- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 930–586 BC
The Divided Kingdom
The kingdom splits into Israel and Judah; prophets warn of judgment as both nations slowly drift into idolatry and exile.
या कालखंडातील वचने
- 2 राजे ७:२०सुमारे इ.स.पू. ८९२
त्याच्यासोबत असेच घडले, कारण लोकांनी त्याला वेशीजवळ तुडविले आणि तो मरण पावला.
- 2 राजे ८:१सुमारे इ.स.पू. ८९१
अलीशाने ज्या स्त्रीच्या मुलास जिवंत केले होते, तिला म्हणाला, “तुझ्या कुटुंबीयांनी घेऊन निघून जा आणि जिथे तुला राहता येईल तिथे राहा, कारण याहवेह या भूमीवर मोठा दुष्काळ पाठविणार आहेत आणि तो सात वर्षे टिकणार आहे.”
- 2 राजे ८:२सुमारे इ.स.पू. ८९१
त्या स्त्रीने परमेश्वराच्या मनुष्याने सांगितल्याप्रमाणे केले. ती आणि तिचे कुटुंब दूर निघून पलिष्ट्यांच्या देशात जाऊन सात वर्षे राहिले.
- 2 राजे ८:३सुमारे इ.स.पू. ८८५
सात वर्षाच्या शेवटी ती पलिष्टी देशातून परत आली आणि आपले घर आणि जमीन परत मिळण्यासंबंधी राजाला विनंती करण्यास गेली.
- 2 राजे ८:४सुमारे इ.स.पू. ८८५
त्यावेळी राजा परमेश्वराचा मनुष्य अलीशाचा सेवक गेहजीशी बोलत होता आणि तो म्हणाला, “अलीशाने जी सर्व मोठी कृत्ये केली ती मला सांग.”
- 2 राजे ८:५सुमारे इ.स.पू. ८८५
जेव्हा गेहजी राजाला सांगत असता कसे अलीशाने मृताला जिवंत केले; ती स्त्री आपली जमीन आणि घर परत मिळावे म्हणून विनंती करण्यास राजाकडे आली होती. गेहजी म्हणाला, “माझे स्वामी, माझे महाराज, हीच ती स्त्री आणि अलीशाने ज्या मुलाला जिवंत केले तोच हा पुत्र.”
- 2 राजे ८:६सुमारे इ.स.पू. ८८५
राजाने त्याबद्दल स्त्रीला विचारले आणि तिने त्याला सर्व सांगितले. मग त्याने आपल्या एका अधिकार्याला तिच्या मदतीसाठी नेमून दिले आणि त्याला म्हटले, “तिचे जे काही होते, ते सर्व तिला परत द्या, तिने देश सोडल्यापासून आजपर्यंत तिच्या मालकीचे सर्वकाही, अगदी तिच्या जमिनीचे सर्व उत्पन्न तिला परत करा.”
- 2 राजे ८:७सुमारे इ.स.पू. ८८५
अलीशा दिमिष्क येथे गेला आणि अरामचा राजा बेन-हदाद आजारी होता. जेव्हा राजाला सांगण्यात आले, “परमेश्वराचा मनुष्य येथे वर आलेला आहे,”
- 2 राजे ८:८सुमारे इ.स.पू. ८८५
राजाने हजाएलला म्हटले, “एखादी भेट घेऊन परमेश्वराच्या मनुष्याला भेटण्यास जा आणि त्याच्याद्वारे याहवेहस विचार, ‘मी या आजारातून बरा होईन की नाही?’ ”
- 2 राजे ८:९सुमारे इ.स.पू. ८८५
हजाएल त्याच्यासोबत दिमिष्कच्या सर्व उत्तम भेटवस्तू चाळीस उंटावर लादून अलीशाला भेटण्यासाठी गेला. तो गेला आणि त्याच्यासमोर उभा राहिला आणि म्हटले, “तुमचा पुत्र, अरामचा राजा बेन-हदाद, यांनी मला आपल्याकडे हे विचारण्यास पाठविले आहे की, मी या आजारातून बरा होईन की नाही?”
- 2 राजे ८:१०सुमारे इ.स.पू. ८८५
अलीशाने उत्तर दिले, “जा आणि त्याला सांग, ‘तू नक्कीच बरा होशील.’ परंतु याहवेहने मला स्पष्ट दाखविले आहे की तो अवश्य मरेल.”
- 2 राजे ८:११सुमारे इ.स.पू. ८८५
यानंतर अलीशाने हजाएलकडे तो इतका लाजिरवाणा होईपर्यंत रोखून पाहिले की हजाएल भांबावून गेला. त्यानंतर परमेश्वराचा मनुष्य रडू लागला.
- 2 राजे ८:१२सुमारे इ.स.पू. ८८५
हजाएलाने विचारले, “माझे स्वामी का रडत आहेत?” अलीशाने उत्तर दिले, “कारण मला माहीत आहे की तू इस्राएली लोकांचे वाईट करणार आहेस, तू त्यांच्या तटबंदीच्या ठिकाणास आग लावशील, त्यांच्या तरुण पुरुषांना तलवारीने ठार मारशील, त्यांच्या बालकांना आपटून मारशील आणि गर्भवती स्त्रियांना चिरून टाकशील.”
- 2 राजे ८:१३सुमारे इ.स.पू. ८८५
हजाएल म्हणाला, “तुमचा सेवक मी एक कुत्रा आहे, एवढी मोठी गोष्ट कशी करणार?” अलीशाने उत्तर दिले, “याहवेहने मला दाखविले आहे, तू अरामचा राजा होणार,”
- 2 राजे ८:१४सुमारे इ.स.पू. ८८५
त्यानंतर हजाएल अलीशाला सोडून गेला आणि आपल्या स्वामीकडे परत आला. जेव्हा बेन-हदादने विचारले, “अलीशाने तुला काय सांगितले?” हजाएलाने उत्तर दिले, “त्यांनी मला सांगितले की तुम्ही नक्कीच बरे होणार.”
- 2 राजे ८:१५सुमारे इ.स.पू. ८८५
परंतु दुसर्या दिवशी त्याने एक रजई पाण्यात भिजविली आणि ती राजाच्या तोंडावर पसरली, त्यामुळे राजा मरण पावला. त्यानंतर हजाएल त्याच्या ठिकाणी राजा झाला.
- 2 राजे ८:१६सुमारे इ.स.पू. ८९२
अहाबाचा पुत्र, इस्राएलाचा राजा योरामच्या कारकिर्दीच्या पाचव्या वर्षी, यहूदीयाचा राजा यहोशाफाटचा पुत्र यहोराम राज्य करू लागला.
- 2 राजे ८:१७सुमारे इ.स.पू. ८९२
तो वयाच्या बत्तीसाव्या वर्षी राजा झाला, त्याने यरुशलेमवर आठ वर्षे राज्य केले.
- 2 राजे ८:१८सुमारे इ.स.पू. ८९२
अहाबाच्या घराण्याने जसे केले होते त्याचप्रमाणे त्याने इस्राएलच्या राजांच्या मार्गांचे अनुसरण केले, कारण त्याने अहाबाच्या मुलीबरोबर विवाह केला होता. याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले.
- 2 राजे ८:१९सुमारे इ.स.पू. ८९२
तथापि आपला सेवक दावीदासाठी याहवेहने यहूदाहचा नाश केला नाही. कारण त्यांनी दावीदाच्या वंशजाचा दिवा कायम ठेवण्याचे अभिवचन दिले होते.
- 2 राजे ८:२०सुमारे इ.स.पू. ८९२
यहोरामाच्या काळात, एदोमाने यहूदीयाविरुद्ध बंड पुकारले आणि त्यांनी स्वतःसाठी एक राजा निवडला.
- 2 राजे ८:२१सुमारे इ.स.पू. ८९२
मग यहोराम आपले रथ घेऊन साईर येथे गेला. ज्या एदोमी लोकांनी त्याला आणि त्याच्या रथाच्या नायकांना घेरले होते, रात्रीच्या वेळी उठून त्याने वेढा मोडून टाकला. आणि लोक आपल्या डेर्यांत पळून गेले.
- 2 राजे ८:२२सुमारे इ.स.पू. ८९२
तेव्हापासून आजपर्यंत एदोम यहूदीयाहविरुद्ध बंड करीत आहे. त्याचवेळेस लिब्नाहनेही बंड केले.
- 2 राजे ८:२३सुमारे इ.स.पू. ८९२
यहोरामाच्या बाकीच्या कामगिरीचा तपशील आणि त्याची सर्व कामे यहूदीयाच्या राजांच्या इतिहास या ग्रंथात केलेली नाही काय?
- 2 राजे ८:२४सुमारे इ.स.पू. ८९२
यहोराम त्याच्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि तो त्यांच्याबरोबर दावीदाच्या नगरात पुरला गेला आणि वारस म्हणून त्याचा पुत्र अहज्याह राजा झाला.