मुख्य मजकुरावर जा

circa 605–538 BC

The Babylonian Exile

Jerusalem falls and the temple burns; Ezekiel and Daniel minister among the exiles as Lamentations mourns the city's ruin.

1,784 वचने · 3 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. दानीएल ९:२३सुमारे इ.स.पू. ५३८

    ज्या क्षणाला तू प्रार्थना करण्यास सुरुवात केलीस, त्याच क्षणाला एक आज्ञा देण्यात आली, ती काय आहे हे तुला सांगण्यासाठीच मी आलो आहे. कारण तू अतिशय प्रिय आहेस. म्हणून या गोष्टींचा विचार कर आणि दृष्टान्त नीट समजून घे:

  2. दानीएल ९:२४सुमारे इ.स.पू. ५३८

    “तुमचे लोक आणि तुमचे पवित्र शहर यासाठी सत्तर ‘सप्तके’ निर्धारित केली गेली आहे की त्यांनी अपराधाचा अंत करावा आणि पापाचा शेवट करावा आणि दुष्टतेसाठी पश्चात्ताप करावा, सनातन नीतिमत्व आणावे, दृष्टान्त आणि संदेश यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी आणि परमपवित्रस्थानाला अभिषेक करण्यात यावा.

  3. दानीएल ९:२५सुमारे इ.स.पू. ५३८

    “हे जाणा आणि समजून घ्या: यरुशलेमची पुनर्स्थापना आणि पुनर्बांधणी करण्यासाठी सात ‘सप्तके’ आणि बासष्ट ‘सप्तके’ निश्चित केली आहेत. ते शब्द बाहेर येण्यापासून तो अभिषिक्त शासनकर्ता होईपर्यंतचा वेळ ठरविला आहे. अडचणीच्या वेळी रस्त्यावर आणि खंदकाने पुन्हा बांधले जाईल,

  4. दानीएल ९:२६सुमारे इ.स.पू. ५३८

    बासष्ट ‘सप्तके’ हा काळ संपल्यावर अभिषिक्ताचा वध करण्यात येईल आणि त्याला काही उरणार नाही. मग अधिपतीचे लोक शहराचा आणि पवित्रस्थानाचा विध्वंस करतील. शेवट महापुराप्रमाणे येईल: शेवट होईपर्यंत युद्ध चालू राहील आणि सर्वकाही ओसाड व्हावे असे ठरले आहे.

  5. दानीएल ९:२७सुमारे इ.स.पू. ५३८

    तो एका ‘सप्तका’ साठी अनेकांसोबत कराराची पुष्टी करेल. ‘सप्तका’ मध्ये, यज्ञ करण्यास व अन्नार्पणे वाहण्याचे बंद करेल. आणि मंदिरात अमंगळ वस्तू स्थापित करेल, ज्यामुळे ओसाडी पडेल. नेमलेल्या समाप्तीपर्यंत सर्वनाश करणार्‍यावर कोपाचा वर्षाव होईल.”

  6. दानीएल १०:१सुमारे इ.स.पू. ५३४

    पर्शियाचा राजा कोरेश च्या कारकिर्दीच्या तिसर्‍या वर्षी दानीएलला (ज्याला बेलटशास्सर असे म्हटले जाते) एक प्रकटीकरण झाले. तो संदेश खरा असून त्याचा संबंध मोठ्या युद्धाशी होता. संदेशाचा समज दृष्टान्ताद्वारे त्याच्याकडे आला.

  7. दानीएल १०:२सुमारे इ.स.पू. ५३४

    त्यावेळेस मी, दानीएल, तीन आठवडे शोक करीत होतो.

  8. दानीएल १०:३सुमारे इ.स.पू. ५३४

    मी माझे आवडते भोजन केले नाही; मी मांस खाल्ले नाही वा द्राक्षारस आपल्या ओठाला लावले नाही; तीन आठवडे पूर्ण होईपर्यंत मी तेलाचा अभ्यंगसुद्धा केले नाही.

  9. दानीएल १०:४सुमारे इ.स.पू. ५३४

    पहिल्या महिन्याच्या चोविसाव्या दिवशी मी महानदी फरातच्या तीरावर उभा होतो,

  10. दानीएल १०:५सुमारे इ.स.पू. ५३४

    तेव्हा मी वर पाहिले आणि एक तागाची वस्त्रे परिधान केलेला आणि कमरेला उफाज देशाच्या शुद्ध सोन्याचा पट्टा घातलेला असा पुरुष उभा होता.

  11. दानीएल १०:६सुमारे इ.स.पू. ५३४

    त्याची त्वचा तेजस्वी होती, त्याचा चेहरा विजा चमकाव्यात तसा लखलखत होता. त्याचे डोळे अग्नीच्या ज्योतीसारखे होते. त्यांचे बाहू आणि पाय उज्ज्वल कास्यासारखे चमकत होते आणि त्याची वाणी फार मोठ्या लोकसमुदायाच्या आवाजासारखी प्रचंड होती.

  12. दानीएल १०:७सुमारे इ.स.पू. ५३४

    हा दृष्टान्त केवळ मला, दानीएललाच दिसला; जे माझ्याबरोबर होते, त्यांना तो दिसला नाही, परंतु त्यांना अतिशय भीतीने ग्रासले व लपण्यासाठी ते पळून गेले.

  13. दानीएल १०:८सुमारे इ.स.पू. ५३४

    मग मी एकटाच राहिलो आणि हा महान दृष्टान्त पहात राहिलो; माझ्यात शक्ती उरली नाही, माझा चेहरा पांढराफटक पडला आणि मी असहाय्य झालो.

  14. दानीएल १०:९सुमारे इ.स.पू. ५३४

    नंतर मी त्याला बोलताना ऐकले आणि मी जमिनीवर पालथा पडलो आणि मला गाढ झोप लागली.

  15. दानीएल १०:१०सुमारे इ.स.पू. ५३४

    परंतु एका हाताने त्याने मला स्पर्श केला आणि माझ्या थरथर कापत असणार्‍या मला हातांवर व गुडघ्यांवर ठेवले.

  16. दानीएल १०:११सुमारे इ.स.पू. ५३४

    त्याने म्हटले, “हे दानीएला, परमप्रिय पुरुषा, मी जी काही वचने तुला सांगत आहे, ती लक्षपूर्वक ऐक आणि नीट उभा राहा, कारण मला तुझ्याकडे पाठविण्यात आले आहे.” आणि जेव्हा त्याने हे म्हटले, तेव्हा मी थरथर कापत उभा राहिलो.

  17. दानीएल १०:१२सुमारे इ.स.पू. ५३४

    तो पुढे म्हणाला, “दानीएला, भिऊ नकोस. कारण ज्या पहिल्या दिवशी तू समजून घेण्यास आणि स्वतःला आपल्या परमेश्वरासमोर नम्र करण्यास मन लावलेस, त्या दिवसापासून तुझे शब्द ऐकण्यात आले आहे आणि आणि मी त्यांना प्रतिसाद म्हणून आलो आहे.

  18. दानीएल १०:१३सुमारे इ.स.पू. ५३४

    परंतु पर्शिया राज्याच्या राजपुत्राने माझी वाट एकवीस दिवस अडविली. नंतर मिखाएल, स्वर्गातील राजपुत्रांपैकी एक, माझ्या साहाय्यासाठी आला, कारण पर्शियाच्या राजाकडे मला अडविण्यात आले होते.

  19. दानीएल १०:१४सुमारे इ.स.पू. ५३४

    आता मी येथे भविष्यात तुझ्या लोकांसोबत काय होणार आहे ते समजविण्यासाठी आलो आहे, कारण हा दृष्टान्त पूर्ण होण्यास बराच वेळ आहे.”

  20. दानीएल १०:१५सुमारे इ.स.पू. ५३४

    तो माझ्यासोबत हे बोलत असता, मी माझे तोंड जमिनीकडे केले आणि मी काही बोलू शकलो नाही.

  21. दानीएल १०:१६सुमारे इ.स.पू. ५३४

    तेव्हा कोणीतरी जो मानवासारखा दिसणाऱ्याने माझ्या ओठांना स्पर्श केला आणि मी माझे मुख उघडले आणि मी बोलू लागलो. जो माझ्यापुढे उभा होता त्याला म्हटले, “प्रभू या दृष्टान्तामुळे मी मनोवेदनांनी ग्रस्त झालो आहे; आणि माझ्यात काही बळ उरले नाही.

  22. दानीएल १०:१७सुमारे इ.स.पू. ५३४

    माझ्या प्रभू, मी तुमचा सेवक, मी तुमच्यासोबत कसे बोलू शकतो? माझी शक्ती नष्ट झाली आहे. मला श्वासही घेववत नाही.”

  23. दानीएल १०:१८सुमारे इ.स.पू. ५३४

    तेव्हा मानवासारख्या दिसणार्‍या पुरुषाने मला पुन्हा स्पर्श केला आणि मला शक्ती दिली.

  24. दानीएल १०:१९सुमारे इ.स.पू. ५३४

    “भिऊ नको, तू फार परमप्रिय आहेस,” तो म्हणाला. “तुला शांती लाभो! आता बलवान हो; बलवान हो!” जेव्हा त्याने हे म्हटले तेव्हा मला सामर्थ्य आले आणि मी त्याला म्हटले, “माझ्या प्रभू बोला, कारण तुम्ही मला सामर्थ्य दिले आहे.”

  25. दानीएल १०:२०सुमारे इ.स.पू. ५३४

    तेव्हा तो म्हणाला, “मी तुझ्याकडे का आलो हे तुला ठाऊक आहे काय? फार लवकर, मी पर्शियाच्या राजपुत्राशी लढायला परत येईन आणि मी निघून गेल्यावर ग्रीसचा राजपुत्र येईल;