मरत आहोत हे त्यांना माहीत आहे; म्हणून ते आपली छावणी सोडून आजूबाजूला मैदानात दबा धरून बसले आहे. त्यांना वाटते की, ‘ते खात्रीने बाहेर पडतील आणि मग आपण त्यांना जिवंत पकडू आणि त्यांच्या शहरात प्रवेश करू.’ ”
- 2 राजे ७:१३सुमारे इ.स.पू. ८९२
तेव्हा त्याच्या एका अधिकार्याने उत्तर दिले, “शहरात शिल्लक राहिलेले पाच घोडे घेण्यास काही माणसांना सांगा. तसेही त्यांची अवस्था येथे उरलेल्या सर्व इस्राएली लोकांपेक्षा काही वेगळी नाही—होय, ते केवळ ज्यांचा नाश झाला आहे, त्या सर्व इस्राएली लोकांप्रमाणेच असतील. म्हणून काय झाले आहे हे पाहण्यास काही लोकांना पाठवू द्या.”
- 2 राजे ७:१४सुमारे इ.स.पू. ८९२
म्हणून त्यांनी दोन रथ घोड्यांसहित घेतले आणि राजाने त्यांना अरामी सैन्याच्या मागे पाठविले. त्याने त्यांना आदेश दिला, “जा आणि काय झाले ते पाहून या.”
- 2 राजे ७:१५सुमारे इ.स.पू. ८९२
ते यार्देनपर्यंत त्यांच्यामागे गेले आणि अरामी लोकांचे कपडे व सामान मार्गावर पसरलेले त्यांना आढळले, जे अरामी लोकांनी पळून जात असता फेकून दिले होते. दूत परत आले आणि राजाला हे वर्तमान कळवले.
- 2 राजे ७:१६सुमारे इ.स.पू. ८९२
मग लोक बाहेर निघाले आणि अरामी लोकांची छावणी लुटली. याहवेहच्या वचनानुसार एका शेकेलास एक सिआ सपीठ, आणि एका शेकेलास सातूच्या दोन सेआ विकत मिळू लागले.
- 2 राजे ७:१७सुमारे इ.स.पू. ८९२
राजा ज्या अधिकार्याच्या दंडावर टेकीत होता त्याला वेशीवर नियुक्त केले होते आणि लोकांनी त्याला वेशीवर तुडविले व तो मरण पावला, ज्याप्रमाणे परमेश्वराच्या मनुष्याने सांगितले होते, जेव्हा राजा खाली त्याच्याकडे गेला होता.
- 2 राजे ७:१८सुमारे इ.स.पू. ८९२
परमेश्वराच्या मनुष्याने राजाला सांगितल्याप्रमाणे झाले: “शोमरोनच्या वेशीजवळ एका शेकेलास एक सिआ सपीठ आणि एका शेकेलास दोन सिआ सातू विकत मिळू लागेल.”
- 2 राजे ७:१९सुमारे इ.स.पू. ८९२
त्या अधिकार्याने परमेश्वराच्या मनुष्याला म्हटले होते, “याहवेहने आकाशाच्या खिडक्या उघडल्या, तरी असे घडणे शक्य नाही.” परमेश्वराच्या मनुष्याने उत्तर दिले होते, “तसे तू आपल्या डोळ्यांनी पाहशील, पण त्यातील तू काहीही खाऊ शकणार नाही!”