- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 930–586 BC
The Divided Kingdom
The kingdom splits into Israel and Judah; prophets warn of judgment as both nations slowly drift into idolatry and exile.
या कालखंडातील वचने
- 2 राजे ८:२५सुमारे इ.स.पू. ८८५
इस्राएलाचा राजा अहाबाचा पुत्र योरामच्या बाराव्या वर्षी यहोरामाचा पुत्र अहज्याह यहूदीयाचा राजा म्हणून राज्य करू लागला.
- 2 राजे ८:२६सुमारे इ.स.पू. ८८५
वयाच्या बावीसाव्या वर्षी अहज्याह राजा झाला आणि त्याने यरुशलेमात एक वर्ष राज्य केले. त्याच्या आईचे नाव अथल्याह होते, ती इस्राएलाचा राजा ओमरीची नात होती.
- 2 राजे ८:२७सुमारे इ.स.पू. ८८५
तो अहाबाच्या घराण्याच्या मार्गाने चालला आणि अहाबाच्या घराण्याप्रमाणे याहवेहच्या दृष्टीने वाईट ते केले, कारण त्याचे अहाबाच्या घराण्याशी विवाहाद्वारे संबंध होते.
- 2 राजे ८:२८सुमारे इ.स.पू. ८८४
अरामचा राजा, हजाएलविरुद्ध रामोथ गिलआद येथे झालेल्या युद्धात अहज्याह इस्राएलचा राजा अहाबाचा पुत्र योरामच्या बाजूने लढला. या युद्धात योराम राजा जखमी झाला;
- 2 राजे ८:२९सुमारे इ.स.पू. ८८४
रामाह येथे अरामचा राजा हजाएलशी लढताना झालेल्या जखमांना मलम पट्टी करण्यासाठी योराम राजा येज्रीलला परतला. यहूदीयाचा राजा यहोरामचा पुत्र अहज्याह हा अहाबाचा पुत्र योरामची प्रकृती पाहण्यासाठी येज्रीलला गेला, कारण योराम जखमी झाला होता.
- 2 राजे ९:१सुमारे इ.स.पू. ८८४
इकडे अलीशा संदेष्ट्याने एका तरुण संदेष्ट्याला संदेष्ट्यांच्या समुहातून बोलाविले आणि त्याला म्हटले, “तू आपली कंबर बांध, जैतून तेलाची कुपी बरोबर घे आणि रामोथ गिलआद येथे जा.
- 2 राजे ९:२सुमारे इ.स.पू. ८८४
जेव्हा तू तिथे पोहोचशील तेव्हा निमशी यहोशाफाटाचा पुत्र येहूचा शोध घे व त्याला त्याच्या मित्र मंडळीपासून दूर एका खाजगी खोलीत घेऊन जा,
- 2 राजे ९:३सुमारे इ.स.पू. ८८४
मग कुपी घे आणि तेल त्याच्या मस्तकांवर ओत आणि जाहीर कर, ‘याहवेह असे म्हणतात: मी तुझा इस्राएलाचा राजा म्हणून अभिषेक करतो.’ नंतर दार उघड आणि पळ; उशीर करू नकोस!”
- 2 राजे ९:४सुमारे इ.स.पू. ८८४
मग तो तरुण संदेष्टा रामोथ-गिलआद येथे गेला.
- 2 राजे ९:५सुमारे इ.स.पू. ८८४
जेव्हा तो तिथे पोहोचला, तेव्हा त्याने पाहिले की सेना अधिकारी सोबत बसलेले आहेत. तो म्हणाला, “सेनापती महोदय, माझ्याजवळ तुमच्यासाठी एक संदेश आहे.” येहूने विचारले, “आमच्यापैकी कोणासाठी?” त्याने उत्तर दिले, “सेनापती महोदय तुमच्यासाठी.”
- 2 राजे ९:६सुमारे इ.स.पू. ८८४
मग येहू उठला आणि तो आत घरात गेला. नंतर संदेष्ट्याने येहूच्या मस्तकांवर तेल ओतले आणि जाहीर केले, “याहवेह इस्राएलचे परमेश्वर म्हणतात: ‘मी तुझा याहवेहची प्रजा इस्राएलाचा राजा म्हणून अभिषेक करतो.
- 2 राजे ९:७सुमारे इ.स.पू. ८८४
तुला आपला स्वामी अहाबाच्या घराण्याचा नाश करावयाचा आहे. ईजबेलने माझ्या संदेष्ट्यांना आणि याहवेहच्या इतर सेवकांना ठार मारलेल्यांचा सूड तुला उगवावयाचा आहे.
- 2 राजे ९:८सुमारे इ.स.पू. ८८४
कारण अहाबाच्या संपूर्ण घराण्याचा नाश होईल. मी अहाबाच्या घराण्यातील प्रत्येक पुरुष इस्राएली राष्ट्रातून मिटवून टाकीन तो दास असो किंवा स्वतंत्र.
- 2 राजे ९:९सुमारे इ.स.पू. ८८४
नेबाटाचा पुत्र यरोबोअम आणि अहीयाहचा पुत्र बाशा यांच्या घराण्यासारखे मी अहाबाच्या घराण्याचे करेन.
- 2 राजे ९:१०सुमारे इ.स.पू. ८८४
ईजबेलला येज्रीलच्या भूमीत कुत्री फाडून खातील आणि तिला कोणीही मूठमाती देणार नाही.’ ” मग त्या तरुणाने दार उघडले आणि पळाला.
- 2 राजे ९:११सुमारे इ.स.पू. ८८४
येहू आपल्या सोबतच्या अधिकार्यांकडे परत आला. त्यापैकी एकाने त्याला विचारले, “सर्वकाही ठीक आहे ना? हा वेडा तुझ्याकडे का आला होता?” येहूने उत्तर दिले, “तो कोण होता व त्याचे बोलणे हे तुम्हाला चांगलेच ठाऊक आहे.”
- 2 राजे ९:१२सुमारे इ.स.पू. ८८४
तेव्हा ते म्हणाले, “हे सत्य नाही, खरे काय आहे ते आम्हाला सांग.” येहूने म्हटले, “त्याने मला म्हटले: ‘याहवेह असे म्हणतात: मी तुझा इस्राएलाचा राजा होण्यासाठी अभिषेक करत आहे.’ ”
- 2 राजे ९:१३सुमारे इ.स.पू. ८८४
हे ऐकून त्यांनी ताबडतोब त्याच्यासमोर पायर्यांवर आपल्या अंगरख्याच्या पायघड्या घातल्या व कर्णा वाजवून ते ओरडून म्हणाले, “येहू राजा झाला आहे.”
- 2 राजे ९:१४सुमारे इ.स.पू. ८८४
निमशीचा पुत्र यहोशाफाटचा पुत्र येहूने योराम राजाविरुद्ध बंड पुकारले. (त्यावेळेस योराम राजा सर्व सैन्यानिशी रामोथ गिलआद येथे अरामचा राजा हजाएलविरुद्ध इस्राएलांच्या बाजूने लढत होता.
- 2 राजे ९:१५सुमारे इ.स.पू. ८८४
पण यहोराम राजा हा अरामचा राजा हजाएलशी लढताना ज्या जखमा अरामी लोकांनी दिल्या होत्या, त्या जखमा बर्या व्हाव्यात म्हणून तो येज्रीलला परतला होता.) येहू म्हणाला, “मी राजा व्हावे असे जर तुम्हाला वाटत असेल, तर आपण काय केले आहे हे कोणीही या नगरीतून निसटून ही बातमी येज्रीलमध्ये कोणालाही कळवू नये म्हणून खबरदारी घ्या.”
- 2 राजे ९:१६सुमारे इ.स.पू. ८८४
मग येहू रथात बसला आणि येज्रीलास गेला, कारण योराम तिथे विसावा घेत होता आणि यहूदीयाचा राजा अहज्याह त्याला भेटण्यास खाली गेला होता.
- 2 राजे ९:१७सुमारे इ.स.पू. ८८४
येज्रीलच्या बुरुजावर असलेला पहारेकरी येहू व त्याची टोळी येताना पाहून ओरडून म्हणाला, “मला एक टोळी येताना दिसत आहे.” यहोरामाने आदेश दिला, “एका घोडेस्वारास त्यांना भेटण्यास पाठवा, जो त्यांना विचारेल, शांतीने येत आहात ना?”
- 2 राजे ९:१८सुमारे इ.स.पू. ८८४
तेव्हा एक घोडेस्वार येहूला भेटण्यास गेला आणि म्हणाला, “राजाने असे म्हटले आहे: ‘तुम्ही शांतीने आला आहात का?’ ” येहूने उत्तर दिले, “तुला शांतीचे काय घेणे देणे? चल, माझ्यामागे हो!” तेव्हा पहारेकर्याने बातमी दिली, “आपला दूत तिथे पोहोचला, तो येणार्यांना भेटला, पण तो परत येत नाही.”
- 2 राजे ९:१९सुमारे इ.स.पू. ८८४
मग राजाने दुसर्या घोडेस्वाराला पाठविले. तो त्याच्याजवळ गेला आणि म्हणाला, राजाने असे म्हटले आहे: तुम्ही शांतीने आला आहात का? येहूने उत्तर दिले, “तुला शांतीचे काय घेणे देणे? चल, माझ्यामागे हो!”
- 2 राजे ९:२०सुमारे इ.स.पू. ८८४
पहारेकर्याने बातमी दिली, “तो तिथे पोहोचला, पण तो ही परत येताना दिसत नाही. त्याचे घोडे हाकणे तर निमशीचा पुत्र येहूसारखे आहे—तो घाईने हाकीत आहे.”